डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती | information about dr babasaheb ambedkar in marathi

babasaheb ambedkar in marathi: डॉ भीमराव आंबेडकर ज्यांनाच बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते. डॉ आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व देशाचे पाहिले न्याय मंत्री होते. त्यांनी दलित व मागासवर्गीय लोकांच्या उद्धारासाठी आपले जीवन वाहिले आजच्या या लेखात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मराठी माहिती व इतिहास मिळवणार आहोत. डॉ आंबेडकर भारतातील दलित समाजासाठी एक देवदूतच होते. आजच्या या लेखात देण्यात आलेली dr ambedkar information in marathi तुमचे जनरल नॉलेज तर वाढवेलच परंतु डॉ आंबेडकर यांचा संपूर्ण जीवन परिचय तुमच्या लक्षात येईल तर चला सुरू करुया.

babasaheb ambedkar marathi mahiti

Information about dr babasaheb ambedkar in marathi

प्रारंभिक जीवन

आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 व अपत्य होते त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली मध्यप्रदेश च्या महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई सकपाळ होते. रामजी सकपाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते. आंबेडकर आपल्या कुटुंबात सर्वात लहान होते, म्हणून सर्वांचे लाडके होते. भीमराव आंबेडकरांची जात महार होती. त्या काळात महार जातीला अस्पृश्य मानले जायचे. डॉक्टर आंबेडकरांचे कुटुंब मराठी लोकांशी ही संबंध ठेऊन होते.

1894 मध्ये रामजी सकपाळांच्या सेवानिवृत्ती नंतर ते महाराष्ट्रातील साताऱ्यात शिफ्ट झाले. साताऱ्यात आल्यानंतर काही दिवसात आंबेडकरांच्या आईचे निधन झाले. नंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले व ते मुंबई ला शिफ्ट झाले. 1906 मध्ये 15 वर्षाच्या वयात त्यांचा विवाह 9 वर्षाच्या रमाबाई शी करण्यात आला.

डॉ आंबेडकरांचे शिक्षण

आंबेडकर शाळेत असताना हलक्या जातीचे असल्याने त्यांच्याशी भेदभाव केला जात असे. दलित असल्या कारणाने त्यांना उच्च शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. तरीही आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले.

डॉ आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. पुढील शिक्षण त्यांनी बॉम्बे मधील एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये घेतले. येथूनच त्यांनी मँट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण केली. येथूनच त्यांनी 1912 साली अर्थशास्त्र व राजनीती विज्ञान मध्ये ग्रॅज्युएशन केले. संस्कृत शिकण्यावर मनाई असल्याने त्यांनी फारसी भाषेत ग्रॅज्युएशन केले. डॉ आंबेडकर आभ्यासात अतिशय बुद्धिमान होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती व इतिहास

कोलंबिया विश्वविद्यापीठात शिक्षण

ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बडोद्याच्या राजाने त्यांना आपल्या राज्याचे रक्षा मंत्री बनवले. परंतु येथेही त्यांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. अनेकदा त्यांना अपमान करण्यात आला. काही दिवसातच त्यांनी हे काम सोडले. त्यांच्या प्रतिभेमुळे बडोद्याच्या राज्य शासनाने त्यांना शिष्यवृत्ती दिली. ही शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क स्थित कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 1915 साली त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, दर्शन शास्त्र, मानव विज्ञान आणि अर्थशास्त्रात MA ची डिग्री मिळवली. 1916 साली कोलंबिया विद्यापीठातून त्यांना पीएचडी प्राप्त झाली.

पीएचडी प्राप्त केल्यानंतर आंबेडकर इंग्लंडच्या मार्गाने भारतात वापस आले. इंग्लंडमध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये एम एस सी आणि डी एस सी साठी रजिस्ट्रेशन केले.

करीयर

भारतात परत आल्यावर स्कॉलरशिप च्या नियमानुसार त्यांनी बडोद्याच्या राजाच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराचा कार्यभार स्वीकारला. परंतु येथेही जातिभेदाने त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यांना राहायला घरही मिळत नव्हते. शेवटी त्यांनी हा जॉब सोडला. व एक खाजगी शिक्षक आणि अकांऊटंट ची नोकरी सुरू केली. पण तरही प्रत्येक ठिकाणी त्यांना जाती भेदाचा सामना करावा लागत होता. शेवटी त्यांनी जातीभेदविरुद्ध लढण्याचे ठरवले. आंबेडकरांनी सांगितले की दलित व आदिवासी समाजालाही देशाच्या निवडणुकीत स्थान मिळायला हवे. आंबेडकरांनी त्यांच्या आरक्षणाची मागणी केली. त्यांनी अनेक गावांमध्ये भ्रमण केले. व लोकांना त्यांच्या हक्काविषयी जागृत केले. त्यांनी मूकनायक (लीडर ऑफ सायलेंट) नावाचे एक वृत्तपत्र सुरू केले.

डॉ आंबेडकरांचे राजकीय कार्य

1936 मध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मजदुर पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापित केला. 1937 च्या केंद्रीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 15 जागा मिळाल्या. आंबेडकरांनी आपल्या या पक्षाला ऑल इंडिया शेड्युल कास्ट पार्टी मध्ये बदलले. या पक्षासोबत 1946 मध्ये ते संविधान सभेच्या निवडणुकीत उभे राहिले. परंतु त्यांच्या या पक्षाचे निवडणुकीत खूप वाईट प्रदर्शन राहिले. कॉंग्रेस व महात्मा गांधींनी दलितांना हरिजन हे नाव दिले. परंतु आंबेडकरांनी याचा विरोध केला त्यांचे म्हणणे होते की दलीतही इतरांप्रमाणे मनुष्य आहेत व म्हणून त्यांना ही समाजात स्थान मिळायला हवे. महात्मा गांधींचे जीवन चरित्र वाचा येथे.

संविधानाचे निर्माण

भारताच्या स्वातंत्र्यानंतर 29 ऑगस्ट 1947 ला डॉ आंबेडकरांना संविधान समितीचे चेअरमन बनविण्यात आले. त्यांनी देशाच्या विविध जातींना एकत्र करण्यासाठी कार्य केले ते सर्वांच्या समान अधिकारांची गोष्ट करीत असत. संविधान निर्माण कार्यात त्यांचा प्रमुख उद्देश जातिगत भेदभाव दूर करून अस्पृश्यता मुक्त समाज निर्माण करणे हा होता.

भीमराव आंबेडकरांनी शिक्षा, सरकारी नोकऱ्या आणि सिव्हिल सेवांमध्ये अनुसूचित जाती व जमातीना आरक्षण सुरू केले.

  • भारतीय संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माची स्वतंत्रता दिली.
  • अस्पृश्यतेला समाप्त केले.
  • महिलांना अधिकार दिले.
  • समाजातील विविध वर्गात पसरलेल्या अंतराला कमी केले.

डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संविधानाला तयार करण्यात जवळपास 2 वर्ष 11 महीने व 7 दिवसांची कठीण मेहनत घेतली. व संविधान तयार करून तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सोपवून दिले.

डॉ आंबेडकरांचे बौद्ध धर्मपरिवर्तन

1950 साली डॉ आंबेडकर एक बौद्धिक संमेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंका गेले. तेथे ते बौद्ध धर्माने प्रभावित झाले. व त्यांनी बौद्ध धर्मात धर्मपरिवर्तन करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेतील भारतात परत आल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्मावर एक पुस्तक लिहिले व स्वताला बौद्ध धर्मात परिवर्तित करून घेतले. आंबेडकर आपल्या भाषणातून हिंदू जाती विभाजन व रितीचा विरोध करीत असत. 1955 मध्ये त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे गठण केले. त्यांचे पुस्तक बुद्धा आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या मृत्यूनंतर झाले.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू

1954 व 1955 साली डॉक्टर आंबेडकरांचे स्वस्थ खराब व्ह्यायला लागले. त्यांना डायबिटीस, डोळ्यात अस्पष्ट दिसणे व व याशिवाय दुसरे अनेक रोगांनी ग्रासले होते. ज्यामुळे त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडायला लागले.

दीर्घ आजाराने 6 डिसेंबर 1956 साली आपल्या घरी दिल्ली मध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या शेवटच्या वर्षात त्यांनी हिंदू धर्मातून बुद्ध धर्मात परिवर्तन करून घेतल्याने, त्यांच्या अंत्यविधी बौद्ध धर्माचा रितीरिवाजानुसार झाला. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळेस शेकडो च्या संख्येने लोक उपस्थित होते

तर मित्रांनो ही होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मराठी माहिती व मराठी इतिहास आशा करतो की ही information about dr babasaheb ambedkar in marathi तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरली असेल. ह्या महितीला आपल्या मित्रांसोबत शेयर करून त्यांचेही ज्ञान वाढवा. धन्यवाद.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *