Sunil Barve Marathi

जन्मऑक्टोबर ३, इ.स. १९६६
राष्ट्रीयत्वभारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्रमराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवूड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका

भाषामराठी, हिंदी
प्रमुख नाटकेहमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपटतू तिथं मी
निदान

प्रमुख टीव्ही कार्यक्रमप्रपंच

सुनील बर्वे (जन्म : ३ ऑक्टोबर, १९६६) हे मराठी-हिंदी-गुजराती नाट्य-चित्रपट अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्येही ते काम करतात.
सुनील बर्वे हे मुंबईतल्या पाटकर कॉलेजातून रसायनशास्त्र हा विषय घेऊन बी.एस्‌सी. झाले आहेत. त्यांनी यूएस व्हिटॅमिन्स या कंपनीत फक्त एक महिना नोकरी केली, पण तिथे त्यांचे मन रमले नाही. आधीपासूनच ते तबल्याच्या आणि गाण्याच्या क्लासला जात असत. ते सात वर्षे तबला शिकले. गांधर्व महाविद्यालयाची मध्यमा ही संगीताची परीक्षा ते उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व करतानाच त्यांचा संबंध थिएटर ग्रुपशी झाला. त्यातूनच त्यांचा विनय आपटे यांच्या अफलातून या संगीत नाटकात शिरकाव झाला (१९८५). त्यांना एका गाणार्‍या पात्राची भूमिका मिळाली होती. ती भूमिका यशस्वी झाल्यावर सुनील बर्वे यांना ’मोरूची मावशी’ आणि कशी मी राहू तशीच’ यांसारख्या मराठी नाटकांत काम करायले मिळाले,. आणि अभिनयक्षेत्रात उत्तरोत्तर त्यांची अशीच प्रगती होत गेली. ’तो हा मी सुनील बर्वे’ या एफ.एम. रेडियो ’सुरभी’वरती ते रेडियो जॅकी आहेत.

सुनील बर्वे यांची ‘सुबक’ नावाची नाट्यसंस्था आहे. या संस्थेतर्फे ‘हबेर्रिअम’ नावाच्या उपक्रमांतर्गत सुनील बर्वे यांनी काही जुन्या नाटकांचे मर्यादित प्रयोग रंगमंचावर सादर करण्याचे ठरवले आहे. केले. या नाटकांते ते भूमिका करतीलच असे नाही. नाटके अशी :-

  • गारंबीचा बापू
  • झोपी गेलेला जागा झाला (फार्स)
  • दिनूच्या सासूबाई राधाबाई
  • मानापमान
  • मंगेश कदम दिग्दर्शित ‘लहानपण देगा देवा’. (प्रयोग चालू झाले)
  • वाहतो ही दुर्वांची जुडी
  • वेड्याचं घर उन्हात
  • शांतेचं कार्टं चालू आहे
  • संशय कल्लोळ
  • प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘सूर्याची पिल्ले’. (प्रयोग चालू झाले)
  • सौभद्र

Check Also

Upendra Limaye

Upendra Limaye

Upendra Limaye Marathi Actor उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ – हयात) हे मराठी चित्रपट, …

Prakash Vitthal Inamdar

प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० – डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. …

Ashok Saraf

Ashok Saraf Marathi Actor

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..