harat maza desh mahan

भारत देश महान

भारत देश महान – मराठी निबन्ध (10line)

[ मुद्दे : जन्मभूमी-निसर्गदत्त देणग्या-थोरामोठ्यांचा देश-विविधतेत एकता.]

भारत माझी जन्मभूमी आहे. ती मला स्वर्गाहून प्रिय आहे. कारण माझा भारत देश महान आहे.
भारताच्या तीन बाजूंना खळाळणारे सागर जणू याचे गौरवगीतच गात असतात.
नगाधिराज हिमालय हा भारताच्या माथ्यावर मुकुटाप्रमाणे शोभतो. खळाळत वाहणा-या र
नद्या, सुपीक मैदाने, रम्य भूप्रदेश या विविध देणग्यांनी भारत नटला आहे.
राम-कृष्णांसारखी आराध्य दैवते, महावीर, बुद्ध, ज्ञानेश्वरांसारखे संत-महंत,सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जनहितदक्ष राजे, लोकमान्य टिळक..महात्मा गांधींसारखे लोकनेते इत्यादी अनेक थोर विभूतींचा हा देश आहे.
भारतात अनेक धर्म, पंथ, जाती, वंश, भाषा गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या विविधतेतही एकता सामावलेली आहे. तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे. जन गण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. ‘सत्यमेव
जयते ।’ हे आपले ब्रीदवाक्य आहे. म्हणूनच मी नेहमी अभिमानाने म्हणतो, ‘भारत देश महान !’

Leave a Reply