Atal bihari vajpayee information in marathi: भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नाने सन्मानित भारताचे अकरावे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे एक महान राजनेता होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाला एक नवीन रूप दिले. आजच्या या लेखात आपण अटल बिहारी वाजपेयी यांची मराठी माहिती प्राप्त करणार आहोत. तर चला सुरू करूया…
अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती दरवर्षी 25 डिसेंबर ला साजरी केली जाते. ते एक महान नेते असण्यासोबतच उत्कृष्ट कवी देखील होते.
Atal bihari vajpayee information in Marathi
जन्म आणि बालपण
अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला मध्यप्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात झाला. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्री कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आईचे नाव श्री कृष्णा देवी होते. कृष्ण बिहारी वाजपेयी हे त्यांच्या गावातील एक प्रसिद्ध कवी आणि शिक्षक होते. अटल बिहारी वाजपेयी हे त्यांच्या सात भावडांपैकी एक होते.
शिक्षण व करीयर
वाजपेयी यांनी आपले प्राथमिक शिक्षण ग्वालियर च्या गोरखी गावातील गवर्नमेंट स्कूल मधून पूर्ण केले. पुढील शिक्षण प्राप्त करण्यासाठी ते ग्वालियर च्या व्हिक्टोरिया कॉलेज (आता लक्ष्मीबाई कॉलेज) आणि कानपूर च्या डी ए वी कॉलेज ला गेले. या कॉलेज मधून त्यांनी ग्रॅज्युएशन आणि अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी लखनऊ च्या लॉ कॉलेज मध्ये आवेदन केले परंतु पुढील शिक्षणात त्यांचे चित्त लागले नाही.
यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी आरएसएस द्वारे प्रकाशित एका मासिकात संपादकाचे काम सुरू केले. अटल बिहारी यांनी आपल्या जीवन काळात विवाह केला नाही परंतु त्यांनी प्रोफेसर बी एन कौल यांच्या दोन मुली नमिता आणि नंदिता यांना दत्तक घेतले. नंतरच्या काळात त्यांनी अनेक हिंदी वृत्तपत्रात संपादक म्हणून कार्य केले.
अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकीय कार्य
वाजपेयी यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून झाली. 1942 च्या ‘भारत छोडो आंदोलनात’ त्यांनी भाग घेतला. या आंदोलनात अटक करण्यात आलेल्या इतर नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता. या दरम्यान त्यांची भेट भारतीय जनसंघाचे (BJS) प्रमुख श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी झाली.
यानंतर वाजपेयी यांनी मुखर्जीं सोबत राजनीतीचे अनेक डावपेच शिकायला सुरुवात केली व त्यांच्या राजकीय कार्यात सहयोग करणे देखील सुरू केले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वास्थ खराब होते. व शारीरिक समस्येमुळे लवकरच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर बी. जे. स. पक्षाची जबाबदारी वाजपेयी यांनी सांभाळली यांच्या विचारांनी पक्षाचा अजेंडा पुढे सुरू ठेवला.
सन 1954 मध्ये ते पहिल्यांदा बलरामपुर सीट वरून संसदेचे सदस्य निवडले गेले. तरुण वयात त्यांचे विस्तृत विचार आणि राजकीय माहिती मुळे त्यांना राजनीति च्या जगात विशेष सन्मान मिळाला.
1977 मध्ये जेव्हा मोरारजी देसाई यांचे शासन आले तेव्हा वाजपेयी यांना विदेश मंत्री बनवण्यात आले. याच्या दोन वर्षानंतर त्यांनी चीन सोबत असलेल्या भारताच्या संबंधांवर चर्चा केली. भारत पाकिस्तान च्या 1971 च्या युद्धानंतर पुन्हा एकदा भारत पाकिस्तानचे व्यापारिक संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानची यात्रा केली.
भारताचे पंतप्रधान: अटल बिहारी वाजपेयी
सन 1979 मध्ये त्यांनी जनता पक्षाच्या मंत्री पदावरून राजीनामा दिला व 1980 मध्ये त्यांनी लाल कृष्ण आडवाणी यांच्या सोबत मिळून आपला स्वतःचा राजकीय पक्ष भारतीय जनता पक्षाचा पाया घातला. स्थापनेच्या नंतर 5 वर्षे वाजपेयी या पक्षाचे अध्यक्ष राहिले.
1996 च्या लोकसभा निवडणुकीत बीजेपीला सत्तेत येण्याची संधी प्राप्त झाली. भारतीय जनता पक्षाकडे अटल बिहारी वाजपेयी यांना देशाचे पंतप्रधान बनविण्यात आले. परंतु बीजेपीच्या सहयोगी दलांकडून त्यांना समर्थन मिळाले नाही. परिणामी बहुमत सिद्ध न झाल्याने फक्त 13 दिवसात हे शासन पडले. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदावरून राजीनामा दिला.
यानंतर बीजेपीने इतर पक्षांसोबत मिळून नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (NDA) ची स्थापना केली. 1998 साली बीजेपी पुन्हा सत्तेत आली. परंतु यावेळी देखील त्यांची सत्ता 13 महिने राहिली. वाजपेयी यांच्या या 13 महिन्यांच्या कालावधीत भारत परमाणु शक्तीने सज्ज राष्ट्र बनले. त्यांनी पाकिस्तान सोबत कश्मीर मुद्द्यावर अनेक चर्चा करून विवाद सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकिय षड्यंत्रामुळे फक्त 13 महिन्यानंतर एका मताच्या अभावाने त्यांचे शासन पडले.
यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपती यांना त्याग पत्र देऊन आपल्या भाषणात म्हटले…
सत्तेचा खेळ तर सुरू राहील, अनेक सरकारे येतील जातील.
परंतु हा देश आणि या देशाचे लोकतंत्र नेहमी अमर राहायला हवे.
ज्या शासनाला वाचवण्यासाठी असंविधानिक पाऊल उचलावे लागतील,
त्या शासनाला चिमट्यानेही स्पर्श करणे मला पसंद नाही.
यानंतर 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताच्या विजयानंतर वाजपेयी यांचे सरकार अधिकच बळकट झाले. नंतरच्या निवडणुकीत बीजेपी ला जनतेने पुन्हा एकदा निवडून दिले. यानंतर अटल बिहारी वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्य
यावेळी वाजपेयी यांनी पूर्ण पाच वर्षे शासन केले आणि पाच वर्षे यशस्वी शासन चालवणारे ते पहिले गैर काँग्रेसी सरकार होते. सर्व पक्षांच्या निर्णयानंतर वाजपेयी यांनी देशाची आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी कार्य सुरू केले. त्यांनी नॅशनल हायवे डेवलपमेंट प्रोजेक्ट व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. खाजगी क्षेत्राला प्रोत्साहित करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. औद्योगिक क्षेत्रात निवेश च्या देशात महत्त्वाचे पाऊल टाकले.
2001 साली भारत-पाकिस्तानचे संबंध सुदृढ करण्यासाठी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना भारतात येण्यासाठी निमंत्रण पाठवले. या दोघी पंतप्रधानांची भेट आग्रा येथे झाली. व यानंतर लाहोर ला जाणारी बस देखील सुरू करण्यात आली या बस मध्ये वाजपेयी यांनी स्वतः प्रवास केला. परंतु त्यांची ही मोहीम यशस्वी झाली नाही.
2001 साली अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व शिक्षा अभियान सुरू करून देशात शिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य केले.
यशस्वी पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर 2004 साली एनडीए युती पुन्हा एकदा निवडणुकीत उतरली. परंतु या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेतृत्वात युपीए या युतीने बहुमत प्राप्त केले व देशात काँग्रेसचे शासन आले.
2004 साली काँग्रेसच्या विजयानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदावरून राजीनामा दिला. सन 2005 मध्ये त्यांनी राजनीती मधून सेवा निवृत्त होण्याची घोषणा केली आणि आणि यानंतर 2009 साली झालेल्या निवडणुकीत त्यांनी भाग घेतला नाही.
अटल बिहारी वाजपेयी यांचा मृत्यू
सन 2009 मध्ये पहिल्यांदा त्यांना हृदय विकाराचा झटका आला. यानंतर त्यांचे शारीरिक स्वास्थ्य बिघडत गेले. 11 जून 2018 ला त्यांना दिल्लीच्या एम्स मध्ये भरती करण्यात आले आणि पाच दिवसानंतर 16 ऑगस्ट 2018 ला त्यांचे निधन झाले.
अटल बिहारी यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशभरात सात दिवसाचा राजकीय शोक घोषित केला. हे सात दिवस 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2018 पर्यंत देशाचा ध्वज अर्धा झुकावण्यात आला. सोबतच केंद्रशासनाच्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली.
अटल बिहारी वाजपेयी यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार
1992: देशासाठी केलेला अभूतपूर्व कार्यामुळे त्यांना पद्म विभूषण पुरस्कार देण्यात आला.
1993: मध्ये त्यांना कानपूर विश्वविद्यालयात डॉक्टरेट ही उपाधी प्राप्त झाली.
1994: अटल बिहारी वाजपेयी यांना बेस्ट सांसद, लोकमान्य टिळक अवॉर्ड आणि पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार प्राप्त झाले.
2015: भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले.
महत्वाचे प्रश्न
- अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म कधी झाला?
25 डिसेंबर 1924 - अटल बिहारी वाजपेयी जन्म स्थान
मध्यप्रदेशातील ग्वालियर - अटल बिहारी वाजपेयी किती वेळा पंतप्रधान बनले?
3 वेळा - अटल बिहारी वाजपेयी यांचा मृत्यू कधी झाला?
16 ऑगस्ट 2018 - अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न सन्मान केव्हा प्राप्त झाला?
2015 साली
तर मित्रहो ही होती Atal bihari vajpayee information in Marathi आशा करतो की अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती ची मराठी माहिती तुम्हाला आवडली असेल. या माहीतीला आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद.
READ MORE: