Gunottar v Praman

गुणोत्तर व प्रमाण

समजून घ्या व लक्षात ठेवा :

1. गुणोत्तरे:

(i) दोन सजातीय राशींची तुलनात्मक पट काढून केलेली तुलना म्हणजेच गुणोत्तर होय.

उदा., समीर व सलील यांची आजची वये अनुक्रमे 12 वर्षे व 15 वर्षे अशी असल्यास
समीरच्या वयाचे सलीलच्या वयाशी असलेले गुणोत्तर =12-(अतिसंक्षिप्त रूप)
आहे असे म्हणतात. ते 4 : 5 असेही लिहितात.

(ii) गुणोत्तर काढायच्या राशी सजातीय असल्या पाहिजेत व त्या राशींची एकके समान
असायला हवीत. गुणोत्तर हा तुलनात्मक संबंध असल्यामुळे त्याला एकक नसते.

(iii) a व b या संख्यांमध्ये व चे b शी असलेले गुणोत्तर किंवा a : b असे लिहितात:
तर b चे a शी असलेले गुणोत्तर किंवा b: a असे लिहितात.

2. प्रमाण :

(i) ज्या दोन गुणोत्तरांची अतिसंक्षिप्त रूपे समान असतात त्यांना समान गुणोत्तरे असे
म्हणतात व दोन गुणोत्तरांच्या समानतेलाच प्रमाण असे म्हणतात. उदा., “वही दोन
गुणोत्तरे जर समान असतील, तर a, b, c, d या संख्या प्रमाणात आहेत असे म्हणतात.

(ii) जेव्हा चार संख्या प्रमाणात असतात, तेव्हा, ‘अंत्यपदांचा गुणाकार = मध्यमपदांचा
गुणाकार’ हा संबंध सत्य असतो. म्हणजेच असल्यास axd=bxc. याउलट जेव्हा abcd या चार संख्यांमध्ये axd=bxc असेल, तेव्हा a, b.ed या
संख्या प्रमाणात असतात.

Leave a Reply