Ashok Saraf

Ashok Saraf Marathi Actor

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील ‘हम पांच’ सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिनेअभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होत.

जन्मजून ४, इ.स. १९४७
राष्ट्रीयत्वभारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्रमराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवुड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका

कारकीर्दीचा काळइ.स. १९७१ – चालू
भाषामराठी, हिंदी
प्रमुख नाटकेहमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपटनवरी मिळे नवऱ्याला
गंमत जंमत
अशी ही बनवाबनवी
आयत्या घरात घरोबा
वजीर

प्रमुख टीव्ही कार्यक्रमहम पांच
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कार
महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कार
झी गौरव पुरस्कार

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ ययाती आणि देवयानी ‘ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

गजानन जागीरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या ‘पांडू हवालदार’मधील इरसाल पोलीस, ‘राम राम गंगाराम’मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. मराठी रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्मयासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डेयांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, दे दणा दणयासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन’ व ‘एक शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर’पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

‘अनधिकृत’ या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. ‘मनोमिलन’नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून ‘टन टना टन’ (मराठी) व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘दामाद’ (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘येस बॉस’, ‘जोडी नं.१’ हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट. अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित ‘हे राम कार्डिओग्राम’ या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले.

 • आई नं. वन
 • आत्मविश्वास
 • नवरी मिळे नवऱ्याला
 • गंमत जंमत
 • भुताचा भाऊ
 • माझा पती करोडपती
 • अशी ही बनवाबनवी
 • एक डाव भुताचा
 • एक उनाड दिवस
 • सगळीकडे बोंबाबोंब
 • आयत्या घरात घरोबा
 • कुंकू
 • बळीराजाचं राज्य येऊ दे
 • घनचक्कर
 • फुकट चंबू बाबुराव
 • तू सुखकर्ता
 • नवरा माझा नवसाचा
 • वजीर
 • अनपेक्षित
 • एकापेक्षा एक
 • चंगू मंगू
 • अफलातून
 • सुशीला
 • वाजवा रे वाजवा
 • शुभमंगल सावधान
 • जमलं हो जमलं
 • लपंडाव
 • चौकट राजा
 • नवरा माझा ब्रम्हचारी
 • गोडीगुलाबी
 • गडबड घोटाळा
 • मुंबई ते मॉरिशस
 • आमच्या सारखे आम्हीच
 • धमाल बाबल्या गणप्याची
 • बाळाचे बाप ब्रम्हचारी
 • प्रेम करू या खुल्लम खुल्ला
 • गुपचुप गुपचुप
 • गोष्ट धमाल नाम्याची
 • हेच माझं माहेर
 • गोंधळात गोंधळ
 • चोरावर मोर
 • जवळ ये लाजू नको
 • पांडू हवालदार
 • दोन्ही घरचा पाहुणा
 • राम राम गंगाराम
 • अरे संसार संसार
 • वाट पाहते पुनवेची
 • भस्म
 • खरा वारसदार
 • कळत नकळत
 • आपली माणसं
 • पैजेचा विडा
 • बहुरूपी
 • धूमधडाका
 • माया ममता
 • सखी
 • बाबा लगीन
 • एक डाव धोबीपछाड
 • आयडियाची कल्पना
 • झुंज तुझी माझी
 • टोपी वर टोपी

Check Also

Upendra Limaye

Upendra Limaye

Upendra Limaye Marathi Actor उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ – हयात) हे मराठी चित्रपट, …

Prakash Vitthal Inamdar

प्रकाश विठ्ठल इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० – डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. …

Sunil Barve Marathi

जन्म ऑक्टोबर ३, इ.स. १९६६ राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र मराठी नाटक मराठी चित्रपट बॉलीवूड मराठी दूरचित्रवाणी …

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..