C Programming using Xcode

C Programming using Xcode

आपल्याकडे C language मधून प्रोग्रॅम लिहायचा म्हणल्या नंतर TC, TCC, gcc या कंपायलरचा अथवा फार फार तर CodeBlock या IDE बद्दल माहीत असते. कॉलेज, युनिव्हर्सिटी किंवा पर्सनल कंप्युटर Apple Mac मशीन्स आढळत नसल्यामुळे apple mac मशीन्स वर C चा प्रोग्रॅम लिहीता येतो का, कसा लिहायचा, कसा कंपाइल करायचा असे प्रश्न पडू शकतात.

या पोस्ट मध्ये थोडी-फार माहीती या बद्दलच… ऑनलाइन असतांना अगदीच कुणी तुम्हाला X-Code, iOS, OS-X असे शब्द वापरून अडचणीत आणू नये म्हणून…!

तर, Apple या कंपनीची वैशिष्ठे म्हणजे हार्डवेअर व सॉफ्टवेअर हे दोनही ते स्वत:च तयार करतात. Apple च्या कंम्प्युटर हार्डवेअर वर जी ऑपरेटींग सिस्टीम असते तीला शक्यतो OS-X या नावाने ओळखले जाते. गंम्मत म्हणजे या ही ऑपरेटींग सिस्टीम बांधायला UNIX operating systemचाच वापर केला आहे. या उलट Apple चे जे iPhone, iPad, iPod touch आहेत त्यावरील ऑपरेटींग सिस्टीमला i-OS असे नावाने ओळखले जाते.

OS-X हि ऑपरेटींग सिस्टीम संपुर्णपणे C, C++ आणी Objective-C मध्ये डेव्हलप केली आहे… हि UNIX base Graphical User Interface ऑपरेटींग सिस्टीम असल्यामुळे Apple ने ऑपरेटींग सिस्टीम मध्ये UNIX मधील X X या अक्षराचा वापर केला आहे.

Apple च्या जवळपास सर्व डेस्कटॉप ऑपरेटींग सिस्टीम्सची versions हि Cat family वरून घेतली आहेत जसे की Cheetah, Puma, Jaguar, Tiger, Leopard, Snow Leopard, Lion, Mountain Lion वगैरे. बाकी नावे आहेत ती Kodiak व सध्याचे Yosemite हि अमेरीके मधील काही पर्यटन स्थळावरून घेतली आहेत.

याशिवाय iOS हि सर्व मोबाइल ऑपरेटींग सिस्टीम ची versions लिहीण्यासाठी सुद्धा C, C++, Objective C सहीत swift या नव्या language चा वापर केला आहे. अर्थात डेस्कटॉप प्रमाणे याला नावे न शोधता iOS-4, iOS-5, iOS-6, iOS-7 आणी आत्ताची iOS-8 अशीच नावे दिली आहेत.

या दोनही प्रकारच्या ऑपरेटींग सिस्टीम बरोबर Xcode नावाचे जे पॅकेज आहे त्यामध्ये सर्व प्रकारची डेव्हलपमेंट टुल्स provide करून दिली आहेत. म्हणून Xcode ला Interactive Development Environment (IDE) असे म्हणतात. हे पॅकेज जर तुम्ही Apple mac मशीन वर घेतले तर C language वापरून IDE मध्ये प्रोग्रॅमिंग करू शकता अथवा Linux प्रमाणे terminal window चा वापर करून regular gcc commands देउन प्रोग्रॅम कंपाइल व रन करू शकता.

Check Also

Real Constants in C

Real Constants in C Language मराठी मध्ये आपण ज्याला अपुर्णांक म्हणतो त्याला इंग्रजी तसेच प्रोग्रॅमिंग …

Leave a Reply