Amazon Big Sell

इतिहास प्रश्नोत्तरे 1

‘इंडिया इंडिपेन्डन्स लीग’ची स्थापना कोणी केली?
रासबिहारी बोस

आझाद हिंद फौजेचे घोषवाक्य काय होते?
चलो हिंदुस्थान

१९४२ च्या लढ्यात ओरिसातील ‘तालचेर कशाशा
संबंधित आहे?
तेथे प्रति सरकारची स्थापना झाली होती,

टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केला होता?
१८९५

सावरकरांनी ‘पतितपावन मंदिर’ कोठे बांधले?
रत्नागिरी

राष्ट्रीय काँग्रेसला ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ असे
सर्वप्रथम कोणी संबोधले होते?

अरविंद घोष

‘नवजीवन’ या गुजराती साप्ताहिकाचे संपादक कोण
होते ?
महात्मा गांधी

“मजूर महाजन संघा’चे संस्थापक कोण ?
महात्मा गांधी

वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले पुढारी कोण होते?
विनोबा भावे

मार्च १९२३ मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोठे
झाली?
अलाहाबाद

बोअर युद्धातील कामगिरीबद्दल महात्मा गांधींना कोणती
पदवी मिळाली होती? कैसर-ए-हिंद

रॉयल कमिशनचे पहिले हिंदी सदस्य होण्याचा मान
कोणास मिळाला? दादाभाई नौरोजी

‘राज्यसंस्थेचा खरा आधार लोकांच्या अंतःकरणाची
मिळवणी, त्यांच्या भावनांचे खतपाणी व त्यांच्या
निष्ठेची जोपासना हा असतो हे विचार कोणी मांडले?
दादाभाई नौरोजी

राजाराम मोहन रॉय यांनी सतत १८ वर्षे सतीप्रथेविरुद्ध
लढा दिल्याने तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बेटिकने
सतीची चाल बंद करण्याचा कायदा केव्हा केला ?
१८२९

डॉ. आंबेडकरांच्या ”बहिष्कृत भारत” या वृत्तपत्रावर
बिरुदावली म्हणून कोणत्या संताची वचने होती ?
संत ज्ञानेश्वर

राजकीय सुधारणेस प्राधान्यक्रम देणारे नेते कोण?
लोकमान्य टिळक

गो. कृ. गोखलेच्या अर्थसंकल्पावरील भाषणासारखे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये क्वचितच ऐकायला
मिळते, असे कोणी म्हटले होते ?
लॉर्ड मिंटो

इ.स. १८६६ मध्ये लंडन येथे ‘ईस्ट इंडिया
असोसिएशन’ची स्थापना कोणी केली ?
दादाभाई नौरोजी

मीर जाफरला १७६० मध्ये पदच्युत करून इंग्रजां
कोणाला बंगालचा नवाब बनवले होते ?
मीर कासीम

बक्सारचे युद्ध कोणादरम्यान झाले ?
मीर कासीम, शाह आलम, सुजाउद्दौला व इंग्रज

भारतात मुलकी सेवांची सुरुवात कोणी केली?
लॉर्ड कॉर्नवॉलिस

१८८३ साली ‘नॅशनल कॉन्फरन्स’ कोणाच्या
अध्यक्षतेखाली पार पाडली होती ?
सुरेंद्रनाथ बॅनर्जी

अलिगड चळवळीचे वैशिष्ट कोणते?
भारतीय मुस्लिमांना संरक्षण देण्यासाठी इंग्रज
व मुस्लिमांची युती

१८८५ साली गोकुळदास तेजपाल पाठशाला, मुंबई
येथे काय पार पडले?
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन

राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनास किती सदस्य
उपस्थित होते?
७२

कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी शाखा सुरू झाली ?
१८८९

राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठाला संबोधित करणारी पहिली महिला कोण?
कादंबिनी गांगुली

‘आमार सोनार बांगला’ हे बंगाल फाळणीच्या विरोधातीलचळवळीतील स्फूर्तिगीत कोणी लिहिले?
रविंद्रनाथ टागोर

भारताच्या राजकीय प्रश्नांवर सर्वप्रथम परदेशात
वातावरण निर्मिती कोणी केली होती ?
दादाभाई नौरोजी

ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत ‘लुटीचा
सिद्धान्त’ कोणी मांडला ?
दादाभाई नौरोजी

कोणाच्या कारकिर्दीत विद्यापीठ कायदा (१९०४)
संमत झाला होता.?
लॉर्ड कर्झन

राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळचा भारताचा व्हाईसर-कोण?
लॉर्ड डफरिंन

१८८६ च्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण?
दादाभाई नौरोजी

गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते
दुस-या

‘शांततामय मार्गाने स्वराज्य प्राप्ती करण्यासाठी
असहकार चळवळ सुरू करणे’ हा ठराव कोणत्या
अधिवेशनात संमत झाला?
नागपूर १९२०

लोकमान्य टिळकांनी कोणाच्या कारकिर्दीचा उल्लेख
औरंगजेबाचे राज्य’ असा केला ?

लॉर्ड कर्झन

केंद्रीय आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणास कोणाच्या
कारकिर्दीत सुरुवात झाली?

लॉर्ड मेयो

लॉर्ड लिटनने भारतीय मुलकी सेवेत किती जागा
भारतीयांसाठी राखून ठेवल्या होत्या ?

१/६

बंगालची फाळणी केव्हा केली गेली? १९०५ ६२
‘अखिल भारतीय किसान सभा कोणी स्थापन केली?
स्वामी श्रद्धानंद

मराठी इतिहासाच्या अभ्यासाला वाहिलेले ‘भारतवर्ष
हे मासिक कोणी सुरू केले?

शिवरामपंत परांजपे

१८९४ च्या काँग्रेस अधिवेशनाचे आयरीश अध्यक्ष
कोण?
जॉर्ज यूल

बंगालच्या फाळणीची योजना सर्वप्रथम ‘सरकारी ६५
गॅझेटमध्ये कधी प्रसिद्ध करण्यात आली?
डिसेंबर १९०३

अफगाणिस्तानबाबत प्रभावी निष्क्रियतेचे धोरण कोणी राबविले?
लॉर्ड लिटन

१९०२ मध्ये ‘एझावाची चळवळ कोणाच्या
नेतृत्वाखाली सुरू झाली?

श्री नारायण गुरू

मुस्लीम लीगची स्थापना केव्हा झाली?
डिसेंबर १९०६

वित्तीय प्रशासनासंबंधी रॉयल विकेंद्रीकरण आयोग
कधी नेमण्यात आला होता ?

१९०५

१९३३ मध्ये पाकिस्तान नॅशनल मुव्हमेंट’ची स्थापना
कोणी केली?
महंमद इकबाल

१९०७ मध्ये सुरत येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

रासबिहारी घोष

‘मिशन विथ माऊंटबॅटन’ हे पुस्तक कोणी लिहिले?
कॅम्पबेल जॉन्सन

महात्मा गांधींनी आपले विचार मुख्यतः कोणत्या वृत्तपत्रातून व्यक्त केले?

हरिजन व यंग इंडिया

मुस्लिमांना स्वतंत्र मतदार संघ कोणत्या कायद्यान्वये
देण्यात आले?

१९०९ चा कायदा

फिरोजशाह मेहता व गोपाल कृष्ण गोखले यांचे निधन
केव्हा झाले?

१९१५

भारतावरील अधिकार सोडण्याचा अंतिम निर्णय
पंतप्रधान अॅटलीने केव्हा घोषित केला?

३ जून १९४७

‘गीतारहस्य’ हा ग्रंथ टिळकांनी कोणत्या तुरुंगात
असताना लिहिला ?

मंडालेच्या तुरुंगात

‘गदर’ ही संघटना अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को
येथे कोणी स्थापना केली?

लाल हरदयाळ

‘कृतीतून शिक्षण’ या उद्देशाने गांधीजींनी कणती शिक्षण योजना मांडली ?
वर्धा योजना

Asha Transcription

About admin

Check Also

इतिहास प्रश्नोत्तरे 3

Mpsc History Marathi Question Bank सायमन कमिशन भारतात कधी आले ? १९२८ ‘मॅक्सवेल-झूमफील्ड’ चौकशी समितीचे …