लंडनची टेक कंपनी जियोमिकने अस्सल माणसासारखे दिसणारे रोबोट बनविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या रोबोटसाठी चेहरे देणाऱ्या लोकांना कंपनी तब्बल 92 लाख रुपये देणार आहे. यासाठी एकच सोप अट आहे ती म्हणजे तुमचा चेहरा दयाळू आणि फ्रेंडली दिसणारा असायला हवा. निवड झाल्यानंतर कंपनी त्या व्यक्तींसोबत करार करणार आहे. यानंतर ही रक्कम देणार आहे.

Give your face robot earn 92 lakhs only one simple condition

कंपनीने सांगितले की, या रोबोटचे नाव व्हर्च्युअल फ्रेंड असणार आहे. रोबोटची निर्मिती पुढील वर्षी सुरू होईल. सध्या या रोबोटची निर्मिती कोणत्या टप्प्यात आहे याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र, ज्या व्यक्तीने त्याचा चेहरा विकला आहे त्याला त्यांनी 92 लाख रुपये दिले आहेत. या व्यक्तीने हा पैसा चीनमध्येही गुंतविला आहे.

माणसाचा चेहरा मागण्याची ही विचित्र मागणी आहे. मात्र, काहीसे वेगळे दिसणाऱ्या लोकांसाठी ती आहे. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याच्या चेहऱ्याचा अॅग्रीमेंट करणे एक मोठा निर्णय आहे. मॉडेल तयार झाल्यानंतर करार झालेल्या व्यक्तीचा चेहरा हुबेहुब तयार करून रोबोटला लावला जाणार आहे. तो एखाद्या सामान्य रोबोटसारखाच दिसेल मात्र त्याला वेगळी ओळख मिळेल, असे कंपनीने सांगितले.

कंपनीने मानवी रोबोटवर गेल्या 5 वर्षांपासून काम सुरू केले आहे. प्रकल्पाची कल्पना उघड होऊ नये यासाठी गुप्तता बाळगली जात आहे. कंपनीने सांगितले की रोबोटसाठी ज्या चेहऱ्यांचा वापर केला जाणार आहे त्यांची माहिती दिली जाईल.