गूगल अॅडसेन्स आता मराठीतसुद्धा उपलब्ध!

Google Adsense In Marathi

गूगलची अॅडसेन्स (Adsense) ही सेवा विविध वेबसाइट्सवर जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाते. या सेवेमुळे अनेक वेब डेव्हलपर्स, न्यूज वेबसाइट्स, पोर्टल्स यांना त्यांच्या वेबसाइटद्वारे जाहिरातींमार्फत पैसे मिळवणं शक्य होतं. गूगल ही सेवा आजवर अनेक भाषांमध्ये उपलब्ध होती मात्र मराठी भाषेत ही सेवा अजूनही मिळत नव्हती. भारतीय भाषांमध्ये हिंदी, बंगाली, तमिळ, तेलुगू या भाषांना आधीपासून सपोर्ट दिला जात असून आता ऑगस्ट महिन्यात गूगलने अॅडसेन्ससाठी मराठी भाषेचा सपोर्ट जोडल्याच दिसून येत आहे. मराठी वेब पब्लिशर्सना यामुळे नक्कीच फायदा होणार असून पर्यायाने मराठीत कंटेंट असणाऱ्या वेबसाइट्समध्ये येत्या काळात वाढ झालेली पहायला मिळेल.

AdSense now understands Marathi

गेल्या काही वर्षात भारतीय भाषांमध्ये इंटरनेट सर्च करणे, कंटेंट ब्राऊज करणे अनेक पटींनी वाढलं असून याच पार्श्वभूमीवर गूगलने भारतीय भाषांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. स्थानिक भाषांमध्ये जर वेबसाइट्सचा डेटा, कंटेंट, माहिती उपलब्ध होत असेल तर तो अधिक लोकांपर्यंत पोहोचतो. KPMG या संस्थेने काही महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतात इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचा वापर सर्वाधिक केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार गूगलनेसुद्धा मराठीकडे काही प्रमाणात अधिक लक्ष दिलेलं पहायला मिळत होतं. जसे की भारतात गूगल असिस्टंटउपलब्ध झाला तो हिंदीनंतर मराठीतच! आता एकदाचा Google Adsense सपोर्ट सुद्धा Marathi भाषेला मिळाला असल्याने मराठी भाषेत इंटरनेटवर लेख, ब्लॉग्स, वेबसाइट्स, पोर्टल्स नक्की वाढीस लागतील.

गूगलने अॅडसेन्स डॅशबोर्डसुद्धा मराठीत उपलब्ध करून दिला आहे!

वेबसाइट/ब्लॉगमार्फत उत्पन्न मिळाल्यामुळे इतर भाषांमधील कंटेंट फारच मोठ्या प्रमाणात वाढला असून आता भारतात भारतीय भाषांमधील कंटेंटने इंग्लिशला सुद्धा मोठ्या फरकाने मागे टाकलं आहे. यापुढे मराठी भाषेतील वेबसाइट्ससुद्धा मोठ्या प्रमाणावर येणार असल्याने मराठी इंटरनेट यूजर्सना मातृभाषेत माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

अॅडसेन्सबद्दल माहितीसाठी गूगलचं मराठी हेल्प सेंटर : https://support.google.com/adsense?hl=mr


अॅडसेन्स तुमच्या वेबसाइटला कसे जोडाल?

  1. प्रथम या लिंकवर जाऊन तुमची वेबसाइट/ब्लॉग गूगल अॅडसेन्सच्या अटींची पूर्तता करते का ते तपासून घ्या. https://support.google.com/adsense/answer/48182
  2. त्यानंतर https://www.google.com/adsense/startया लिंकवर जाऊन Sign Up करून अॅडसेन्स अकाऊंट तयार करा.
  3. अकाऊंट तयार करून वेबसाइटबद्दल माहिती दिल्यावर गूगल तुमची वेबसाइट तपासेल. ज्या प्रक्रियेला काही दिवस लागू शकतात.
  4. तुमची वेबसाइट जर गूगलने तपासली असेल तर तुम्हाला तसा इमेल येईल आणि त्यामध्ये तुमची वेबसाइट अप्रूव्ह करण्यात आली आहे की नाही हे सांगितलं जाईल.
  5. जर अप्रूव्ह झाली नसेल तर त्यांनी सुचवलेले बदल करून पुन्हा अप्लाय करता येईल
  6. जर अप्रूव्ह झाली असेल तर तुम्ही पुढील स्टेप्सप्रमाणे कोड तुमच्या वेबसाइटवर जोडून जाहिराती सुरू करू शकता.
  7. ऑटो अॅड्स : https://support.google.com/adsense/answer/7480616 या लिंकवर पूर्ण मदत मिळेल.
  8. जाहिराती सुरू झाल्यावर तुम्ही तुम्हाला जाहिरातींद्वारे मिळणारं उत्पन्न तुम्ही अॅडसेन्स वेबसाइट/अॅपवर पाहू शकाल.
  9. तुमचं उत्पन्न महिनाअखेरीस $100 किंवा अधिकवर पोहोचत असेल तर तुम्हाला ते थेट बँकेत पाठवलं जाईल.

अॅडसेन्सचा अधिकृत सपोर्ट असलेल्या भाषा : https://support.google.com/adsense/answer/9727

या लिंकवरील माहितीनुसार अॅडसेन्सला मराठी भाषेचा सपोर्ट मिळाला आहे असं अधिकृत मानता येईल.

About admin

Check Also

रेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर !

Railway Timetable & Live Status on Whatsapp रेल्वे प्रवासापूर्वी आपल्या ट्रेनचं लाईव्ह स्टेट्स म्हणजे सद्य …