एका आईची अंतयात्रा

Eka aaichi antayatra

आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..

कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..

मान खाली घालशील
शरमेने..

खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..

किणार्‍यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात
पण..

आठवेल का रे तुला
माझा खांदा..?

घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..

तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?

सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..

जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..

माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही

admin

Leave a Reply

Next Post

बाप्पा रुसला ह्या वर्षी

Thu May 16 , 2019
Bappa rusla ya varshi बाप्पा रुसला ह्या वर्षी बाप्पा रुसला ह्या वर्षी का बाप्पा रुसला ह्या वर्षी शेतकरी झाला दुःखी पिक पाणी नाय हाती कशे राहू आम्ही सुखी तुझ्या आगमनाची तयारी स्वागताची तयारी केली खरी साऱ्यांनी पण मन खचलंय कुठेतरी तुझ्या भक्तीत काय कसर आम्ही करणार नाय आमच्या उदास मनाचा […]
WhatsApp chat
%d bloggers like this: