स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
योजनेचे नाव : स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती (योजनेतर योजना) 22021394
योजने बद्दलचा शासन निर्णय :
 • 1) शासन निर्णय क्रमांक एमआयएम/1465-एफ, दिनांक 23 नोंव्हेंबर 1965 पासून अमलात आणली.
 • 2) शिक्षण व सेवायोजन विभाग शासन निर्णय क्र. एफएफई- 1088 (543/84) साशि 5 दि.31 डिसेंबर 1990 अन्वये गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांनाही शुल्कमाफी सवलत दिली जाते.
 • 3) शासनाने शासन निर्णय क्र. एनडीएफ – 1094/(1668/94)/साशि 5, दि. 13 सप्टेंबर 1994 अन्वये शिष्यवृत्तीच्या व पुस्तक अनुदानाच्या दरात वाढ केली आहे.
योजनेचा प्रकार :
योजनेचा उद्देश :
 • स्वांतत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कारावास भोगला अशा स्वातंत्र्य सैनिकांचे पत्नींना, मुलांना, नातवंडाना (हयात नसलेल्या मुलांच्या मुलांना) ही शुल्क माफीची सवलत दिली जाते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव : सर्व प्रवर्गा साठी
योजनेच्या प्रमुख अटी :
 • 1) गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांनाही शुल्कमाफी सवलत दिली जाते
 • 2) स्वांतत्र्यपूर्व काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कारावास भोगला अशा स्वातंत्र्य सैनिकांचे पत्नींना, मुलांना, नातवंडाना (हयात नसलेल्या मुलांच्या मुलांना) ही शुल्क माफीची सवलत दिली जाते. 75 टक्के उपस्थिती आवश्यक
आवश्यक कागदपत्रे :
 • जिल्हास्तरावरील योजना आहे.सदर कागदपत्राची पडताळणी जिल्हास्तरावर करण्यात येते.
 • 1) स्वातंत्र पूर्व काळात कारावास भोगला असल्याबाबतचे प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र /बंद प्रमाणपत्र .
 • 2) महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र,
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप :
 • इयत्ते नुसार गणवेश व पाठयपुस्तकांसाठी प्रमाणित दराने अनुदान दिले जाते.
अर्ज करण्याची पद्धत :
 • शाळेत प्रवेश घेतल्यानंतर 1 महिन्याच्या आत सवलतीबाबतचा अर्ज आवयक त्या कागदपत्रासह शाळेमार्फत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना सादर करणे आवश्यक आहे.
 • शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचाकडून आवश्यक असण्याऱ्या तरतूदीची मागणी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचाकडे करणे,शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) याचे मागणीनूसार आवश्यक तरतूद संगणक प्रणालीवर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक याचे मार्फत वितरित करण्यात येते.
१० अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ : सहा ते आठ महिने
११ संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता : शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सर्व
१२ Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: सदर प्रक्रिया ऑन लाईन व्दारा राबविण्यात येत नाही.

Check Also

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण

इयत्ता 11 वी,12 वी मध्ये मुलींना मोफत शिक्षण अ.क्र. योजना सविस्तर माहिती १ योजनेचे नाव …

6 comments

Leave a Reply