भारत माझा देश आहे निबंध | Bharat Maza Desh Aahe Marathi Essay

मित्रांनो आजच्या या लेखात आपण भारत माझा देश आहे निबंध (bharat maza desh aahe nibandh) या विषयावरील मराठी निबंध पाहणार आहोत

भारत माझा देश आहे | bharat maza desh aahe nibandh

भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे….’

आपण सर्वांनी हि प्रतिज्ञा खुपदा शाळेत ऐकली आहे.. एका गोष्टीचा विचार केला ते या प्रतीज्ञेमध्ये ” भारत माझा देश आहे” अस म्हंटल आहे. आपला देश आहे अस नाही इथे.. कारण आपण एखादी वस्तू आपली आहे असा जेव्हा विचार करतो त्यापेक्षा वस्तू माझी आहे असा विचार केल्यावर त्या वस्तूची जास्त काळजी घेतो.. म्हणून भारत हा माझा देश आहे.. आणि माझ्या देशाची काळजी मलाच घ्यावी लागेल असा विचार प्रत्येकाच्या मनात भिडायला हवाय.. तरच आपल्या देशाची प्रगती सर्वोत्तम होईल..

आपल्या देशाला स्वतंत्र मिळून अनेक वर्षे झाली.. परंतु अजून आपल्याला गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधीनता यांसारख्या अनेक बाबतीत आपल्याला स्वतंत्र नाही मिळाले.. गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यातून बाहेर पडून आपण आपली प्रगती करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू कि आम्ही स्वतंत्र झालो.. यासाठी सर्वांना मिळून अथक परिश्रम करावे लागेल.. जशी आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव असते तशीच आपली कर्तव्य सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवी.. देशाला स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने विचार केला तर, आपण स्वतः कुठेही कचरा टाकणार नाही असा विचार करायला हवाय.. बाकीचे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात म्हणून आपणही टाकावा हा विचार चुकीचा ठरेल..भारत माझा देश आहे अस आपण म्हणत असू तर जस माझ घर मी स्वच्छ ठेवतो तसा मला माझा देशही स्वच्छ ठेवायला हवाय.. तरच “भारत माझा देश आहे ” अस म्हणण्याचा मला अधिकार असेल..

भ्रष्ट्राचार खूप वाढलाय अस आपण म्हणतो आणि आपणच भ्रष्ट्राचार करतो.. लहान लहान गोष्टीसाठी आपण स्वतः काम लवकर व्हावे म्हणून सरकारी अधिकार्यांना पैसे देतो.. मग कसा आपला देश भ्रष्ट्राचार मुक्त होईल..? नेते मंडळी काहीच काम करत नाही म्हणून आपण ओरडत असतो.. म्हणून काही उच्चभ्रू लोक मतदानाला जात नाही.. कुठेतरी बाहेर सहलीला जातात त्या दिवशी.. आणि दुसऱ्या दिवशी कार्यालयात आल्यावर हेच लोक देशातील समस्यांवर चर्चा करतात.. खरतर या समस्या आपल्या दिसत असतील मग मतदानाला का नाही जात ? मतदानाला जाऊन योग्य उमेदवार निवडून आणा आणि समस्या दूर करा.. आणि देशातील भ्रष्ट्राचाराची घाण स्वतः दूर करा..

भारत माझा देश आहे अस आपल्याला म्हणायचं असेल तर या देशातील भ्रष्ट्राचार, बेरोजगारी, गरिबी, अस्वच्छता आणि अजून सगळ्या समस्यांची घाण दूर करण्यासाठी मला स्वतः पुढाकार घ्यायला हवाय.. आणि माझ्यापासून होणारी सुरुवात लाखो लोकांना जोडेल.. आणि या सगळ्या समस्यांचं अडसर दूर होऊन एका विकसित भारताचा जन्म होईल आणि तेव्हा आपण म्हणू…

सारे जहाँ से अच्छा ..
हिंदोस्ता हमारा…

तर मित्रहो हा होता भारत माझा देश आहे मराठी निबंध. आपणास हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा. आणि Bharat Maza Desh Aahe nibandh इतरणसोबत नक्की शेअर करा.

Read More

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *