He Suryabhaskara

हे सूर्यभास्करा

He Suryabhaskara

हे सूर्यभास्करा
करतो नमन तुम्हाला
होता समय उदयाचा
उधळतो रंग केशरी चहूदिशांना

अभ्राअभ्रांत डोकावे, प्रकाश किरणांचा
रंगात रंगे सोनेरी, काठ मेघराजाचा
लालीत खुले दृश्य, विहंगम देखाव्याचा
लागे तीट उदयास, उडता थवा पाखरांचा

दृश्यात अदृश्य चमके, चांदण्या आकाशा
जसा समर्थ पुरुषाच्या, पाठी उभ्या सुकांता
दडतो आदित्य पाठी, फिरणाऱ्या पृथेच्या
होते निशा चराचरांत, पांघरून काळोख रातीला

केशरी तप्त गोळा, हर्षात उसळे अंबरा
होई अस्त त्याक्षणी, अजिंक्य काळरातीचा
झुके मस्तक त्यादिशी, होता प्रभा आकाशी
करे प्रारंभ प्रात:काळी, जीवसृष्टी कर्मास दाहीदिशी

दे ऊर्जा आम्हांस,
हरेक दिसास,
देऊन अर्घ्य तुम्हांस
वाहू दे सामर्थ्य नसानसांत

Leave a Reply