देणार्याने देत जावे

Denaryane Det Jave

देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून तुकोबाची
माळ घ्यावी देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे !

admin

Leave a Reply

Next Post

जगायला शिका

Thu May 16 , 2019
Jagayla Shika दु:ख तर प्रत्येकाच्याच नशिबात लिहलेले असते. पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे जाण्याची , ते दुःख पचवून घेण्याची पद्दत वेगवेगळी असते. जो व्यक्ती त्याच्या दुःखाचा जास्त विचार करतो अन् सतत त्या दुःखाला बिलघून राहतो त्याला त्या दुःखाचा खूप ञास होतो. म्हणून दुःख कीती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे […]
WhatsApp chat
%d bloggers like this: