Amazon Big Sell

Cycle marathi nibandh

सायकल मराठी निबंध

मर्सडिीज, ऑडी, बीएमडब्लू, डॉज अशा श्रीमंती झगमगाटात सायकल हे वाहन अंग चोरून उभे असते, असे आपल्याला वाटते. परंतु भपकेबाज श्रीमंतीपुढे सायकलचा धट्टाकट्टा साधेपणा आजही लोकांना भावतो. जगभरात इतर वाहनांच्या तुलनेत सायकलची मागणी कैक पटीने वाढत आहे. चीन, जपान, नॉर्वे, स्वीडन, स्विट्र्झलड, नेदरलॅण्ड्स ही जगातील प्रगत राष्ट्रे सायकलचे देश (सायकिलग कंट्रीज) म्हणून ओळखली जातात. हा सर्वार्थाने सायकलचा बहुमान आहे.

वाहतूक ही माणसाची मूलभूत गरज पूर्ण करण्याची जबाबदारी सायकल यशस्वीपणे पार पाडते, हे तर आपण जाणतोच. पण सायकल उपयुक्ततेच्या पलीकडे जाऊन माणसाला प्रवासमग्न करते; त्याला–तिला निखळ आनंद देते. ‘बोलावतो सोसाटय़ाचा वारा मला रसपाना’ असा सुंदर अनुभव देण्याची ताकद साध्यासुध्या सायकलमध्ये आहे. निसर्गाशी प्रामाणिक राहण्याची शपथ सायकलच घेऊ शकते, आलिशान लॅम्बोíगनी नाही.

गेल्या वीस–पंचवीस वर्षांत जगभरात सायकल संस्कृतीचा भरपूर अभ्यास सुरू आहे. यातून सायकलचा एक व्यापक सामाजिक–सांस्कृतिक दस्तावेज तयार होत आहे. अनेक जाणकारांच्या मते, मुंबई हे सायकल शहर म्हणून भरभराटीस येऊ शकते. गेल्या वर्ष–दोन वर्षांत मुंबईच्या उपनगरात रविवारी सकाळी पाच तास सायकलसाठी राखून ठेवण्याची नावीन्यपूर्ण मोहीम सुरू झाली आहे. आणि तिला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून एखाद्या चकचकित इम्पालाला दरदरून घाम फुटू शकतो.

सायकल शारीरिक शक्तीने, दोन चाकी वाहन आहे. जगातील अनेक ठिकाणी वाहतुकीचे, व्यायामाचे आणि खेळाचे मुख्य व स्वस्त साधन आहे. हे साधन तीन तसेच चार चाकी ही असु शकते. सहसा सायकल पायांनी चालविता येणारी व लोखंडी फ्रेम असणारी असते. यात दोन प्रकार मोडतात.सायकल चालवल्याने होणारे प्रदूषण कमी प्रमाणात होईल.जास्तीत जास्त लोकांनी सायकल चालवणे पर्यावरणासाठी व वैयक्तिक आरोग्यासाठीसुद्धा उत्तम आहे.सध्या या धावपळीच्या जीवनात सायकलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सायकलिंग चे महत्व वाढलेले आहे.सायकलही लहाना पासून वृद्ध व्यक्ती चालउ शकतात.सायकल उत्पादनासाठी पंजाब,हरियाना हि राज्ये अग्रेसर आहेत.

पहिली सायकल १८१६ मध्ये पेरीस मधील एका कारागिराने बनवली. गेल्या काही वर्षात सायकलींचे बरेच प्रकार दिसू लागलेत . नवनवीन बदलाच्या सायकल आजकाल सगळीकडे दिसू लागल्या आहेत. गियर वाल्या सायकलींमध्येही अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

सर्वसाधारणपणे सायकल चे ४ प्रकार येतात –

रोड (रेस साठी, वापर फक्त चागल्या रस्त्यांवर),
MTB (कुठेही न्या, अगदी पायवाटातूनही पण मजबुतीसाठी अधिक जड, टायर जाड असल्याने कष्ट अधिक),
हायब्रीड (रोड आणि MTB चा संकरीत प्रकार, नेहमीच्या वापरासाठी) आणि
BMX (कसरती करण्यासाठी).
सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ राहण्यासाठी नियमितपणे रोज अर्धा तास सायकल चालविण्याची गरज आहे. ‘स्टॅटिक सायकलिंग’ म्हणजे घरातच किंवा व्यायामशाळेत सायकलिंगच्या मशीनवर केलेला व्यायाम. वजन कमी करण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतोच, पण मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या लोकांबरोबरच ज्यांचा चालताना मध्येच तोल जाऊ शकतो अशा व्यक्तींनाही स्टॅटिक सायकलिंगचा व्यायाम करता येतो.

एखाद्या अपघातात पायाचे किंवा मांडीचे हाड मोडले, तर ते बरे झाल्यावर पूर्ववत दिनक्रम सुरू होण्याच्या काळात हा व्यायाम करता येतो. बाहेर खुल्या वातावरणात सायकल चालवणे केव्हाही चांगलेच, पण स्टॅटिक सायकलिंग चार भिंतींच्या आत आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली करता येत असल्याने काही आजार असलेल्यांना त्याचा विशेष उपयोग होतो.

भारतातल्या सायकल उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. आपल्याकडे दरवर्षी दीड कोटी सायकलचे उत्पादन केले जाते. साध्या सायकलला फारशी मागणी नसली तरीही सुसज्ज आणि अत्याधुनिक सायकलची लोकप्रियता सतत वाढत आहे. भारतातील हिरो, अ‍ॅटलस, टीआय सायकल्स अशा नामांकित कंपन्यांनी परदेशी सायकल कंपन्यांशी वितरणाचे करार केले आहेत, हे विशेष. गेल्या काही वर्षांत महाविद्यालयीन आणि आयटी–आयआयटीतील युवक–युवती आणि चाळिशी गाठलेले मध्यवयीन नागरिक सायकल पर्यटनाच्या प्रेमात पडले आहेत.

देशाच्या लेह–लडाख, आसाम–आगरतळा किंवा कुलू–मनाली अशा मनोरम किंवा दुर्गम भागांची सायकल रपेट करण्याचा शौक असल्यामुळे सायकलकडे लोकांचा ओढा वाढला आहे. डोंगराळ किंवा खडकाळ भागांत प्रवास करण्यासाठी म्हणून विशेष सायकल तयार केली जाते. अशी सायकल निसर्ग आणि देश–प्रदेश डिस्कव्हर (शोध) करण्याची इच्छा पूर्ण करते. सायकलप्रेमींची पथके दरवर्षी मोठय़ा उत्साहाने दुर्गम–अतिदुर्गम किंवा पहाडी प्रदेशांच्या दौऱ्यास मोठय़ा उत्साहाने निघतात. या मंडळींचा सायकल पर्यटनाचा आनंद दिवसागणिक वाढतोच आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

जगभरातली सायकल विषयातील घडामोडींची इतकी सविस्तर चर्चा करण्याचे कारण म्हणजे मुंबईची जटिल वाहतूक व्यवस्था, गाडय़ांची बेसुमार गर्दी आणि वाढते प्रदूषण या मुंबईच्या दोन समस्यांना पंक्चर करण्याचे काम सायकल सहजपणे करू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. घरून स्टेशन किंवा भाजीबाजार अशा तोकडय़ा अंतरांसाठी ऑटोरिक्षा घेण्याचे खरे तर काहीच कारण नाही. घरात एक सायकल असली की पुरे. आजही मुंबईतली अनेक शाळकरी मुले–मुली सायकलीवरून शाळेत जातात.

रस्त्यावर दहा–बारा शाळकरी मुले सायकलीवरून शाळेच्या दिशेने निघाली आहेत, हे दृश्य मनाला दिलासा देणारे आहे. मुंबईतल्या प्रौढांनी मुलांचे याबाबतीत अनुकरण केले तर प्रदूषण आणि वाहतूक कोंडी या समस्यांना आपोआपच ब्रेक लागेल. सायकल वापरल्याने प्रदूषणाला आळा बसेल. या एका गोष्टीसाठी सायकलींचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. या नवीन वर्षात सर्वानी जर संकल्प केला कि शक्य तिकडे जाण्यासाठी आम्ही सायकल चा वापर करू आणि तो संकल्प तर नित्यनेमाने पाळला तर खऱ्या अर्थाने आयुष्य निरोगी होईल आणि वातावरण दूषित होणार नाही. पण हे कधी होईल?

यासाठी मुंबईसारख्या महानगरात सायकल संस्कृती रुजवणे आणि जोपासणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिका प्रशासनाने आणि सरकारने सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. परंतु त्यासाठी मुळात सायकलच्या फेऱ्या आणि संख्या यांत मोठी वाढ झाली पाहिजे. तसे झाल्यास महापालिकेला आपल्या वार्षकि अर्थसंकल्पात सायकलस्नेही तरतूद करता येईल.

दुसरे, मुख्य रस्ता आणि महामार्गावर चारचाक्यांचा उपयोग होत असतो, परंतु शहराच्या अंतर्गत, एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी किंवा उपनगरांबद्दल बोलायचे झाल्यास एका गावठाण्यातून दुसऱ्या गावठाण्यात जाण्यासाठी सायकलचा उपयोग करण्यावर भर दिला पाहिजे. तरच सायकल संस्कृती रुजण्यास आणि फोफावण्यास मदत होईल. तिसरे, सायकलशी संबंधित सार्वजनिक कार्यक्रम राबविले गेले पाहिजे. सायकल रॅली किंवा सायकल प्रसाराचे उपक्रम मोठय़ा प्रमाणात झाले पाहिजेत.

सध्याच्या भीषण दुष्काळामुळे लोकांना पाण्याचे महत्त्व कळले आहे; समाजात जलसाक्षरता वाढते आहे. त्याचप्रमाणे प्रदूषण, इंधनाची तीव्र टंचाई आणि तिच्यावर होणारा खर्च, रस्तेबांधणी–दुरुस्ती यांवर होणारा अवाढव्य खर्च या सगळ्या समस्यांचे सायकल हे सोपे उत्तर आहे. यासाठी समाजात सायकल साक्षरता रुजणे गरजेचे आहे. मुंबईत फायद्याचा वादा लोकांना पटकन कळतो. सायकलचेही अनेक फायदे आहेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे माणसाचे आरोग्य. रोज सायकलवर किमान तासभर रपेट केली की, साधारण ६०० कॅलेरीज जळण्यास मदत होते.

‘यह सायकल बडी नामी चीज हैं!’

जर तुम्हाला हा निबंध, भाषण आवडले असेल तर कृपया कंमेंट सेकशन मध्ये तुमचं मत कळवा. धन्यवाद. ?

Asha Transcription

About admin

Check Also

Indian Republic Day Essay

प्रजासत्ताक दिन निबंध आमची मातृभूमी भारत बर्‍याच वर्षांपासून ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गुलाम होती, त्या काळात भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published.