Category: health tips

सतत कॅम्प्युटरसमोर असता? मग अशी घ्या डोळ्यांची काळजी!

सतत कॅम्प्युटरसमोर असता? मग अशी घ्या डोळ्यांची काळजी!

डोळे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे.

सतत कॅम्प्युटरसमोर असता? मग अशी घ्या डोळ्यांची काळजी!

मुंबई : डोळे ही निसर्गाची अनमोल देणगी आहे. पण अनहेल्दी लाईफस्टाईल, केमिकल्स, प्रदूषण यामुळे डोळे खराब होतात. त्यांचे आरोग्य बिघडते. तसंच आजकाल वाढलेला कॅम्प्युटर, लॅपटॉपचा, मोबाईलच्या वापरामुळेही डोळ्यांचे आरोग्य बिघडते. अशा या धावपळीत डोळ्यांचे आरोग्य बिघडू नये म्हणून खास टिप्स…

# आठवड्यातून एकदा डोळ्यांना आय लोशन, त्रिफळा चुर्ण किंवा गुलाबपाण्याने साफ करा. त्यामुळे डोळ्यात गेलेली धूळ, माती, किटाणू दूर होतील आणि डोळ्यांची चमक वाढेल. ही ‘६’ लक्षणे देतात डोळे थकल्याचे संकेत!

 

# सकाळच्या वेळेस हिरवळीवर अनवाणी चालण्याने देखील डोळ्यांना आराम मिळतो. उन्हात बाहेर पडताना सनगॉसेस किंवा छत्रीचा वापर अवश्य करा. या ‘३’ कारणांसाठी हिरवळीवर अनवाणी चालणे ठरते फायदेशीर!

 

# टी.व्ही. थोडा दूरुनच पाहणे योग्य ठरेल. दिवसभर कॅम्प्युटरवर काम करत असाल तर अॅँटी ग्लेअर चश्मा वापरणे फायद्याचे ठरेल.

# रात्री उशिरापर्यंत जागल्याने आणि सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यासाठी वेळेवर झोपा आणि ६-८ तासाची झोप पूर्ण करा.

# डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी काम करताना मध्ये मध्ये डोळे बंद करत जा आणि त्यावर दोन्ही हातांचे तळवे हलकेच ठेवा. डोळ्यांना आराम मिळेल.

# काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि आरामात झोपा. काही मिनिटातच डोळ्यांचा थकवा कमी होईल. कच्च्या बटाट्याच्या रसात कापूस भिजवून डोळ्यांवर ठेवल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर होतील.

म्हणून काही मुली सिंगल राहणेच पसंत करतात!

म्हणून काही मुली सिंगल राहणेच पसंत करतात!

आयुष्यात जोडीदार हवाच. त्याच्याशिवाय आयुष्य घालवणे काहीसे कठीण होते, असे बोलले जाते.

...म्हणून काही मुली सिंगल राहणेच पसंत करतात!

मुंबई : आयुष्यात जोडीदार हवाच. त्याच्याशिवाय आयुष्य घालवणे काहीसे कठीण होते, असे बोलले जाते. पण तरी देखील काही मुली सिंगल राहणे पसंत करतात. वयाबरोबर बदलत गेलेले विचार त्यांना अशा निर्णयापर्यंत आणतात. पण मुली असा निर्णय का घेतात? यामागचे कारणं तुम्हाला माहित आहे का? तर मग जाणून घेऊया मुलींच्या सिंगल राहण्यामागे नक्की काय उद्देश असतो…

करिअरला महत्त्व

लग्नानंतर करिअरवर परिणाम होईल, असे अनेक मुलींना वाटते. कारण लग्नानंतर घर, संसार, ऑफिस अशी तारेवरची कसरत करावी लागते. लग्नानंतर मुलांच्या आयुष्यात फारसा बदल होत नाही. पण मुलींना नवीन परिवाराशी जुळवून घेणे, अशा विविध बदलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे करिअरवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत होऊ शकणार नाही, असे अनेकींना वाटत असते.

एकटेपणातच मिळतं समाधान

अनेक मुली अशा आहेत ज्यांना कामानंतर एकटं राहण्यातच समाधान मिळतं. एकट्या राहुन त्या खूप खूश असतात. वयानुसार किंवा वेळेनुसार त्यांचे विचार परिपक्व झालेले असतात. मॅच्युरिटी आलेली असते.

स्वातंत्र

सासरी गेल्यावर सासऱ्यांच्या हिशोबाने चालावे लागेल, असे ऐकतच मुली लहानाच्या मोठ्या झालेल्या असतात. सासरी माहेर इतका आराम, स्वातंत्र मिळणार नाही, याची कल्पना मुलींना आधीपासूनच असते. त्यामुळे आत्मनिर्भर मुलींना त्यांचे स्वातंत्र हिरावून घेतलेले आवडत नाही.

मनासारखा मुलगा मिळत नाही

मनासारखा मुलगा न मिळाल्यास अनेक मुली सिंगल राहणे पसंत करतात. अशा मुलींना त्यांच्या अपेक्षेत बसणारा मुलगा हवा असतो. तसा मुलगा न मिळाल्यास अॅडजस्ट करण्यासाठी या मुली तयार नसतात.

मुलींच्या सिंगल असण्यामागे ‘स्वतंत्र राहणे’ हे एक कारण असते. लग्नानंतर पावलोपावली इतरांसाठी, नवऱ्यासाठी विचार करणे. मग निर्णय घेणे त्यांना काहीसे पटत नसते. त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आयुष्य व्यतीत करण्यासाठी त्या सिंगल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्यांना कधी कोणाची कमीही जाणवत नाही.

चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण…

चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण…

अन्न शिजवण आणि खाणं टाळलं पाहिजे.

चंद्र ग्रहणादरम्यान जेवलात तर होईल नुकसान कारण...

नवी दिल्ली : आषाढ महिन्याची पोर्णिमा म्हणजे २७ जुलै २०१८ ला वर्षातील सर्वात मोठ चंद्र ग्रहण होतयं.  वैज्ञानिक दृष्टीकोनातून या पूर्ण चंद्र ग्रहणास ‘ब्लड मून’ (Blood Moon) देखील म्हटले जाते. १ तास ४३ मिनिटे हे ग्रहण सुरू राहणार आहे. केवळ भारतच नव्हे तर आस्ट्रेलिया, आशिया, आफ्रीका, यूरोप आणि अंटार्टीकामध्येही हे चंद्रग्रहण असणार आहे.  हिंदू शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीवर १०८ दिवस दिसतो. अशावेळी काही काम टाळणं हेच चांगल असत. हे चंद्रग्रहण १०४ वर्षानंतर होत असून याची सावधनता बाळगणं गरजेच आहे. यावेळी अन्न शिजवण आणि खाणं टाळलं पाहिजे.

अन्न खराब होण्याची भीती 

चंद्र ग्रहणादरम्यान अन्न शिजविणे किंवा खाणं टाळलं पाहिजे. चंद्र ग्रहणादरम्यान वायुमंडलात बॅक्टेरीयाचे प्रमाण वाढते. यामुळे शिजवलेलं जेवणं खराब होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी जेवल्यास आजाराला कारण मिळतं.

शरीराला नुकसान 

चंद्र ग्रहणादरम्यान अन्न खाल्ल्यास शरीरभर सुस्ती येते. या भोजनाने शरीरभर परिणाम केल्यास मृत्यू येण्याची शक्यताही असते.  ग्रहणादरम्यान शिजवलेले अन्न क्षणात खराब होऊ शकतं.

गर्भवती महिलांवर परिणाम 

एका संशोधनानुसार चंद्र ग्रहणाचा मानव प्रजनन, विशेषत: प्रजनन क्षमता,जन्म प्रमाण, मासिक पाळीवर याचा परिणाम दिसतो. गर्भवती महिलांनी चंद्र ग्रहणात बाहेर फिरणं टाळलं पाहीजे. हार्मोनल बदलामुळे शरीरात अस्वस्थता, घाम, भीती आणि थकवा जाणवू लागतो. एवढंच नव्हे तर रक्तदाबाची समस्याही जाणवू लागते.

झोपेवर वाईट परिणाम 

चंद्र ग्रहणाचा झोपेवर परिणाम दिसून येतो. अशावेळी लोकांना झोप टाळण्याचा सल्ला दिला जातो.  चंद्र ग्रहणामुळे व्यक्तीला नीट झोप येत नाही आणि शरीरात थकवा जाणवतो.

रक्तदाब 

चंद्राच्या प्रभावाचा शरीरावर उलट परिणाम जाणवतो. यादरम्यान रक्तदाबामध्ये चढउतार  आणि हृदयाचे ठोके वाढलेले जाणवतात.

म्हणून पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं धोकादायक

म्हणून पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं धोकादायक

 पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा का खाऊ नये याबद्दल आपण जाणून घेऊया..

...म्हणून पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं धोकादायक

मुंबई : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाळ्याने हवेत गारवा निर्माण होतो आणि मनाला शातंता मिळते. त्याचप्रमाणे पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर वाईट परीणामही होतो.  अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या पाहून खाण्याची ईच्छा होत असेल तर जरा थांबा ! कारण पावसाळ्यात उघड्या डोळ्यांनी न दिसणारे खूप प्रकारचे किटाणू आणि किडे त्यावर असतात. तुम्ही जर डाएट किंवा वजन कमी करण्याच्या विचारात आहात तर पालक, ब्रॉकूली, कोशींबीर करत असाल तर त्याचे तोटेही जाणून घ्या. पावसाळ्यात जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायच्याच असतील तर त्यांना मीठ किंवा लोणी लावून नंतर पाण्याने धुवून खाणे आरोग्यासाठी केव्हाही चांगले. पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचा का खाऊ नये याबद्दल आपण जाणून घेऊया..

भाज्यांमध्ये किटकांच घर

पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि पालक यासारखे पदार्थ खाऊ नये कारण कीटक यामध्ये आपले घर बनवतात. त्यांना आपण उघड्या डोळ्यांनी पाहूही शकत नाही. या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढतात.

इन्फेक्शनचा धोका

पावसाळ्यात या भाज्या धुवूनही त्याची घाण बाहेर पडत नाही. या भाजीपाला मुख्यत्वे दलदलीच्या जमिनीतून येत असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक असतो.

सुर्यप्रकाश नाही 

मान्सूनमध्ये सुर्यप्रकाश भाज्यांपर्यंत न पोहोचल्याने किटाणूंची संख्या वाढते आणि तशा भाज्या खाल्ल्याने शरीरात संसर्गजन्य रोगांना आमंत्रण मिळते.

बनावट रंगाचे इंजेक्शन 

भाज्या हिरव्या आणि चमकदार भासविण्यासाठी रंग भरलेल्या इंजेक्शन दिले जाते. बनावट रंगाचा परीणाम शरीरावर होत असतो.

अस्वच्छ भाज्या

रस्त्यावरील हिरव्या पालेभाज्यांनी बनलेले पदार्थ खाऊ नका. त्या चांगल्या प्रकारे धुतल्या गेल्या नसतात. त्यामुळे पोटात बॅक्टेरीया गेल्याने इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे अपचन, जंत, ताप येऊ शकतो.

मूतखडा टाळायचाय ? ‘या’ पदार्थांपासून रहा दूर

मूतखडा टाळायचाय ? ‘या’ पदार्थांपासून रहा दूर

अनेकांना किडनीस्टोनचा त्रास होतो.

मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थांपासून रहा दूर

मुंबई : अनेकांना किडनीस्टोनचा त्रास होतो. हा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी न पिणं, आहाराचं पथ्यपाणी न सांभाळल्याने किडनीस्टोनचा त्रास बळावतो. काही रूग्णांमध्ये किडनीस्टोनचा त्रास हा वारंवार उद्भवण्याचीही शक्यता असते. म्हणूनच किडनीचं आरोग्य जपायचं असेल तर आहारात सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे.

का खाणं टाळाल ?

किडनीस्टोनचा त्रास असणार्‍यांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मुबलक आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न पिणं हे किडनीस्टोनचा त्रास होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. किडनीस्टोनच्या रूग्णांनी भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अधिक बीया असलेल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावे. यामुळेदेखील किडनीस्टोनचा त्रास वाढू शकतो.

कोणत्या भाज्या टाळाल? 

भेंडी, टोमॅटो अशा भाज्यांचा वरचेवर आहारात समावेश करत असाल तर तो टाळा. अशा भाज्यांचा आहारात समावेश करायचा झाल्यास बीया काढून इतर भाग आहारात समाविष्ट करू शकता. भाज्यांप्रमाणेच पेरू, डाळिंबचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. वैद्यांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा.

किडनीस्टोन / मुतखड्यावर उपाय ? 

किडनीस्टोन किंवा मुतखड्याचा आकार लहान असल्यास किंवा सुरूवातीच्या टप्प्यावरच त्याचे निदान झाल्यास काही नैसर्गिक उपायांनीदेखील त्यापासून सुटका मिळू शकते. मात्र 5 मिमी पेक्षा त्याचा आकार मोठा असल्यास शस्त्रक्रियेच्या मदतीनेच मुतखडा काढला जातो. किडनीस्टोन कोणत्या जागी आहे यावरही त्याचा त्रास, वेदना अवलंबून असतात. त्यामुळे तज्ञांच्या मदतीनेच उपचारपद्धतीची निवड करणं अधिक सुरक्षित आहे.

%d bloggers like this: