Amazon Big Sell

चिन्हे – मराठी व्याकरण

चिन्हे


विरामचिन्हे – आपण बोलताना एकसाररवे बोलत नाही, वाचतानाही साररवे वाचीत नाही, बोलताना किंवा वाचताना थोडे थांबतो, काही ठिकाणी अर्धवट थांबतो व काही ठिकाणी पूर्ण थांबतो. थांबणे यालाच विसावा किंवा विराम म्हणतात.

(१) पूर्णविराम – जेथे एरवादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्श विण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो.
थांबण्याची रवृण म्हणून (.) असे चिन्ह काढतात. त्याला पूर्ण विराम म्हणतात.

उदा. मिलाप बागेत धावतो. स्नेहलने फुले आणली. सलोरव क्रिकेट रवेळतो.

(२) अर्ध विराम – वाक्यात ज्या ठिकाणी अधिक वेळ थांबावे लागते, परंतु बोलणे मात्र पूर्ण होत नाही.
त्यासाठी (;) हे अर्धविराम चिन्ह वापरतात.

उदा. इतक्यात , आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या
माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाय्यात आमचा सलोरव सापडला.

(३) स्वल्पविराम – वाक्यात जेथे थोडेसे थांबावे लागते, तथे(,) हे स्वल्पविराम चिन्ह देतात. वाक्यात नामे, सर्वनामे, विरोषणे, क्रियापदे इ समान जातीचे अनेक शब्द एकत्र आले तर अशा प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम देतात.

उदा., अक्षयने बाजारातून केळी, द्राक्षे, अंजीर, अननस व कलिंगड ही फळे आणली.

(४) अपूर्ण विराम – जेव्हा वाक्याच्या शेवटी एरवादा तपशील दृयावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्ण
विरामाचे चिन्ह वापरतात.
उदा. मुरव्य क्रतू तीन आहेत: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.

अर्थदर्शक चिन्हे

१) प्रश्‍न चिन्ह – प्रश्‍न विचारण्यासाठी प्रश्‍नार्थक वाक्याच्या शेवटी (2) हे विन्ह वापरतात. त्याला प्रश्‍नचिन्ह म्हणतात.
उदा. तुमच्या हातात काय आहे ? तुम्ही कोणास विचारले ?
टीप – काही वाक्ये आपल्याला प्रश्‍नार्थक वाटतात. पण ती प्रश्‍नार्थक नसून आज्ञार्थक वाक्ये असतात.
उदा. – इंद्रधानुष्य म्हणजे काय, याचा खुलासा करा.

२) उद्‌गार चिन्ह – मनातील हर्ष आश्‍चर्य, दु:रव इ. पेकी कोणती ही भावना व्यक्‍त करणाऱ्या शब्दांच्या शेक्टी (/) हे
उद्‌गार चिन्ह देतात. तसेच केवळ प्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दारवविण्याकरिताच वाक्यात येतात. म्हणून
केवलप्रयोगी शब्दापुढे व त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह देतात.

उदा. अरे बापरे / केवढा मोठा साप हा /
ओहोहो / किती उंच पतंग उडाला हा /

३) अवतरण चिन्ह – महत्त्वाचे शब्द किंवा शब्द समूह किंवा दुसऱ्यांचे म्हणणे (‘)ह्या किंवा (‘“ ) ह्या चिन्हाने
दर्शवीत असतात.

शिक्षक म्हणतात, “मुलांनो, अथ्यासाकडे लक्ष द्या”
लो. टिळकांनी “गीता रहस्य” हा अमोल ग्रंथ लिहिला.

४) संयोग चिन्ह – सामासिक शब्दातील प्रत्येक दोन पदामध्ये (-) ही रवृण असते, तिला संयोगविन्ह असे म्हणतात.

उदा. हरिहर, राम-कृष्ण, गंगा-यमुना इ.

५) अपसारण चिन्ह किंवा स्पष्टीकरण चिन्ह –
एरवद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी (-) या चिन्हाचा उपयोग करतात, त्यास अपसरणचिन्ह म्हणतात.
उदा., – सलोरव आज एक चित्र काढणार होता. पण – – -?
मिलाप एक गाणे गाऊन दारवविणार होता, तेवढ्यात – – -?

Asha Transcription

About admin

Check Also

वाक्य आणि वाक्याचे प्रकार

वाक्‍य वाक्‍य – पुऱ्या अर्थाच्या बोलण्यात दोन किंवा अधिक शब्द असतात. केव्हा केव्हा एका शब्दाने देखील …

Leave a Reply

Your email address will not be published.