प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण (2202 1429)
योजने बद्दलचा शासन निर्णय :
  • 1) राज्यातील शासन मान्य खाजगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थामधील प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना, मुलींना फी माफीची सवलत शा.नि.क्र.पाीआरई /7067 एफ, दि. 18/6/1968 अन्वये देण्यात येते.शा.नि.क्र.पीआरई /7081/155547 (1211) जीइए-5, दि.25/3/1981 पासून माध्यमिक शाळांना जोडल्या गेलेल्या इ.5 वी ते 7 वी च्या वर्गांना शिकविणा-या एस.एस.सी.डी.अेड.अथवा तत्सम परीक्षा उतीर्ण झालेल्या शिक्षकांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यत मोफत शिक्षण जाहिर झाले. पूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना लागू असलेली शैक्षणिक सवलतीची व्याप्ती वाढविण्यात आलेली आहे.
  • 2) शा.नि.क्र.एफईडी-1096/2186/96/(270/98) माशि-8 दि.3/2/1999 नुसार विना जागी ) प्रवेश मिळालेल्या तसेच विना अनुदानित संस्थेमधील इतर मान्यताप्राप्त सर्वसाधारण अभ्यासक्रमासाठी ज्याकरिता प्रमाणित दराने फी आकारली जाते अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याची योजना 1998-99 या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. ही सवलत प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना अनुज्ञेय राहील.
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार सदर योजना राबविण्यात येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विना अनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांनाही फीची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने करण्यात येते.या योजनेचा लाभ दोन पाल्यांना देण्यात येतो.
योजनेच्या प्रमुख अटी : प्राथमीक शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विना अनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांनाही फीची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने करण्यात येते.या योजनेचा लाभ दोन पाल्यांना देण्यात येतो.
आवश्यक कागदपत्रे :
  • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.
  • 1 विहित नमुन्यात अर्ज (दोन प्रतीत)
  • 2महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • 3 विहित नमुन्यात नोकरीचे प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
  • प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना व्यावसायिक अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विना अनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांनाही फीची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने करण्यात येते.
अर्ज करण्याची पद्धत : शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत सवलतीबाबत अर्ज शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत सादर करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याचेकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचाकडे करणे.,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनुसार आवश्यक तरतूद संगणक प्रणलीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply