Asha Transcription

Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar Marathi

अमृता खानविलकर (amruta khanvilkar) ही मराठी अभिनेत्री असून तिने मराठी हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काही कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनही केले आहे.

जन्म अमृता राजू खानविलकर
नोव्हेंबर २३, इ.स. १९८४
मुंबई, महाराष्ट्र, भारत

राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट),
सूत्रसंचालन (टीव्ही)

कारकीर्दीचा काळ इ.स. २००४ – चालू
भाषा मराठी (स्वभाषा)
मराठी, हिंदी (अभिनय)‌

प्रमुख चित्रपट गोलमाल
साडे माडे तीन

प्रमुख टीव्ही कार्यक्रम कॉमेडी एक्सप्रेस
वडील राजू खानविलकर
आई गौरी खानविलकर

अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले; तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.
अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील “अदा” या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील “बॉलिवुड टुनाइट” या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरीलकॉमेडी एक्सप्रेस” (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२मध्ये तिने “कॉमेडी एक्सप्रेस” कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले

चित्रपट-कारकीर्द

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा भूमिका टिप्पणी
इ.स. २००६ गोलमाल मराठी पूर्वा, अपूर्वा जुळ्या व्यक्तिरेखा
इ.स. २००७ मुंबई साल्सा हिंदी नेहा
साडे माडे तीन मराठी मधुरा
हॅटट्रिक
इ.स. २००८ काँट्रॅक्ट दिव्या
फूंक हिंदी आरती इ.स. २००९च्या मॅक्स स्टारडस्ट पुरस्कारांतर्गत “एक्सायटिंग न्यू फेस” पुरस्कारासाठी नामांकित
दोघात तिसरा आता सगळे विसरा मराठी पाहुणी कलाकार
इ.स. २००९ गैर मराठी नेहा
बोम्मयी तमिळ फूंक” या हिंदी चित्रपटाची तमिळ पुनर्निर्मिती
इ.स. २०१० नटरंग मराठी आता वाजले की बारा” या गाण्यावरील नृत्यामध्ये प्रमुख सहभाग
फूँक २ हिंदी आरती फूँक” मालिकेतला दुसरा चित्रपट
फिल्लम सिटी हिंदी मालती निर्मित्योत्तर प्रक्रियेत
इ.स. २०११ अर्जुन मराठी अनुष्का
झकास मराठी मंजुळा
धूसर मराठी
इ.स. २०१२ सतरंगी रे मराठी आरजे अलीशा
शाळा मराठी परांजपे बाई
आयना का बायना मराठी शिवानी
इ.स. २०१५ बाजी मराठी
वेलकम जिंदगी मराठी
कट्यार काळजात घुसली मराठी
Asha Transcription

About admin

Check Also

Hruta Durgule

Hruta Durgule Hruta Durgule Wikipedia Lifestyle And Biography hruta durgule age |hruta durgule photo | …

Leave a Reply

Your email address will not be published.