धुंदीत गाऊ, मस्तीत राहू

धुंदीत गाऊ, मस्तीत राहू
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणा
थंडी गुलाबी, हवा ही शराबी
छेडीत जाऊ, आज प्रीत साजणी

रुपेरी उन्हात, धुके दाटलेले
दूधी चांदणे हे जणू गोठलेले
असा हात हाती, तू एक साथी
जुळे आज ओठी माझ्या गीत साजणा

दवांने भिजावी इथे झाडवेली
राणी फुलांची फुलांनीच न्हाली
ये ना जराशी, प्रिये बाहुपाशी
अशी मिलनाची आहे रीत साजणी

जळी यौवनाचा डुले हा शिकारा
असा हा निवारा, असा हा उबारा
अशा रम्यकाली, नशा आज आली
एकांत झाला जणू आज पाहुणा

Check Also

स्वाभिमान विकू नकोस

Swabhiman Viku Nakos फुलासारखे तळवे तुझे फुलावरच पडू दे. तुझ्या हातून जगाची अमाप सेवा घडू …

One comment

  1. Pingback: earn money android

Leave a Reply