Amazon Big Sell
beed

बीड जिल्हा

beed

जिल्हा : बीड

(1) स्थान व भौगोलिक परिस्थिती

(1) बीड जिल्हा पूर्वीच्या हैद्राबाद राज्यातील मराठी भाषिकापैकी एक जिल्हा आहे. सन 1956 साली व्दिभाषिक
राज्याच्या स्थापनेच्या वेळी हा जिल्हा व्दिभाषिक राज्याच्या मराठवाडयात होता. सन 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या
स्थापनेनंतर हा जिल्हा मराठी भाषिक राज्यात म्हणजे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर ऑगष्ट 1982
ला मराठवाडा प्रादेशिक विभागाचे व बीड जिल्हयाचे विभाजन करण्यात आले. त्यावेळी या जिल्हयातील अंबाजोगाई
तहसीलमधील रेणापूर मंडळातील 43 गावे व 11 वाडयांचा लातूर जिल्ह्यात समावेश करण्यात आला.

(2).बीड जिल्हा औरंगाबाद विभागाच्या पश्‍चिमेस मध्यभागी वसलेला आहे. हा जिल्हा 18.28 ते 19.28 या उत्तर
अक्षांशावर आणि 74.54 ते 76.57 या पूर्व रेखांशावर आहे. जिल्हयाच्या उत्तरेस औरंगाबाद व जालना, पूर्वेस परभणी
व लातूर हे जिल्हे आहेत. दक्षिणेस उस्मानाबाद व अहमदनगर तर पश्‍चिमेस अहमदनगर जिल्हा आहे. गोदावरी ही या
जिल्हयाची महत्वाची नदी असून ती प्रामुख्याने जिल्हयाच्या उत्तर सीमेच्या गेवराई व माजलगांव या तालुक्‍याच्या
सरहद्यीवरुन वाहते.

(3) बीड जिल्हा दख्खनच्या काळया थरांच्या दगडांच्या प्रदेशात वसलेला आहे. बालाघाटची पर्वत रांग ही जिल्हयातील
प्रमुख पर्वतरांग असून ती पश्‍चिमेकडे अहमदनगर जिल्हयाच्या सिमेपासून पूर्वेला जिल्हयाच्या सिमेपर्यंत पसरली आहे.
या पर्वत रांगांमुळे जिल्हयाचे दोन भाग पडले आहेत. उत्तरेकडील सखल प्रदेश गंगथडी म्हणून ओळखला जातो आणि
दुसरा उंचावरील प्रदेश घाट किवा बालाघाट म्हणून ओळखला जातो. येथे 2500 फुटापेक्षा उंच अशी अनेक शिखरे
आहेत. बालाघाट विभागाची समुद्रसपाटी पासूनची उंची 2000 ते 2200 फुटा पर्यंत आहे व गंगथडी प्रदेशाची उंची
1200 ते 1500 फुटापर्यंत आहे. आष्टी तालुक्याची उंची 1750 ते 2000 फुट आहे. उत्तरेकडील उंच प्रदेशाचा उतार
दक्षिणेला व आग्नेय दिशेला आहे. आष्टी तालुक्याचा उतार सर्वसाधारणपणे दक्षिणेकडे आहे. उत्तरेकडील भाग
गोदावरीच्या खो-यात आहे व दक्षिणेकडील भाग मांजरा या गोदावरीच्या उपनदीच्या खो-यात आहे.

(4)._ क्षेत्रफळ व प्रशासकीय विभाग- जिल्हयाचे एकूण क्षेत्रफळ 10693 चौ. कि. मी. असून ते महाराष्ट्राच्या 3.45
टक्के एवढे आहे. या क्षेत्रफळापैकी 158.31 चो.कि.मी. क्षेत्रफळ नागरी भागात असून 10534.69 चौ.कि.मी. क्षेत्रफळ
ग्रामीण भागात आहे. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने जिल्हयाचे 6 महसुली विभाग पाडण्यात आले असून ते
1.बीड,2.गेवराई,3.आष्टी,4.माजलगाव,5.अंबाजोगाई,6.परळी येथे आहेत.या उपविभागाकरिता स्वतंत्र उपजिल्हाधिकारी
कार्यालये आहेत. जिल्ह्यात 11 तालुके असून नागरी विभाग वगळता 11 पंचायत समित्या आहेत.या सर्व पंचायत
समित्यांसाठी बीड येथे जिल्हा परिषद कार्यरत आहे.

(5) जनगणना 2011 नुसार जिल्ह्यात एकूण 1357 वस्ती असलेले गांवे आहेत. एकूण 1020 ग्रामपंचायती पैकी 832
स्वतंत्र व 188 गट ग्रामपंचायती आहेत. तसेच 1 नगरपंचायत आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने आष्टी,पाटोदा,शिरुर-
कासार व वडवणी येथे नगरपंचायत स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. जनगणना2011 नुसार जिल्ह्यात नविन
2 नागरी क्षेत्र म्हणुन केज व आष्टी तालुक्‍यातील काही भाग समाविष्ट करण्यात आला असल्याने जिल्ह्यात
एकुण 8 नागरी क्षेत्रे निमीण झाली आहेत. जिल्ह्यात 8 नागरी क्षेत्रापैकी बीड अ वर्ग नगर परिषद आहे. Click Here PDF

Asha Transcription

Check Also

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी …

Leave a Reply