Gurunanak aani navab

एकदा गुरुनानक सुलतानपूरच्या नवाबाकडे घरी गेले. नवाबानी गुरुदेवांचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यानंतर दोघांच्यामध्ये धर्मावर चर्चा सुरु झाली. नवाबानी म्हटले, आपण हिंदू-मुस्लीम यामध्ये काहीच अंतर करत नाही. त्यामुळे आज तुम्ही माझ्याबरोबर नमाज अदा करण्यासाठी चला. नानकदेव म्हणाले,देणारा एक आहे आणि घेणारा एक आहे तर मी कोण अंतर करणारा? चला मशिदीत चला. दोघेही मशिदीत गेले.

नवाबसाहेब नमाज अदा करू लागले, नानकही ध्यानमग्न होवून एका मुद्रेत उभे राहिले. नमाज होताच नवाब म्हणाले, आपण तर नमाज अदा केली नाही. नानक म्हणाले, “माफ करा! आपण जेंव्हा नमाज अदा करत होता तेंव्हा माझे मन माझ्या स्वामींकडे होते. त्या वेळी मला आपल्या स्वामींच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नव्हते. मात्र आपले लक्ष नमाजाकडे कमी आणि माझ्याकडे जास्त होते काय? आपण देवाचा धावा करतो तेंव्हा आपले मन हे दुसऱ्या कोणत्या गोष्टीत जायला आहे.” नवाब खजिल होवून म्हणाले, “खरे आहे! माझे लक्ष तुम्ही काय करता यात लागले होते. आम्ही देवाकडे काही तरी मागणी करण्यासाठी येतो तर तुम्ही फक्त देवासाठी इथे येता.” गुरु नानक म्हणाले,”आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, नावे वेगळी दिली तरी देव बदलतो काय? तो सर्व पाहत आहे.”

तात्पर्य-ईश्वर एक आहे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्र चित्ताची गरज आहे.

Check Also

Veleche Mahatva

वेळेचे महत्त्व. क्रांतिकारकांच्या मालिकेत चाफेकर बंधूचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तीनही भाऊ देशाच्या स्वातंत्र्याकरिता …

Leave a Reply