आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन (22021204)
योजने बद्दलचा शासन निर्णय : 1) शासन निर्णय समाजकल्याण सांस्कतिक कार्य विभाग क्रमांक टीएसी-1377/इडी-22607/1208-(एसी)-15 /पर्यटन दिनांक 11 ऑगस्ट 1977 अन्वये राबविण्यात येत आहे.
योजनेचा प्रकार :
  • योजनेतर योजना
योजनेचा उद्देश : गरिबीमुळे आदिवासी विद्यार्थी -विद्यार्थीनीचे शाळेत उपस्थित राहाण्याचे प्रमाण कमी आहे ते नियमित शाळेत उपस्थित राहावेत याकरिता त्यांना मोफत गणवेश,पुस्तके,पाटया इत्यादी साहित्य पुरविण्यात येत असले तरीही ते शाळेत येत नाहीत म्हणून त्या मुलांना शाळेत येण्याकरिता प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने त्यांना विद्यावेतन देण्याची योजना
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : आदिवासी विद्यार्थ्यांना
योजनेच्या प्रमुख अटी : ज्या ठिकाणी मोफत राहण्याची व जेवणाची सोय असते अशा आश्रम व निवासी शाळेतील विद्यार्थी विद्यावेतनास पात्र नाहीत. विद्यावेतन मिळण्यासाठी चंागली वर्तणूक व कमीत कमी 75 टक्के उपस्थिती अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र एवढयाच अटी आहेत.
आवश्यक कागदपत्रे :
  • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.
  • 1) महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • 2) आदिवासी प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : या योजनेद्वारे अनुसुचित जमातीच्या (इयत्ता5वी ते 10वी)विद्यार्थ्यांना वर्षाला रुपये 500 सरासरी विद्यावेतन देण्यात येते..
अर्ज करण्याची पद्धत : शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिण्याच्या आत सवलतीबाबत अर्ज शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत सादर करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याचेकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचाकडे करणे.,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनूसार आवश्यक तरतूद संगणक प्रणलीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) , सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

Leave a Reply