पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण (22022926)
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1) शा.नि.क्र.पाीआरई /7067 एफ, दि. 18/6/1968 अन्वये देण्यात येते.शा.नि.क्र.पीआरई /7081/155547 (1211) जीइए-5, दि.25/3/1981
 • 2) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक : एफ ईडी/1095/54782/ (1779/95)/साशि-5, दिनांक 19.08.1995 अन्वये 1995-96 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील अनुदानित अशासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना सर्व स्तरावर मोफत शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेखाली शिक्षण शुल्क, प्रवेश शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व परीक्षा शुल्क यांची प्रतिपूर्ती करण्यात येते.
 • 3) शा.नि.क्र. एफ ईडी/1095/ (54783/1779)/95साशि-5, दि.8/7/1996
 • 4) शा.नि एफ ईडी/1096/ (1978/96)/साशि-5, दि.22/11/1996 तसेच शुध्दीपत्रक एफ ईडी/1096/ (1978/96)/साशि-5, दि.9/12/1996
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार सदर योजना राबविण्यात येते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गा साठी
योजनेच्या प्रमुख अटी : इ.10 वी पर्यंत सर्वांना नि:शुल्क शिक्षण देण्याची योजना कार्यान्वित असल्याने या योजनेचा लाभ उच्च माध्यमिक स्तर व तत्सम अभ्यासक्रमाखालील अनुदानित इतर लाभार्थी तसेच पदवी/पदव्युत्तर स्तरावरील उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी/ विद्यार्थिनींना देण्यात येतो. व्यावसायिक अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विना अनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांनाही फीची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने करण्यात येते.या योजनेचा लाभ दोन पाल्यांना देण्यात येतो. 75 टक्के उपस्थिती आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्यातील मान्यता प्राप्त संस्थेतील अभ्यासक्रम फक्त ग्राहय धरण्यात येतील. इतर राज्यातील नाही.
आवश्यक कागदपत्रे :
 • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.
 • 1 विहित नमुन्यात अर्ज (दोन प्रतीत)
 • 2महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र
 • 3 विहित नमुन्यात नोकरीचे प्रमाणपत्र
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील
 • अध्यापकांच्या व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे पाल्यांना व्यावसायिक
 • अभ्यासक्रमाखाली अनुदानित तसेच विना अनुदानित शिक्षण संस्थेत मुक्त जागी
 • प्रवेश घेतलेल्या शिक्षकांच्या पाल्यांनाही फीची प्रतिपूर्ती प्रमाणित दराने करण्यात येते.या योजनेचा लाभ दोन पाल्यांना देण्यात येतो.
अर्ज करण्याची पद्धत : शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत सवलतीबाबत विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचे मार्फत सादर करणे आवश्यक आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) याचेकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याच्याकडे करणे.,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनूसार आवश्यक तरतूद संगणक प्रणलीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

Leave a Reply