ॲडॉल्फ हिटलर मराठी जीवन चरित्र | adolf hitler biography in marathi

adolf hitler biography in marathi: जर्मनीचा हुकुमशहा अडोल्फ हिटलर त्याची क्रूरता, खडतर जीवन प्रवास आणि दृढनिश्चय साठी प्रसिद्ध आहे. जर्मनीला शक्तिशाली साम्राज्य बनवण्यासाठीचे सर्व श्रेय हिटलरलाच दिले जाते. आजच्या या लेखात अडोल्फ हिटलर याची मराठी माहिती व जीवन चरित्र देण्यात आले आहे.

adolf hitler indormation marathi

Adolf hitler biography in marathi

अडोल्फ हिटलर चा जन्म आणि बालपण

अडोल्फ हिटलर याचा जन्म 20 एप्रिल 1889 मध्ये ब्राऊनऊ एम इंन, हंगरी- ऑस्ट्रेलिया येथे झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव एलोईस हिटलर आणि आईचे नाव क्लारा होते. एलोईस आणि क्लारा यांना सहा अपत्य होती, ज्यातील हिटलर हे 4 थे मुल होते.

हिटलर 3 वर्षाचे असताना त्यांचे कुटुंब ऑस्ट्रेलियातून जर्मनीत वास्तव्यास आले. ज्यामुळे हिटलर चे संपूर्ण शिक्षण जर्मनी मध्येच झाले.

शिक्षण

हिटलर अभ्यासात हुशार होते. त्यांची बुद्धी कुशाग्र होती. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की हिटलर यांनी तांत्रिक शिक्षण प्राप्त करावे. ज्यामुळे त्यांचे शिक्षण लिंज नावाच्या एका स्थानावर झाले. हिटलर यांना ललित कलेत आवड होती परंतु वडिलांच्या इच्छेमुळे त्यांना बळजबरी तांत्रिक शिक्षण प्राप्त करावे लागले.

हिटलर आपली आत्मकथा माझा संघर्ष (mine kampf) मध्ये म्हणतात की, “त्यांच्या वडिलांचे विचार इच्छेविरुद्ध होते ज्यामुळे अनेकदा त्यांचे वडिलांशी भांडण झाले.” यानंतर 1903 साली एलॉइस हिटलर यांचा अकस्मात मृत्यू झाला. हिटलर यांची आई अतिशय उदार स्वभावाची होती परंतु ती कॅन्सर च्या रोगाने ग्रस्त होती. हिटलर यांची तांत्रिक शिक्षणात आवड नसल्याने त्यांच्या आईने त्यांना शाळा सोडण्याची परवानगी दिली.

यानंतर आपली चित्रकलेची आवड पूर्ण करण्यासाठी ते व्हिएन्ना गेले. परंतु अकॅडमी ऑफ फाइन आर्ट ने त्यांना 2 वेळा रीजेक्ट केले. याचदरम्यान त्यांच्या आईचे निधन झाले. हिटलर आपल्या आईशी भावनात्मक पद्धतीने जुडलेले होते. आईच्या निधनामुळे त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. ते आपले घर सोडून दूर राहायला गेले व त्यांनी काढलेली चित्रे विकून आवश्यक गरजा भागवू लागले.

adolf hitler information in marathi

एडोल्फ हिटलर चे राजकीय जीवन

1914 साली पाहिले महायुध्द सुरू झाले. युद्धात त्यांनी जर्मनी कडून सहभाग घेतला. ते एक साहसी आणि आणि सक्षम सैनिक होते. त्यांच्या साहसा साठी त्यांना आयरन क्रॉस ने सन्मानित करण्यात आले. या युद्धात ते अनेकदा घायाळ देखील झाले.

युद्ध समाप्तीनंतर 1919 साली उन्हाळ्याच्या काळात हिटलर यांना एर्न्स्ट रोएह्म या जर्मन सैनिकांच्या मदतीने म्युनिक सेनेत राजकीय अधिकारी म्हणून निवडण्यात आले. येथूनच त्यांच्या खऱ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली.

यानंतर हिटलर ने जर्मन वर्क्स पार्टी मध्ये प्रवेश केला. सन 1921 पर्यंत त्यांनी 56 हजार पेक्षा सदस्यांना पक्षात जोडले होते. ज्यामुळे त्यांना जर्मन वर्क्स पार्टी अर्थ नाझी पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले.

आपले प्रभावी भाषण आणि कष्टाच्या मदतीने हिटलर 1923 पर्यंत एक लोकप्रिय नेता म्हणून उदयास आले. त्यांनी 1923 च्या शेवटच्या महिन्यामध्ये नाझी बीयर हॉल क्रांती चे मंचन केले. या नंतर देशद्रोहाच्या आरोपात हिटलर ला एक वर्षाची शिक्षा झाली. परंतु तुरुंगातून सुटता बरोबर त्यांनी पुन्हा एकदा पक्षाला गठित केले.

एडोल्फ हिटलर चे दुसरे महायुद्ध

1 सप्टेंबर सन 1939 ला युरोपला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी हिटलरने द्वितीय विश्व युद्ध सुरू केले. हिटलरला संपूर्ण इंग्लंड वर आपला अधिकार मिळवायचा होता. व यासाठी त्याने अनेक देशांशी तह केला. सन 1937 मध्ये पहिल्यांदा इटलीशी तह केला त्यानंतर ऑस्ट्रेलियावर आपला अधिकार प्राप्त केला. यांनतर हिटलर ने रशिया सोबत तह केला. पोलंडच्या पूर्वेकडील भाग रशियाला दिला. आणि हळू हळू पश्चिमेकडील भागावर आपले आधिपत्य स्थापित करण्यास सुरुवात केली. फ्रान्सला पराजित करून मुसोलिनी शी तह करण्यासाठी आक्रमण केले.

ॲडॉल्फ हिटलर चे पतन आणि मृत्यू

या महायुद्धात हिटलर सर्वात मोठा अपराधी होता. त्याला संपूर्ण जगावर आपले अधिपत्य गाजवायचे होते. हिटलर अतिशय क्रूर होता त्याला कशाचेही भय नव्हते. हिटलर च्या पराजयाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा या युद्धात अमेरिकेने सहभाग घेतला.

हिटलर चे आतंक कमी व्हायला लागले आणि त्याची विजय पराजयात बदलली. त्याला पूर्णपणे अपयश मिळायला लागले त्याच्याविरुद्ध अनेक षड्यंत्र व्हायला लागली. हिटलर मुळे जर्मनीची देखील पराजय होऊ लागली. हे सर्व पाहून हिटलर दुःखी झाला त्याला आपली पराजय सहन झाली नाही. हताश आणि निराश हिटलर ने 30 एप्रिल सन 1945 ला स्वताला गोळी मारून आत्महत्या केली.

तर मित्रहो ही होती ॲडॉल्फ हिटलर ची मराठी माहिती adolf hitler indormation marathi. आशा करतो की ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *