loading...

धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

Dharm Shresth Ki Kayda Marathi Essay

अलीकडच्या काळात रस्त्यांवर साजरे होणारे सार्वजनिक धार्मिक उत्सव, मिरवणूकींमध्ये गर्जणारे कर्णकर्कश डीजे, प्रार्थनास्थळांवरील अनियंत्रित भोंगे, विवाह व घटस्फोट, अपत्य मर्यादा अशा अनेक मुद्द्यांवरून कायद्याने धर्मात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही धर्माचे धार्मिक आचरण इतरांसाठी म्हणजेच सार्वजनिकरित्या मानव जीवनासाठी त्रासदायक ठरू नये ही कायद्याची भुमिका आहे. मानवी जीवन, पर्यावरण व प्रकर्षाने जीवावरण यांना बाधा पोहोचणार नाही. जन्मजात मानवी हक्क अधिकारांचे संरक्षण व्हावे ही कायद्याची भुमिका आहे. मात्र समाजातील काही लोकांना हे धर्मावरील अतिक्रमण वाटते. धर्मामध्ये कायद्याने हस्तक्षेप करू नये, धर्म हा कायद्यापेक्षा प्राचीन आहे, धर्म हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे, धर्म ही आमची वैयक्तिक बाब आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. काहीजण तर अगदी कायद्यालाही आव्हान देतात.
मला कळत नाही कायद्यापेक्षा धर्म श्रेष्ठ असूच कसा काय शकतो?? खरे तर न्याय, संधी, समानता, हक्क अधिकारांची जपणूक हाच खरा धर्म असायला हवा. परंतु प्रत्येक धर्माचे नियम वेगळे असतात! कायदा मात्र सर्वांसाठी एकच असतो, समान असतो. धर्म बदलला जाऊ शकतो परंतु व्यक्तिगणिक कायदा बदलला जाऊ शकत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब आहे तर कायदा ही सार्वजनीक हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. धर्माची निर्मिती कोणी केली? नियम कोणी बनविले? धर्म नियम बनविताना लोकमत व लोकहित लक्षात घेतले होते काय? याचे उत्तर सापडत नाही मात्र कायदे हे लोकांमार्फत निवडलेल्या अथवा लोक मान्यता असलेल्या समित्या, परिषदा व मंडळे यांनी बनविलेले असतात.

loading...

Dharm Shresth Ki Kayda

धर्मातून अनिष्ठ रूढी, परंपरा निर्माण होतात. त्यांनाच पुढे धर्मनियमांचे स्वरूप प्राप्त होते. पुढे काळाच्या कसोटीवर ही विचारसरणी टिकत नाही, परिणामी हे आचरण अयोग्य व अनिष्ट सिद्ध होते, मात्र तरीही त्यात बदल करता येत नाही! तशी धर्मात तरतूदच नसते! जर कोणी त्यात बदल करण्याचा, शुद्धीकरण, उद्बोधन, अथवा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तशी चळवळ सुरू केली तर त्याला धर्मद्रोही सिद्ध केले जाते. कायद्यात मात्र तसे नसते एखादा कायदा अन्यायकारक अथवा विसंगत आढळून आला तर त्यात बदल केला जाऊ शकतो अथवा तो संपुष्टातही आणला जाऊ शकतो.

आजवर धर्मातील अनेक रूढी, परंपरा, प्रघात यांनी मानवाचे शोषण केले आहे. एका ठराविक वर्गाकडे धर्मनियम बनविण्याची, त्यांची अंमलबजावणी करण्याची तसेच नियंत्रण ठेवण्याची, न्याय देण्याची, दंड करण्याची मक्तेदारी होती व आजही आहे. हे सर्व अधिकार वंशपरंपरेने अर्थात जन्मजात प्राप्त होतात.कायद्यात मात्र तसे नसते. आपली बौद्धिक योग्यता सिद्ध करून कोणीही कायद्याचा निर्माता, अमलदार अथवा न्यायदाता बनू शकतो. कायद्याच्या राज्यात जन्माने काहीच मिळत नाही. तिथे धर्म हा निकषही नसतो. धर्माचा काही फायदाही होत नाही व तोटाही होत नाही.

धर्मामुळे शक्तीचे ध्रुवीकरण होते तर कायद्यामुळे विकेंद्रीकरण होते. अनावश्यक उन्माद वा माज वाढीस लागतो, इतरांना आपल्यापेक्षा कमी लेखण्याची मानसिकता बनते, तशीच सवय जडते, द्वेष बळावत राहतो! तर कायदा संयम शिकवितो! बारकाईने पाहता धर्माने दिनदलित, दुर्बल व दुबळे, स्त्रिया, शारीरिकदृष्ट्या असक्षम लोक या समाजघटकांचा काहीही विचार केलेला नाही. या शोषित व दुर्लक्षित लोकसमूहाच्या विकासासाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नाही उलट यांचे अधिकाधिक शोषण कसे होईल याचीच काळजी घेतली म्हटले तर वावगे ठरणार नाही. कायद्याने मात्र या सर्व घटकांना प्राधान्य दिले, न्याय दिला. एवढेच काय तर कायद्याने अगदी पशूपक्षी, वनस्पती ते पर्यावरणाचे अगदी निर्जीव घटक यांनाही न्याय दिला!

कायदा हा स्वतःच्या चिकित्सेची, समीक्षेची, टिकात्मक अभिव्यक्तीची जनतेला अनुमती देतो. असहमत वर्ग सनदशीर मार्गाने कायद्याला विरोध करू शकतो, निषेध नोंदवू शकतो आव्हान देऊ शकतो! कारण कायदा तशी अनुमती देतो नव्हे कायद्यात तशी सोयच केलेली असते मात्र धर्माच्या बाबीत हे करता येत नाही. धर्माला हे स्वतःवरील आक्रमक वाटते. याला धर्मद्रोह संबोधले जाते! आजवरच्या अनेक चिकित्सक संतांना, विचारवंतांना व संशोधकांना याची किंमत मोजावी लागली आहे.

admin

Leave a Reply

Next Post

वाढती बेरोजगारी एक गंभीर समस्या

Thu May 9 , 2019
वाढती बेरोजगारी एक गंभीर समस्या Vadhti Berojgari Ek Ganbhir Samasya Vadhti Berojgari Ek Ganbhir Samasya  -वाढती बेरोजगारी ही प्रत्येक देशासाठी एक गंभीर समस्या होत असते. त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात सुद्धा बेरोजगारीचे प्रमाण वाढले की सरकारची डोकेदुखी पण वाढत असते. भारतासाठी मात्र बेरोजगारीचे चित्र भयावह आहे. नीती आयोगाने नुकताच एक आराखडा […]
loading...
WhatsApp chat
%d bloggers like this: