EPFO Recruitment 2019 Social Security Assistant 2189 Posts

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत सामाजिक सुरक्षा सहायकांच्या २१८९ जागा

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिनिस्त कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आस्थापनेवरील सामाजिक सुरक्षा सहाय्यक पदांच्या एकूण २१८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधारक आणि कमीत-कमी ५००० Key’s डेटा इंट्री करण्यास सक्षम असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २१ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग / माजी सैनिक/ महिला उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

परीक्षा – ३१ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्व परीक्षा आणि 1 सप्टेंबर २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

admin

Leave a Reply

Next Post

Maharashtra Police Bharti 2019 - पोलीस भरतीची तारीख जाहीर..

Mon Jul 1 , 2019
Maharashtra Police Bharti 2019 महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्या अंतर्गत “महा-पोलीस भरती २०१९” करीता महाराष्ट्र पोलीस खात्याकडून पोलीस शिपाई भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर भरती परीक्षा हि ऑनलाईन होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. ऑनलाईन अर्ज – CLICK HERE जाहिरात बघा – CLICK HERE   क्रमांक-सेप्रनि-९८१८/प्र.क्र.३१३/पोल-५अ, […]
WhatsApp chat
%d bloggers like this: