Aharshastra

आहारशास्त्र

* आहारातील मूलभूत अन्नघटक / अन्नातील पोषणतत्वे कार्बोदके, प्रथिने , स्निग्ध पदार्थ , जीवनसत्वे,खनिजे, पाणी.

* कष्टाची (अंगमेहनीतीचे) कामे करणाऱ्या प्रौढ पुरूषाला दररोज …… कॅलरीज लागतात . – २८००

* कष्टाची कामे करणाऱ्या प्रौढ महिलेला दररोज …….. कॅलरीज लागतात – २३००

* गर्भावस्थेत महिलेला नेहमीपेक्षा ……. कॅलरीज अधिक लागतात . – ३००

* आहाराचे मोजमाप करणारे एकक – कॅलरी

* पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवल्यास जितकी उष्णता लागते तितक्या उष्णतेस ..म्हणतात – एक कॅलरी

अन्नातील पोषणतत्वे

१) कार्बोदके –

* कार्बोदकाचे सामान्य सूत्र – Cx (H2O) y

* कार्बोदके ही …. आणि ….. पासून बनलेली कार्बनी संयुगे आहेत . – कार्बन , हायड्रोजन आणि ऑक्सिजन

* वनस्पतीमध्ये कार्बोदके जटिल प्रक्रियेद्वारा तयार होतात ह्या क्रियेला ….. म्हणतात – प्रकाश संश्लेषण

* अन्नातून पुरविल्या जाणाऱ्या ऊर्जेपैकी ……… ते ……. ऊर्जा कार्बोदकांपासून मिळते .-६०% ते ८०%

* कार्बोदकाचे एक सोपे स्वरूप – ग्लुकोज

* कार्बोदक हा ऊर्जेचा स्त्रोत आहे.

कर्बोदकाची कार्ये :

अ) ऊर्जेचा पुरवठा : एक ग्रॅम कर्बोदकापासून साधारणपणे चार किलो कॅलरी ऊर्जा मिळते.

ब) प्रथिनबचत कार्य : कार्बोदकांमुळे शरीराची ऊर्जेची गरज पूर्ण झाल्यामुळे प्रथिनांची बचत होते. परिणामी
प्रथिने शरीर बांधणीसाठी राखून ठेवली जातात .

क) स्निग्ध पदार्थाच्या चयापचयाचे नियमन : स्निग्ध पदार्थांच्या पचनासाठी कार्बोदकांची गरज .

ड) सेल्युलोज या तंतुमय कार्बोदकामुळे पचनसंस्थेच्या कार्यात मदत होते. विशेष सेल्युलोजमुळे मलविसर्जनास मदत होते.

2) प्रथिने :
* प्रथिने हे कार्बन , हायड्रोजन , ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुगे आहेत .

* काही प्रथिनांमध्ये सल्फर आणि फॉस्फरस असतो.

* काही खास प्रथिनांमध्ये लोह, आयोडीन सारखे काही घटक असतात .

* अमिनो आम्लांच्या अनेक रेणूनी प्रथिने बनतात .

* प्रथिनांमध्ये अमिनो व कार्बोक्सिल हे क्रियाशील गट असतात व त्याच्या संयोगाने पेप्टाइडस बनतात .

प्रथिनांची कार्ये

अ) शरीराच्या वाढीस मदत करणे व झीज भरून काढणे.

ब) शरीराच्या क्रियेचे नियमन

क) संक्रमण रोगजंतूंपासून शरीराचे संरक्षण करणे

ड) एक ग्रॅम प्रथिनांपासून चार कॅलरी ऊर्जा मिळते .

३) स्निग्ध पदार्थ :
* स्निग्ध पदार्थ कार्बन , हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून बनलेले असतात .
* कर्बोदकाच्या तुलनेत स्निग्ध पदार्थात हायड्रोजनाचे प्रमाण जास्त आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी असते .

स्निग्ध पदार्थाची कार्ये

अ) एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून नऊ किलो कॅलरीज मिळतात .
ब) आहारातील स्निग्ध पदार्थ ही आवश्यक स्निग्धाम्ले पुरवितात .
क) स्निग्ध पदार्थात विरघळणाऱ्या जीवनसत्वांचा शरीरातील वाहक म्हणून स्निग्ध पदार्थ उपयोगी आहे.
ड) उष्णतारोधन व आघातशोषण म्हणूनही कार्य
इ) अन्नाचा स्वाद व तृप्ती झाल्याचे समाधान

४) जीवनसत्वे :
* नैसर्गिक अन्नात आढळणारे जे जीवनावश्यक कार्बनी पदार्थ वाढ व उत्तम आरोग्यासाठी अल्प प्रमाणात आवश्यक असतात , त्यांना जीवनसत्वे म्हणतात .

* स्निग्ध पदार्थात विरघळणारी जीवनसत्वे – ‘अ’, ‘ड’, ‘ई, आणि ‘के’ जीवनसत्व

* पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे – ‘ब’ जीवनसत्वसमूह आणि ‘क’ जीवनसत्व

* कार्ये : जखमा भरून काढणे , ताणतणाव दूर करणे , अभिशोषण जीवनसत्वे

* ‘अ’ जीवनसत्व ……… रंगांच्या फळामध्ये असते. – पिवळ्या व लाल
* दुधाच्या पाश्चरीकरणाच्या प्रक्रियेत …….. जीवनसत्वाचा नाश होतो – ‘ब’ जीवनसत्त्व
* ‘बी’ जीवनसत्वे एकूण …….. प्रकाराचे असतात – बारा

* ‘बी’ जीवनसत्वांना …….. असेही म्हणतात – बी – कॉम्प्लेक्स

* अन्नपदार्थ खाण्याचा सोडा वापरल्यामुळे …….. जीवनसत्वाचा नाश होतो. – क जीवनसत्व

* ………. जीवनसत्वाला ‘सूर्यकिरण जीवनसत्व’ असेही म्हणतात– ‘ड’ जीवनसत्व

* ‘के’ जीवनसत्वांपासून मिळणारी प्रथिने – कोलॅजन , प्रोथ्रोविन , थ्रॉम्बिन

*गिरणीत साडलेल्या तांदळातून ………. जीवनसत्वाचा हास होतो. – ब जीवनसत्व

* ………. जीवनसत्व रक्त गोठण्यासाठी उपयुक्त ठरते – के जीवनसत्व

* ‘क’ जीवनसत्वास ………. नावाने संबोधतात – अॅस्कॉर्बिक अॅसिड
* आहारातील ‘ड’ जीवनसत्वाच्या अधिक्यामुळे आढळणारे सामान्य लक्षण – निद्रानाश

५) खनिजे (क्षार):

* शरीरातील प्रक्रियांचे नियंत्रण व शरीर संरक्षण यासाठी खनिजाची आवश्यकता असते.
खनिजांचे स्त्रोत व कार्ये
पाणी:
पाण्याचे स्त्रोत :
१) पिण्याचे पाणी – आपण रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.
२) अन्नातून मिळणारे पाणी – अन्नपदार्थातून कमी अधिक प्रमाणात पाणी (भाज्या/फळे – ७०% ते ८०%, दूध ८०% ते ८५%)
३) पेयाद्वारे उपलब्ध होणारे पाणी – चहा, कॉफी , थंड पेये, फळांचे रस इ. पेये पाणी पुरवतात.

अन्न तयार करताना वापरलेले पाणी – रस्सा , सार, वरण, आमटी , खीर, भात , यासारख्या शिजवलेल्या
पदार्थातून भरपूर पाणी

कार्ये :
१) शरीरातील महत्वाचा घटक : शरीरात सुमारे ६५% पाणी असते. अर्भक, लहान मुले यांच्या शरीरात
पाण्याचे प्रमाण ७५% असते. सर्व पेशींचा तो एक प्रमुख व महत्वाचा घटक आहे.

२)वैश्विक द्रावक – शरीरातील सर्व रासायनिक क्रियांना माध्यम , पोषणतत्वांचे वहन करण्याचे कार्य

३)शरीराचे तापमान नियंत्रण

४)वंगण – शरीरातील सांध्यांमधील वंगणाचा घटक म्हणून उपयोगी . त्यामुळे शरीराची हालचाल सुलभ होते.

थोडक्यात महत्वाचे :
* प्रथिने , स्निग्ध पदार्थ व पिष्टमय पदार्थ या तिन्हींनी समृद्ध अन्न – सोयाबीन
* रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी वयाच्या पस्तीशीनंतर ……. प्रमाण मर्यादीत ठेवतात. – मीठ
* मार्गारीन म्हणजे – लोण्यासाठी स्वस्त पर्याय
* ……… अभावामुळे हिमोग्लोबीन कमी होऊन रक्तक्षय होतो – लोहा
* कॅन्सर प्रतिबंधक द्रव्य असलेल्या टोमॅटोत
……. असते – लायसोसिन
* व्हिनेगारमध्ये ……… घटक असतो – ॲसिटीक आम्ल

Check Also

Human Digestive System

मानवी पचनसंस्था *मानवी पचनसंस्थेत घडणान्या क्रिया – अन्नग्रहण, अन्नपचन, अन्नशोषण अनपचनाचे दोन प्रकार – कायिक …

9 comments

Leave a Reply