इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण

सर्वांना मोफत शिक्षण

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : इयत्ता 10 वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण ( 2202 3056)
योजने बद्दलचा शासन निर्णय : 1) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी/1096/प्र.क्र.1978/96/साशि-5 दिनांक 13 जून 1996 अन्वये 1996-97 पासून शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेणा-या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण योजना लागू करण्यात आली आहे.
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश : जास्तीत –जास्त विद्यार्थ्याना शिक्षण घेता येण्यासाठी
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गासाठी आहे.
योजनेच्या प्रमुख अटी : किमान 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य असणा-या पालकांच्या पाल्यांना ही सवलत मिळू शकते.. या सवलतीसाठी 75 टक्के उपस्थिती व चांगली वर्तणुक असणे आवश्यक असून अनुत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सदरची सवलत त्या वर्षापुरती रोखण्यात येईल. मात्र तो विद्यार्थी उत्तीर्ण होताच ही सवलत पुढील वर्षात पूर्ववत चालू होत असते.
आवश्यक कागदपत्रे : जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप : प्रवेश शुल्क, सत्र शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ केले जाते प्रमाणित दराने
अर्ज करण्याची पद्धत : शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिण्याच्या आत सवलतीबाबत अर्ज शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत सादर करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याचेकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचाकडे करणे.,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनूसार आवश्यक तरतूद संगणक प्रणलीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिना
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक) , सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

20 comments

Leave a Reply