Ghar Bolu Lagle Tar Marathi Essay

Ghar Bolu Lagle Tar Marathi Essay

जुने घर बोलू लागते तर

भोर संस्थानात माझ्या पणजोबांचा एक जुना वाडा होता. पण आता तो जुनाट वाडा खिळखिळा झाला होता.

पुढे उद्योगासाठी सर्वजण संस्थानाबाहेर पडल्याने वाड्याची देखभाल होत नव्हती. त्यामुळे वाड्याशी संबंधित अशा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की, या वास्तूला निरोप द्यायचा व नवीन वास्तू बांधायची, म्हणून एका शुभमुहुर्तावर आम्ही सर्वजण वाड्यावर जमलो होतो.
तो वाडा जणू आपले मनोगत मांडत आहे, असे वाटले, वाडा सांगता होता, ‘मला कळले आहे की, तुम्ही मला निरोप द्यायला जमला आहात. पण मला दुःख होत नाही.

मी समाधानी आहे. माझे आयुष्य मी कृतार्थपणे जगलो. आजही मला दीडशे वर्षांपूर्वीच माझा जन्मदिवस आठवतो. केवड़ा थाटमाट होता माझा तेव्हा! माझ्या आसपासही एवढा मोठा दुसरा वाडा नवता.

Ghar Bolu Lagle Tar Marathi Essay

तुझ्या पणजोबांनी मोठ्या कौतुकाने माझी
उभारणी केली होती. माझ्या बांधकामातील प्रत्येक गोष्ट दर्जेदार होती तेव्हा वीज नव्हती, पण तेलाच्या दिव्यांनी मी उजळून निघालो होतो. कित्येक माणसे येथे राहून गेली. अनेक लग्नकार्य झाली. पुढची माडी तर पक्षकार आणि शिकाऊ वकील यांनी गजबजलेली असे. काळाबरोबर माझ्या रूपात बदल केले गेले. गावात वीज आली तेव्हा मी लखलखीत झालो. पुढे वाड्यातील बहुतेक जण कामाच्या निमित्ताने शहरात गेले.

माझ्या वाटेला एकाकीपण आले.आता या ठिकाणी नव्या स्वरूपातील इमारत उभी राहिल. नव्या कचेऱ्या आणि बिऱ्हाडे राहतील. पुन्हा वास्तू गजबजून जाईल, यातच मला आनंद आहे.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply