जंगले नाहीशी झाली तर

जंगले नाहीशी झाली तर.

jangale nahisi zali tar

दूरदर्शनवर वाइल्ड अमेरिक हा कर्यक्रम पाहत असताना मला अनेकवन्य पशू, पक्षी, अनेकप्रकरची झाडे , वनस्पती पाहायला मिळत होती. हजारो पशू पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणजे ही जंगले. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, ही जंगलेच नाहिशी झाली तर, जंगले नाहीशी झाली तर जंगलातील साग ,खैर ,चिंच , देवदार , जांभूळ , यासारखी अनेकविध झाडे , चित्ता, वाघ , सिंह , हत्ती , हरीण , लांडगा , माकडे , साप यासारखे प्राणी ,शहामृग ,घारी , पोपट यांसारखे
पक्षी यांचे निवासस्थान नाहीसे होईल.

हे सर्व पशू पक्षी बेघर होतील.ते गावरस्त्यावर येतील किंवा जगातून नाहीसे होतील.जंगलातील सर्व झाडे ही आपली व आपल्या राष्ट्राची मोठी संपत्ती आहे. जंगले नाहीशी झाली तर ही संपत्तीच नष्ट होईल. जंगलात आदिवासी गोंड , कतकरी , भिल्ल , अशी अनेकप्रकरचे लोकराहतात.
त्यांना एकनिवासस्थान नसतेच. ते सतत रानोमाळ भटकत असतात. जंगले नाहीशी झाली तर त्यांचा तोही निवारा संपेल. मग ते कुठे जातील?

जंगले नाहीशी झाली तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल हाही मोठा धोक आहे. जंगलांमुळे पाऊस पडायला योग्य वातावरण तयार होते. जंगले नाहिशी झाली तर पाऊस नीट पडणार नाही. शेते पिकणार नाहीत. बागा फळाफुलांनी बहरणार नाहीत. या भारतभूमीचे सामर्थ्य व सौंदर्य संपुष्टात येईल. दुष्काळ पडेल.
अन्नधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागेल. लाचारी वाढेल, आपला देश स्वतंत्र असूनही पराधीन राहील.

यासाठी जंगलांचे संरक्षण करायला हवे. आतापर्यंत झालेल्या बेसुमार जंगलतोडीचे नुकसान भरून कढण्यासाठी सरकारने ‘ एकव्यक्ती एकवृक्ष ‘ योजना जाहीर केली आहे. ती नेटाने राबवली पाहिजे. ही केवळ सरकरची योजना म्हणून नव्हे तर माणूस म्हणून आपली ही जबाबदारी मानली पाहिजे.कारण
जंगले नाहीशी झाली तर शेवटी आपणही नाहीसे होऊ,हे विसरू नये.

 

झाशीची राणी लक्ष्मीबाई

माझा आवडता ऋतू उन्हाळा

लोकमान्य टिळक मराठी निबंध

माझ्या स्वप्नातिल आदर्श गाव

प्रदूषण-एक भयंकर संकट 

आमच्या गावातील जत्रा

मी पंतप्रधान झाले तर

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply