Human Body

 मानवी शरीर रचना

बाह्यरचना :
* मानवाला ………. ही शास्त्रीय संज्ञा आहे. – होमो सेपियन

* मानवी शरीराचे प्रमुख भाग – डोके, मान (ग्रीवा), धड, हात (उर्ध्वशाखा), पाय (अधः शाखा)

* डोक्याचे प्रमुख भाग – डोळे, कान, नाक, तोंड, मेंदू

* डोके आणि धड यांना जोडणारा भाग – मान

* धडाचे दोन मुख्य भाग – वक्ष (छाती), उदर (पोट)

* छातीमध्ये समाविष्ट असणारे भाग – श्वसनलिका, अन्ननलिका, फुफ्फुस, हृदय

* पोटातील समाविष्ट भाग – जठर, यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, वृक्क, प्लीहा, स्वादुपिंड

* छाती व पोट हे दोन भाग निराळा करणारा पडदा – श्वासपटल

* हातामध्ये समाविष्ट असणारे भाग- खांदा, दंड, मनगट, बाहू, हात

* पायामध्ये (अधःशाखा) समाविष्ट असणारे भाग – नितंब , मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, पाऊल

मानवी शरीरातील रक्ताभिसरण संस्था

* हृदयातील रक्त रक्तवाहिन्यातून शरीरात आणि तेथून पून्हा हृदयात येण्याची क्रिया म्हणजे – रक्ताभिसरण

* …….. यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. – डॉ.विल्यम हार्वे

* मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण – ५ ते ६ लिटर

* रक्ताचे वजन मानवी शरीराच्या …….. टक्के असते . – नऊ

* सूक्ष्मदर्शक यंत्राखाली रक्ताची तपासणी केली तर त्यातील समाविष्ट घटक –
९१% पाणी, ८% प्रोटीन, ०.९ भाग क्षार

* रक्तातील पातळ पदाथसि जीवशास्त्रात वापरण्यात येणारा शब्द – प्लाझ्मा (रक्तद्रव)

* … हे रक्तद्रव व रक्तपेशी या दोन भागांपासून बनलेले असते . – रक्त

* रक्तद्रवातील पाण्याचे प्रमाण – ९० टक्के

* रक्तदवातील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण – १० टक्के

* उक्तदवातील विरघळलेल्या पदार्थातील प्रथिने- फायब्रीनोजेन, सिरम अलब्युमीन, सिरम ग्लोब्युलीन

* रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर ……. मध्ये होते. – फायब्रीन

* रक्तपेशीचे प्रकार – लोहपेशी , श्वेतपेशी, रक्तबिंबिका

* लोहपेशी (तांबड्या) पेशीचे निर्मितीचे ठिकाण – अस्थिमज्जा

* लोहपेशीत …….. हे द्रव्य असते – हिमोग्लोबीन

*प्रौढ माणसाच्या १०० मि.ली. रक्तात हिमोग्लोबीनचे असणारे प्रमाण – १४ ग्रॅम

* रक्तातील एका पांढ-या पेशीपाठीमागचे लोहित पेशीचे प्रमाण – ५०० ते ६००

*एक घन मिलीलीटर रक्तात सुमारे ……… तांबड्या पेशी असतात . – पन्नास लाख

*…….. या पेशींना ऑक्सिजनवाहक असेही म्हणतात. – लोहपेशी/तांबड्या पेशी

*……… मुळे लोहपेशीला तांबडा रंग प्राप्त होतो – हिमोग्लोबीन
श्वेतपेशीचे (पांढरी पेशी) निर्मितीचे स्थान – अस्थिमज्जा, प्लीहा, रसग्रंथी

* ब्लड कॅन्सरचा परिणाम होणारा शरीरातील भाग – पांढ-या (श्वेत) पेशी

* …….पेशींना ‘सैनिक पेशी’ म्हणतात – पांढ-या (श्वेत) पेशी
* एका घन मिलीलीटर रक्तात सुमारे ……… पांढ-या पेशी असतात . – आठ हजार

*पेशी या अमीबाप्रमाणे आपला आकार बदलू शकतात – पांढ-या पेशी

* ……… पेशी रोगजंतूंचा (बॅक्टेरियाचा) प्रतिकार करतात . – पांढ-या पेशी

* एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी ……. कालावधी जाऊ देणे आवश्यक असते. –३ महिने

*रक्तदान : निरोगी व्यक्तीने रूग्णांच्या उपयोगासाठी रक्त देण्याच्या क्रियेला रक्तदान असे म्हणतात,

* रक्त पराधान : शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरून रक्त दिले जाते ,
याला रक्त पराधान म्हणतात,

Check Also

Human Nervous system

मानवी चेतासंस्था * ……… याने इ.स. १६६५ मध्ये पेशींचा शोध लावला. – रॉबर्ट हूक * …

3 comments

Leave a Reply