Jay dev jay dev vakratunda

जय देव जय देव जय वक्रतुंडा।
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥

प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥

रुणझण रुणझण करिती घागरिया घोळा ।
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥

सारीगमपधनी सप्तस्वरभेदा।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥

तातक तातक थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना।
परशांकुशलड्डुधर शोभितशुभरदना ॥

ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजि अलिपरि करि भ्रमणा ॥

Leave a Reply

error: माफ करा ही माहिती कॉपीराइट प्रोटेक्टेड आहे..