अरे रडता रडता

Are radta radta

अरे रडता रडता डोळे भरले भरले

आसू सरले सरले आता हुंदके उरले

आसू सरले सरले माझा मलेच इसावा

असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा

सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली

झाड़ गेलं निंधीसनी माघं सावली उराली

देव गेले देवा घरी आठी ठेयीसनी ठेवा

डोळ्या पुढे दोन लाल रडू नको माझ्या जीवा

रडू नको माझ्या जीवा तुले रड्याचीरे सवं

आसू हसावं रे जरा त्यात संसाराची चव

कुकू पुसलं पुसलं आता उरलं गोंधन

तेच देइल देइल नशिबले आवतन

जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतूत

तुटे मंगयसुतर उरे गयाची शपत

नका नका आया बाया नका करू माझी कीव

झालं माझं समाधान आता माझा मले जिव

admin

Leave a Reply

Next Post

माझी माय

Thu May 16 , 2019
Mazhi Maay Marathi Kavita किती वर्ष झाली गेली जरी माय परी तिची सय जात नाही || घरासाठी तिने काया झिजवली तक्रार न केली कधी काही || अवघे सहज नच ठरवून प्रेमाने भरून दिले आम्हां || नच घडविले संस्कार सांगून अवघे जीवन हेची गुरु || असे वागायचे हे न करायचे नव्हते […]
WhatsApp chat
%d bloggers like this: