Category: marathivyakran

शब्दसंपदा

शब्दसंपदा

शब्दसमूहाबद्दल एक शब्द

(1) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था – पाणपोई
(2) गावाचा कारभार – गावगाडा
(3) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा – उधळ्या
(4) सतत उद्योग करणारा – दीर्घोद्योगी
(5) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे – परोपजीवी
(6) जे विसरता येणार नाही असे – अविस्मरणीय
(7) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा – आस्तिक
(8) जाणून घेण्याची इच्छा असलेला – जिज्ञासू
(9) तीन रस्ते मिळतात ती जागा – तिठा
(10) घोड्यांना बांधण्याची जागा – पागा

समान अर्थाचे शब्द

समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाशी समसमान अर्थव्याप्ती आणि वापराची व्याप्ती असलेला, त्याच भाषेतला दुसरा शब्द किंवा शब्दसमूह.

(1) तोंड = आनन , मुख, वदन
(2) दैत्य = दानव, राक्षस, असुर
(3) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
(4) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
(5) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी
(6) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
(7) आनंद = हर्ष, मोद, संतोष
(8) दिवस = वार, वासर, अहन
(9) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
(10) पान = पर्ण, पत्र, पल्लव

विरुद्धार्थी शब्द

(1) हिरमुसलेला x उत्साही
(2) स्वार्थ x परमार्थ
(3) विलंब x त्वरा
(4) सुटका x अटक
(5) सुभाषित x कुभाषित
(6) इहलोक x परलोक
(7) तेजी x मंदी
(8) पुरोगामी x प्रतिगामी
(9) श्रेष्ठ x कनिष्ठ
(10) स्वच्छ x घाणेरडा

शब्द एक – अर्थ अनेक

(1) मान – आदर, स्वाभिमान, शरीराचा एक अवयव
(2) तीर – नदीचा काठ, बाण
(3) दल – सैन्याची तुकडी, फुलाची पाकळी
(4) वजन – माप, वचक, प्रतिष्ठा
(5) खूण – चिन्ह, सूचना, इशारा, संकेत
(6) पक्ष – पंख, बाजू, भाग, श्राद्ध
(7) पूर – नगर, शहर, पाण्याचा पूर
(8) वर – पती, आशीर्वाद
(9) नाद – आवाज, छंद, आवड
(10) काळ – वेळ, मृत्यू

समूहवाचक शब्द

(1) पक्ष्यांचा – थवाकळा
(2) किल्ल्यांचा – जुडगा
(3) हत्तींचा – कळप
(4) दुर्वांची – जुडी
(5) प्राण्यांचा – जथा
(6) मुलांचा, मुलींचा – घो
(7) खेळाडूंचा – संघ
(8) भाकऱ्यांची – चवड
(9) तारकांचा – पुंज
(10) फळांचा – घोस

आलंकारिक शब्दयोजना

(1) एकत्र येऊन कारस्थान करणारे लोक – चांडाळचौकडी
(2) नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस – धर्मराज
(3) वेडेवाकडे बोलणे – मुक्ताफळे
(4) कलहप्रिय स्त्री – कैकेयी
(5) अतिशय बुद्धिमान व्यक्ती – ब्रह्मदेव
(6) अप्राप्य गोष्ट – मृगजळ
(7) अत्यंत रागीट माणूस – जमदग्नी
(8) अत्यंत कुरूप स्त्री – कुब्जा
(9) तात्पुरती विरक्ती – स्मशानवैराग्य
(10) गुणकारी उपाय – रामबाण

मराठी संज्ञा

मराठी संज्ञा

 

संज्ञा वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषांची देवाण – घेवाण होते.

इतर भाषांतील अनेक शब्द आपल्या भाषेत रूढ होतात. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांच्या कामकाजांच्या संदर्भात किंवा रोजच्या बोलण्या – लिहिण्यातही त्यांचा सर्रास वापर केला जातो.

इंग्रजी भाषेतील असे अनेक शब्द मराठी भाषेत रूढ झाले आहेत. अशा शब्दांना पारिभाषिक संज्ञा म्हणतात.

संज्ञा आणि त्याचे अर्थ पुढीलप्रमाणे :

प्लॅटफॉर्म (व्यासपीठ)
याचा अर्थ लाकडाचा किंवा दगडाचा चौथरा होतो.

चर्चमध्ये मेरी आणि येशूच्या मूर्तीपुढे जी रिकामी जागा असते तिला प्लॅटफॉर्म म्हणतात. ज्या ठिकाणी उभे राहून वक्ता भाषण करतो, चर्चा, कथाकथन, परिसंवाद, काव्यवाचन अशा गोष्टी जेथे सादर केल्या जातात.

त्यालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. विचार मांडणे, चर्चा करणे या गोष्टी ज्या उपक्रमाद्वारे केल्या जातात त्या उपक्रमालाही प्लॅटफॉर्म म्हणतात.

स्टेशनला रेल्वे जेथे उभी राहते त्यालाही प्लॅटफॉर्म म्हणतात. प्लॅटफॉर्म हा शब्द अशा प्रकारे वेगवगळ्या संदर्भात वापरला जातो.

फिचर
फिचर याचा अर्थ आकार किंवा एखाद्या व्यक्तीच्या नाकाडोळ्यांची ठेवण. साधारणत: चांगल्या ठेवणीच्या संदर्भातच हा शब्द वापरला जातो.

मासिकातल्या किंवा वृत्तपत्रातल्या एखाद्या लेखालाही फिचर म्हणतात. तीन तासांच्या पूर्णवेळ चित्रपटाला फिचर फिल्म म्हणतात.

फ्लॅश (झोत)
पाणी किंवा प्रकाश यांच्या संदर्भात हा शब्द वापरतात. एखादी गोष्ट मनात चमकून जाणे यालाही फ्लॅश होणे म्हणतात. फ्लॅश टाकणे ही क्रिया जास्तकरून रंगभूमीच्या संदर्भात वापरली जाते.

एखाद्या घटनेवर किंवा व्यक्तीवर फ्लॅश टाकला की बाकी सर्व गोष्टी अंधारात जाऊन तेवढयाच एका गोष्टीवर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित होते. भूतकाळातील घटना दाखवण्यासाठीही या तंत्राचा वापर केला जातो.

क्लोज – अप (समीप दृश्य)
‘क्लोज-अप’ याचा अर्थ जवळून चित्रित केलेले दृश्य.

एखाद्या गोष्टीचे चित्रीकरण खूप बारकाव्याने करायचे असले म्हणजे कॅमेरा व ते दृश्य किंवा व्यक्ती यांच्या मधले अंतर कमी करावे लागते, यालाच क्लोज-अप म्हणतात.

चित्रीकरण किंवा फोटोग्राफी यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो.

डायरेक्टर (दिग्दर्शक)
नाटक सिनेमांतील पात्रांची निवड करणे, प्रत्येक दृश्याची पार्श्वभूमी ठरवणे, नट-नटयांना अभिनयाच्या बाबतीत सूचना देणे हे दिग्दर्शक करत असतो. एक प्रकारे नाटक-सिनेमा यांच्या संदर्भात डायरेक्टर हा सर्वेसर्वा असतो.

अर्थातच नाटक-सिनेमा यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. काही बँकांच्या किंवा कंपन्यांच्या संचालकालाही डायरेक्टर म्हणतात.

अॅक्शन (अभिनय)
मनात जाग्या झालेल्या भावनेला अनुसरून हावभाव करणे, मुद्रेने, अंगविक्षेपाने मनातले भाव व्यक्त करणे यालाच अॅक्शन म्हणतात. आपण नेहमीच मनात उद्भवणाऱ्या भावांनुसार हावभाव करतो पण अॅक्शन किंवा अभिनय मात्र जाणीवपूर्वक केला जातो.

अर्थातच त्याचा संदर्भ नाटक, सिनेमा, नृत्य या गोष्टींशी असतो. काही वेळा अॅक्शन हा शब्द कृती या अर्थानेही वापरला जातो. उदा. सरकारने याबाबत तातडीने अॅक्शन घ्यावी.

कॉमेंटरी (निवेदन)
कॉमेंटरी हा शब्द कॉमेंट या शब्दावरून आला. कॉमेंट म्हणजे टीका किंवा भाष्य. अर्थातच एखाद्या गोष्टीच्या चांगल्या वाईट बाजूंबद्दल बोलणे. एखादी गोष्ट घडत असते त्याच वेळी एखादी जाणकार व्यक्ती त्या संबंधीचे भाष्य किंवा निवेदन करत असते.

आकाशवाणी, दूरदर्शन, क्रिकेटचा किंवा कुठल्याही खेळाचा सामना, एखादा कार्यक्रम किंवा मिरवणूक या संदर्भात हा शब्द वापरला जातो.

न्यूज व्हॅल्यू (वार्तामूल्य)
न्यूज (वार्ता) याचा अर्थ काहीतरी नव्याने सांगणे. ‘न्यूज’ म्हणजे महत्त्वाची वार्ता असे म्हणण्यास हरकत नाही. वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन ही प्रसारमाध्यमे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा साद्यंत तपशील देतच असतात. परंतु विशिष्ट संदर्भात एखादी महत्त्वपूर्ण बातमी देणे; हा वेगळा आणि महत्त्वपूर्ण संदर्भ त्या बातमीचे मूल्य ठरवतो. त्याला न्यूज व्हॅल्यू म्हणतात.
उदा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. एखादी बातमी किती खळबळजनक आहे यावर तिचे वार्तामूल्य अवलंबून असते.

सबटायटल (उपशीर्षक)
मुख्य शीर्षकाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी छोटया छोटया उपशीर्षकांचा उपयोग केला जातो, त्याला सबटायटल म्हणतात. जास्तकरून दूरदर्शनच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो.

परकीय भाषेतील चित्रपट दाखवताना तो इतर भाषिकांना कळावा म्हणून त्या त्या भाषेतून उपशीर्षके दिली जातात.

रिहर्सल (तालीम)
रिहर्सल म्हणजे एखाद्या गोष्टीची तालीम करणे. नाटकाचा पहिला जाहीर प्रयोग करण्याआधी केशभूषा – वेशभूषा करून प्रयोग सादर केला जातो, त्याला रिहर्सल म्हणतात. गाण्याच्या रीयाजालाही रिहर्सल म्हणतात.

ऑडियो (श्राव्य)
ऑडियो म्हणजे ऐकू येणारे. आकाशवाणीवरून ऐकू येणाऱ्या कार्यक्रमांना ऑडियो कार्यक्रम म्हणतात.

पोस्टर (फलक)
एखाद्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी मोठमोठी चित्रे किंवा काही मजकूर पोस्टरवर रंगवला जातो. ही चित्रे पत्र्यावर किंवा कापडावर काढली जातात. ती रस्त्यावर उंच ठिकाणी लावतात.

हेतू हा कि या फलकांनी प्रत्येकाचे लक्ष वेधून घ्यावे. एखाद्या सिनेमाची किंवा उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी अशा पोस्टर्सचा उपयोग करतात.

 

वाक्यप्रचार

वाक्यप्रचार

वाक्यप्रचार
शब्दशः होणा-या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रुढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला ‘वाक्यप्रचार’ असे म्हणतात. अर्थात हे वाक्यप्रचार म्हणजे वाक्यांश असतो, ते पूर्ण वाक्य नसते.

उदा.

मूळाक्षर अ

 • अजरामर होणे.

अन्नाला जागणे.

 • अटकळ बांधणे
 • अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
 • अक्षय असणे
 • अंग काढून घेणे
 • अंग चोरणे
 • अंगा खांद्यावर खेळणे
 • अंगात पाणी असणे
 • अंगाला भोक पडणे.
 • अंगात ये
 • अंगावर येणे
 • अंगी लागणे
 • अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
 • अंगावर काटा उभा राहणे

मूळाक्षर आ

 • आगपाखड करणे.
 • आडवा हात मारणे
 • आग लावणे
 • आगीत तेल टाकणे
 • आग ओकणे

मूळाक्षर इ

 • इरेला पेटणे.

मूळाक्षर ई

 • इतिश्री करणे – शेवट करणे

मूळाक्षर उ

 • उचंबळून येणे
 • उंटाच्या गांडीचा मुका घेणे.
 • उंटावरुन शेळ्या हाकणे.
 • उखळ पांढरे होणे
 • उडत्या घोड्यावर चढणे
 • उडत्या पाखराची पिसे मोजणे
 • उर भरून येणे
 • उर फुटून मरने
 • उरावर बसणे
 • उदक सोडणे – हक्क सोडणे
 • उंबराचे फूल – क्वचित भेटणारी व्यक्ती

मूळाक्षर ऊ

मूळाक्षर ए

एडा होने.

मूळाक्षर ऐ

मूळाक्षर ओ

मूळाक्षर औ

मूळाक्षर ऋ

मूळाक्षर क

 • कुरघोडी करणे.
 • कस्पटासमान लेखणे.
 • कट शिजवणे.
 • कानाखाली आवाज काढणे
 • काना मागून येऊन शाहणे होणे
 • कानात जीव ओतणे
 • कान टोचणे
 • कान ओढणे
 • कान लाल करणे
 • कान धरणे
 • कानातल्या कानात सांगणे
 • कानोकानी सांगणे
 • कुंपणाने शेत खाणे.
 • कोंड्याचा मांडा करुन खाणे
 • कान फुंकणे – मनात भरवून देणे
 • कणिक तिंबणे – मार देणे

र ख

 • खडे चारणे
 • खनकावने

मूळाक्षर ग

 • गर्भगळित होणे

मूळाक्षर घ

 • घरकोंबडा होणे
 • घशाशी येणे.
 • घोडा मैदान दूर नसणे.
 • घाम गाळणे
 • घरचा आहेर.
 • घरोबा करणे

मूळाक्षर च

 • चित्त थाऱ्यावर नसणे

मूळाक्षर छ

मूळाक्षर ज

 • जमीनदोस्त करणे
 • जीव शिगेला लावणे.

मूळाक्षर झ

मूळाक्षर ट

 • टरकवने
 • ठेचणे

मूळाक्षर ठ

 • ठसा उमटवने
 • ठेंगा दाखवणे
 • ठासून सांगणे
 • ठणकावने

मूळाक्षर ड

 • डरकाळी फोडणे.
 • डोंगर पोखरून उंदीर काढणे.
 • डोके खाजवणे.
 • डोक्यावर घेणे
 • डोक्यावर बसने
 • डोके लावणे
 • डोकेदुखी
 • डोक्यावरून आपटणे
 • डोके फोडणे
 • डोके दाबने
 • डोके पिकवने
 • डोके खाणे, डोकं खाणे
 • डोके गरम करणे, डोकं गरम करणे
 • डोके शांत ठेवणे, डोकं शांत ठेवणे,
 • डोळा मारणे
 • डोळे दाखवणे
 • डोळे पांढरे करणे
 • डोळे काढणे
 • डोळे वटारणे
 • डोळे मिटणे
 • डोळ्यात तेल घालून पाहणे
 • डोळा लागणे
 • डोळ्याला डोळा नसणे
 • डोळ्यात भरणे
 • डोळ्यातून उतरणे
 • डोळा चुकवणे
 • डोळेलाऊन बसने
 • डोळे भरून येणे

मूळाक्षर ढ

 • ढगभरून येणे

मूळाक्षर ण

मूळाक्षर त

 • तलावारिला पाणी देणे
 • तळ्यात मळ्यात करणे.
 • तोंडाला काळे फासणे
 • तोंड लपवणे
 • तोडला पाणी सुटणे
 • तोंडी लागणे
 • तोंडचे पाणी पळणे
 • तोंड मारणे
 • तोंडो तोंडी येणे
 • तोंडावर येणे
 • तोंडघाशी पडणे
 • तोंड फुटणे

मूळाक्षर थ

 • थवे चारने

मूळाक्षर द

 • दात ओठ खाणे.
 • दोनाचे चार हात करणे – लग्न करणे
 • दात दाखवणे
 • दात पाडणे
 • दात खाणे
 • दाणादाण करणे

मूळाक्षर ध

 • धचा मा करणे
 • धूळ चारणे.
 • धर्म करता कर्म उभे राहणे.
 • धन करणे.

मूळाक्षर न

 • नाकाने कांदे सोलणे
 • नाकातलं काढून ओठावर ठेवणे
 • नाक मुरडणे
 • नाक कापणे
 • नाकात दम आणणे
 • नका समर चालणे
 • नाक नसणे
 • नाकी नऊ येणे
 • नाक खुपसणे
 • नाक दाबणे
 • नाक वर असणे
 • नाकावर पाडणे
 • नाडी पकडणे
 • नाट लागणे
 • नव्याचे नऊ दिवस

मूळाक्षर प

 • पाचवीला पुजलेले असणे.
 • पोटात दुखणे
 • प्रेताच्या टाळु वरचे लोणी खाणे.
 • पळता भुई थोडी होणे
 • पाण्यात पाहणे
 • पाणी पाजणे
 • प्राण पणाला लावणे.
 • पाने पुसणे.
 • पासंगाला न पुरणे.

मूळाक्षर फ

फूस लावणॆ

मूळाक्षर ब

 • बाऊ करणे
 • बादरायण संबंध जोडणे

मूळाक्षर भ

 • भाव खाणे.
 • भान हरपणे.

मूळाक्षर म

 • मोर पिस फरवलया सारखे वाटणे
 • मन भरून येणे
 • मूग गिळून गप्प बसणे .
 • मधाचे बोट लावणे – खोटी अशा लावणे

मूळाक्षर य

 • येथे नाचत माशे चलते

मूळाक्षर र

 • राम नसणे.
 • राम राम ठोकणे.
 • रत्रिचा दिवस करणे.

मूळाक्षर ल

 • लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.
 • लंकेची पार्वती होणे

मूळाक्षर व

 • वड्याचे तेल वांग्यावर काढणे.
 • वाटाण्याच्या अक्षता लावणे.
 • वेड पांघरुन पेडगावला जाणे.
 • वारी करणे.

मूळाक्षर श

 • शाळा होणे.
 • शाळा घेणे.
 • शक्कल लढवणे

मूळाक्षर ष

मूळाक्षर स

 • स्वर्ग दोन बोटे उरणे
 • सुतावरून स्वर्ग गाठणे
 • सुंठीवाचून खोकला जाणे
 • सलगी आसने
 • संगोपन करने
 • सरड्याची धाव कुंपणापर्यंत

मूळाक्षर ह

 • हळहळ होणे.
 • हिरवा कंदील दाखवणे.
 • हात देणे.
 • हात दाखवणे.
 • हात टेकणे.
 • हात पसरणे.
 • हात हलवत परतणे.
 • हात लावणे.
 • हात हातात घेणे.
 • हाती लागणे.
 • हपापा चा माल गपापा करणे
 • हात मिळवणे
 • हात साफ करणे.
 • हात मारणे
 • हात घालणे
 • हात असणे
 • हाती येणे
 • हाती घेणे

मूळाक्षर क्ष

मूळाक्षर ज्ञ

अलंकार

अलंकार

अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते. तसेच लेखक कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दांतून, विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात. यालाच आलंकारिक भाषा म्हणतात. अलंकार हा मुळातले सौंदर्य वाढवणारा घटक आहे.

उदा.
ढगांशी वारा झुंजला रे
काळाकाळा कापुस पिंजला रे
आतां तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !

भाषेचे अलंकार :

भाषेला ज्याच्या – ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना ‘भाषेचे अलंकार’ असे म्हणतात. केव्हा दोन वस्तूंतील साम्य दाखवून, तर केव्हा विरोध दाखवून , केव्हा नाद निर्माण करणारे शब्द वापरुन, तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा पारिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. केव्हा शब्दांतील अक्षररचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौदर्य खूलून दिसते.

भाषेच्या अलंकारांचे दोन प्रकार होतात.
(1) शब्दालंकार
(2) अर्थालंकार

शब्दालंकार अलंकाराचे उपप्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे :

(1) अनुप्रास
(2) यमक
(3) श्र्लेष

अनुप्रास
जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्यनिर्मिती होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

उदा.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी ।
गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी ।

यमक 
जेव्हा पद्यचरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात, तेव्हा यमक अलंकार होतो.

उदा.
राज्य गादीवरी । काढी तुझ्या आठवणी
फळा आली माय । मायेची पाठवणी

श्र्लेष 
वाक्यात किंवा पद्यचरणात एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थांनी वापरल्यामुळे शब्दचमत्कृती साधली जाते, तेव्हा श्र्लेष अलंकार होतो.

उदा.
(a) हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस.
(b) शंकरासी पूजिले सुमनाने.

अर्थालंकार अलंकाराचे काही उपप्रकार पुढीलप्रमाणे :-

(1) उपमा
(2) उत्प्रेक्षा
(3) रूपक
(4) व्यतिरेक
(5) स्वभावोक्ती
(6) दृष्टांत
(7) अतिशयोक्ती
(8) चेतनगुणोक्ती

उपमा 
दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे ‘उपमा’ हा अलंकार होतो.

उदा.
(a) पिठासारखे स्वच्छ चांदणे पडले होते.
(b) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी !

उत्प्रेक्षा 
उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. ज्या दोन वस्तूंची आपण तुलना करतो त्यांतील एक (उपमेय) ही जणू काही दुसरी वस्तू (उपमान) च आहे अशी कल्पना करणे याला उत्प्रेक्षा म्हणतात.

उदा.
(1) अत्रीच्या आश्रमीं । नेलें मज वाटें । माहेरची वाटें ।खरेखुरें।
(2) सतेज डोळे चमचम करती जणुं रत्नें गोजिरी.

रूपक 
उपमेय व उपमान यांत एकरुपता आहे. ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे रुपक हा अलंकार असतो.

उदा.
(1) ऊठ पुरुषोत्तमा । वाट पाहे रमा ।
दावि मुखचंद्रमा । सकळिकांसी ॥
(2) जग ही एक रंगभूमी आहे.

व्यतिरेक 
उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा वर्णन केले असेल तेव्हा ‘व्यतिरेक ‘ हा अलंकार होतो.

उदा.
(1) सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन ।
(2) सावळा ग रामचंद्र । रत्नमंचकी झोपतो ।
त्याला पाहता लाजून । चंद्र आभाळी लोपतो ॥

स्वभावोक्ती 
एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ (हुबेहुब) पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन हाही एक भाषेचा अलंकार ठरतो, याला स्वभावोक्ती अलंकार असे म्हणतात.

उदा.
चिमुकली पगडी झळके शिरी,
चिमुकली तरवार धरी करी;
चिमुकला चढवी वर चोळणा;
चिमुकला सरदार निघे रणा.

दृष्टांत 
एखाद्या गोष्टीचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.

उदा.
लहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ।
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ।

अतिशयोक्ती 
ज्या ठिकाणी एखादी गोष्ट किंवा घटना सांगताना तिचे अवास्तव वर्णन केले जाते व त्यामुळे त्यातील असंभाव्यता स्पष्ट होते, अशा ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार होतो.

उदा.
काव्य अगोदर आले नंतर जग झाले सुंदर ।
रामायण आधी मग झाला राम जानकीवर ॥

चेतनगुणोक्ती 
निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करुन ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार असतो.

उदा.
झडकरि मग बोले शेवंती ती उठून
“मजसम जगतीं या फुल नाहींच अन्य
सुबकचि पिवळा हा रंग माझा पहा ना
मधुर मम सुगंधा कोण घे ना शहाणा ?”

विरामचिन्हे

विरामचिन्हे

 

विरामचिन्हे -आपण संभाषण करताना / बोलताना थांबतो म्हणजेच विराम घेतो आणि तो ज्या चिन्हांनी दर्शविला जातो त्या चिन्हांना विरामचिन्हे असे म्हणतात.

विरामचिन्हचे प्रकार पुढीलप्रमाणे :

(1) पूर्णविराम (.)
(2) अर्धविराम (;)
(3) स्वल्पविराम (,)
(4) अपूर्णविराम (:)
(5) प्रश्नचिन्ह (?)
(6) उद्गारवाचक (!)
(7) अवतरणचिन्ह (“-“)
(8) संयोगचिन्ह (-)
(9) अपसरणचिन्ह (__)
(10) विकल्प चिन्ह (/)

पूर्णविराम (.)
वाक्य पूर्ण झाल्यावर हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात.

उदा.
मानसी शाळेत चालली.

अर्धविराम (;)
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
मी रोनकला कॅाल केला ; पण तिने उचला नाही.

संयोगचिन्ह (-)
दोन शब्द जोडताना व ओळ संपल्यावर शब्द अपुरे राहिल्यास या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
आव्हान-जावं
रिक्षा-टॅक्सी
प्रेम-विवाह

अपसरणचिन्ह (__)
बोलताना विचारमाला तुटल्यास व स्पष्टीकरण द्यायचे असल्यास या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
तो त्याला सांगितले होते पण_

विकल्प चिन्ह (/)
एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
ती बस/रिक्षाने घरी जाईन.

विरामचिन्हे
स्वल्पविराम (,)
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास प्रत्येक शब्दाच्या पुढे या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
जेवायला डाळ, भात केली आहे

अपूर्णविराम (:)
वाक्यातील गोष्टी वाक्यानंतर सांगायच्या असतील तेव्हा या चिन्हाचा वापर होतो.

उदा.
हा पदार्थ करण्याच्या तीन पद्धती आहेत : उकडून, तळून, भाजून

प्रश्नचिन्ह (?)
प्रश्न विचारताना या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
तुम्ही विवाहित आहात की अविवाहित?

उद्गारवाचक (!)
मनातील उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
अरे वा ! किती सुंदर मुलगी.

अवतरणचिन्ह (“-“)
बोलणाऱ्याचे उद्गार जसेच्या तसे देताना या चिन्हाचा वापर करतात.

उदा.
तो म्हणाला, “मी शाळेत येईन”.

%d bloggers like this: