इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण ( 22022523)
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • 1) शासन निर्णय शिक्षण व सेवायोजन विभाग क्रमांक एफईडी-1983/15672/साशि-5दिनांक 24 ऑगस्ट 1983 अन्वये राज्यातील शासनमान्य अनुदानित माध्यमिक शाळांतील मुलींना इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला.
  • 2)शा.नि क्र.एफईडी 1084/(2568)/साशि-5 दि.6/3/1986
  • 3) शा.नि.क्र. एफईडी/1084/(2568)/साशि-5 दि.6/2/1987
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश : राज्यातील सर्व मुलींना इ. 12 वी पर्यत शिक्षण मिळण्यासाठी प्रोत्साहन देणे.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटी : पुन्हा शासनाने राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या हेतूने 6फेब्रुवारी 1987 पासून 1ली ते 12वी पर्यंतचे शिक्षण सर्वच मुलींना मोफत केलेले आहे .या योजनेचा समावेश 1ली ते 10 वी पर्यत सर्वांना मोफत शिक्षण या योजनेत 1996-97 पासून झाला आहे.त्यामुळे सद्यस्थितीत इयत्ता 11वी 12वी या दोन इयत्तातील फक्त मुलींचा समावेश या योजनेत होतो. शैक्षणिक वर्षात किमान या सवलतीसाठी 75 टक्के उपस्थिती आवश्यक आणि समाधानकारक प्रगती या अर्टींवर पुढील शैक्षणिक वर्षी ही सवलत चालू राहाते.एखादी विद्यार्थीनी शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास आणि तीने त्याचवर्षात पुन्हा प्रवेश घेतल्यास विद्यार्थीनीला या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.अनुदानित उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांच्या वेतनावर 100 टक्के अनुदान शासनाकडुन दिले जात असल्याने या योजनेखाली अनुदानित कनिष्ठ महाद्यिालयाना फक्त सत्र शुल्क/प्रवेश शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यात येते. आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत शैक्षणिक शुल्क, सत्र शुल्क, प्रवेश शुल्क यांची प्रमाणित दराने प्रतिपूर्ती करण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी कोणत्याीप्रकारच्या उत्पन्नाची अट नाही.त्यामुळे आर्थिक स्तरावरील विद्यार्थीनी आपोआप या योजनेला पात्र ठरतात.कुटुंबातील पहिल्या तीन अपत्यापर्येंत या योजनेचा लाभ मिळू शकेल
आवश्यक कागदपत्रे : जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रवेश शुल्क, सत्र शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ केले जाते प्रमाणित दराने
अर्ज करण्याची पद्धत : शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत सवलतीबाबत अर्ज शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत सादर करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याचेकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचाकडे करणे.,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनूसार आवश्यक तरतूद संगणक प्रणलीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) , सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे …

6 comments

  1. Pingback: ww88

  2. Pingback: w88 play

  3. Pingback: กังนัม คลินิก

  4. Pingback: Samsara Market

  5. Pingback: Darknet

  6. Pingback: implant dentistry

Leave a Reply