राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS)

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS)

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (NMMSS)
योजने बद्दलचा शासन निर्णय : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्रशासन पुरस्कृत योजना सन 2007-08 या वर्षापासून मे 2008 च्या परिपत्रकानुसार सुरु करण्यात आलेली आहे.महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित(आई-वडिलांचे) रु.1,50,000/- पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्याना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकत्रित(आई-वडिलांचे) रु.1,50,000/- पेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यासाठी असुन सदर योजनेत सर्व प्रवर्गाचा समावेश करण्यात आलेला आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानीत शाळेतील इयत्ता 8 वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी / विद्यार्थीनी या परीक्षेसाठी पात्र असतात
आवश्यक कागदपत्रे : शिक्षणाधिकारी मार्फत राबविण्यात येते.उत्पन्नाचा दाखला रु.1,50,000/-
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : वार्षीक रु.6,000/- शिष्यवृत्ती दिली जाते. इ.9 वी ते 12 वी पर्यत. इ.10 वी नंतर व्यवसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला तर शिष्यवृत्ती बंद होते.
अर्ज करण्याची पद्धत : सदर शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत करण्यात येते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी निकाल घोषित केल्यानंतर मुख्याध्यापक- गटशिक्षणाधिकारी- शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बँक खात्याची माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांचेकडे सादर केली जाते. शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचेकडून राज्याचा एकत्रित प्रस्ताव विहित मुदतीत केंद्रशासनास सादर केला जातो.तसेच प्रत्येक वर्षी इ.10वी इ.11वी,इ.12 वी नुतनीकरणाची माहिती सादर करणे सुध्दा आवश्यक आहे. शिष्यवृत्तीची रक्कम केंद्रशासनामार्फत एस.बी.आय, नवी दिल्ली यांचेकडून ई.सी.एस व्दारे परस्पर संबंधित शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याच्या अचूक बँक खाते क्रमांकावर वर्ग केली जाते. सदरची माहिती ही एका वर्षाच्या आत केंद्रशानास सादर करणे आवश्यक आहे.सन 2015-16 पासुन केंद्र शासनाच्या www.National Scholarship Portal शिक्षणाधिकारी मार्फत सादर करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सदर शिष्यवृत्ती संदर्भात केंद्रशासनाचे मे-2008 चे परिपत्रकानुसार एका वर्षाच्या आत विद्यार्थ्याची बँक खात्याची माहिती केंद्रशासनास सादर करणे आवश्यक आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये केंद्रशासनाकडून सदरचे प्रस्ताव मंजुर करण्यात येऊन साधारणत मे-जून महिन्यापासून शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते.
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.National Scholarship Portal सन 2015-16 पासुन ऑन लाईन करण्यात आलेली आहे.

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

Leave a Reply