आमच्या गावातील जत्रा

आमच्या गावातील जत्रा

आमच्या गावातील रक्षणकर्ती देवता म्हणजे आमची ‘ मंगळाई ‘ मंगळाई देवीचे देऊळ गावाबाहेरील एका टेकलीवर आहे.देवळात जाण्याचा रास्ता जरा अरुंद आणि अवघडच आहे. तरीही गावकरी देवळात जाण्याचे कधीही चुकवत नाहीत.

दरवर्षी चैत्री पौर्णिमेला देवीची जत्रा भरते. हा मोठा उत्सवच असतो. त्या काळात गावात खूप पैपाहुणे येतात. जे गावकरी नोकरीधंद्याच्या निमत्ताने गावाबाहेर पडले आहेत, तेही जत्रेला आवर्जून येतात. गावकरी मोठ्या उत्साहाने सर्व अतिथींचा पाहुणचार करतात, आगतस्वागत करतात. जत्रेचा हा महोत्सव तीन दिवस चालू असतो, पण बरेच जत्रेचे पूर्वतयारी धुमधडाक्यात चालू असते.

जत्रा जवळ आलीकी, गावकरी देवळाच्या परिसराची स्वच्छता करतात. देवळाला रंगरंगोटी करतात. प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसांत मंदिरावर रोषणाई केलेली असते.फुलांच्या रंगीबेरंगी तोरणा-मळणी सारा मंदिरपरिसर सजवलेला असतो.मंगळाई देवी नवसाला पावते,अशी भाविकांची श्रद्धा असल्याने जत्रेला दूरवरून खूप लोक येतात. नवसाला नवस फेडतात. त्यामुळे या परिसरात त्या काळात खूप गर्दी होते.

जत्रेच्या दिवसांत या परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानांची गर्दी असतेच. पण त्याच बरोबर भाविकांना आकर्षित करणारी इतरही अनेक दुकाने असतात. छोट्यांसाठी खूप खेळीही असतात मांडलेली असतात. ‘ मेरी-गो-राऊंड ‘, ‘विजेचा पाळणा ‘यावर मुलांची सतत झुंबड उडालेली असते.
जत्रेत लक्ष वेधून घेणारी अशी अनेक दालने असतात. त्यापैकी शेती आणि शेतीची साधने यांची माहिती देणारे काही दालने असतात;

काही दालने कुटुंबनियोजन,कुटुंब स्वास्थ्य यांची माहिती देणारी असतात मात्र, ग्रस्वच्छता व ग्रामविकास यांची माहिती देणारे दालन सर्वाना आकर्षित करत असते. या मुलेही आमच्या मंगळाईचे जत्रा खरोखरच मंगल आहे.

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई

माझा आवडता ऋतू उन्हाळा

लोकमान्य टिळक मराठी निबंध

माझ्या स्वप्नातिल आदर्श गाव

प्रदूषण-एक भयंकर संकट 

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

4 comments

Leave a Reply