{चरित्र} लता मंगेशकर ची मराठी माहिती | lata mangeshkar information in marathi

lata mangeshkar information in marathi: सुरांची राणी आणि भारताची गान कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गायिका आहेत. भारतासह जगभरातील अनेक लोक लता मंगेशकर यांना त्यांच्या आवाजाने ओळखतात.

आज पर्यंतच्या आपल्या करियर मध्ये त्यांनी 40 हजार पेक्षा जास्त गाणे गायले आहेत. अमेरिका च्या शास्त्रज्ञांनी त्यांची आवाजाची स्तुती करतांना म्हटले की त्यांनी आजवर इतका सुरेख आवाज ऐकलं नाही.

म्हणून आजच्या या लेखात आपण भारतरत्न लता मंगेशकर यांची मराठी माहिती (lata mangeshkar biography in marathi) प्राप्त करणार आहोत.

पूर्ण नावलता दीनानाथ मंगेशकर
जन्म तारीख28 सप्टेंबर 1929, इंदोर
वडिलांचे नावपंडित दीनानाथ मंगेशकर
आईचे नावशेवंती मंगेशकर
घरानेगोमंतक मराठी ब्राह्मण
धर्मगायिका, संगीत डायरेक्टर
व्यवसायहिंदू

लता मंगेशकर – lata mangeshkar information in marathi

जन्म आणि बालपण

लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्यप्रदेश मधील इंदोर शहरात एका मराठी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर व आईचे नाव शेवंती होते. दीनानाथ मंगेशकर एक शास्त्रीय संगीताचे गायक होते. लता मंगेशकर यांना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला.

लहान असताना लता मंगेशकर आपले वडील व भावासोबत शास्त्रीय संगीत शिकत असत. पाच वर्षाच्या वयातच त्या आपल्या बहिणी आशा, उषा आणि मीना सोबत संगीत आणि गायन शिकू लागल्या. लता मंगेशकर यांना परमेश्वराने दिलेल्या सुरेख आणि मधुर आवाजामुळे त्यांना गायन क्षेत्रात यश मिळू लागले.

1942 साली 13 वर्षाच्या वयात मराठी चित्रपट ‘किती हसाल’ साठी त्यांनी आपले पहिले गाणे रेकॉर्ड केले. चित्रपट प्रकाशित तर झाला परंतु काही कारणास्तव त्यातून गाणे काढून टाकण्यात आले. या घटनेमुळे लता मंगेशकर दुःखी झाल्या. याच वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली.

लता मंगेशकर यांचे करीयर (लता मंगेशकर ची मराठी माहिती)

13 वर्षाच्या वयात लता मंगेशकर यांनी आपल्या करीयर ची सुरुवात केली. त्यांचे पहिले गाणे रिजेक्ट झाल्यानंतर नवयुग चित्रपट कंपनीचे मालक आणि लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबांची जवाबदारी घेतली. याशिवाय लता मंगेशकर यांनी एक गायक आणि अभिनेत्री बनण्यासाठी देखील मदत केली.

मास्टर विनायक यांनी 1942 साली लता मंगेशकर यांना मराठी चित्रपट ‘पहिली मंगला गौर’ मध्ये एक छोटासा अभिनय करण्याची संधी दिली. या चित्रपटात त्यांनी एक गाणे देखील गायले होते. अशा पद्धतीने मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करीयर ची सुरुवात केली.

1945 साली लता मंगेशकर मुंबई आल्या व येथे अमानत अली खान यांच्याकडून प्रशिक्षण घेऊ लागल्या. 1947 मध्ये त्यांनी हिंदी चित्रपट ‘आप की सेवा मे’ मध्ये पाहिले हिंदी गाणे गायिले. परंतु त्यांना पाहिजे तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही यानंतर 1949 साली त्यांनी लागोपाठ बरसात, दुलारी, अंदाज व महल या 4 हिट चित्रपटांची गाणी गायिली. यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी प्राप्त झाली. यामधून महल चित्रपटातले ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे सुप्रसिद्ध झाले होते. आणि अशा पद्धतीने लता मंगेशकर यांनी आपले पाऊल हिंदी चित्रपट सृष्टीत ठेवले.

साल 1950 मध्ये लता मंगेशकर यांची प्रसिद्ध वाढू लागली त्यांना मोठमोठे संगीत डायरेक्टर अनिल विश्वास, शंकर जयकिशन, एस डी. बर्मन, ख्य्याम, सलील चौधरी, मदन मोहन, कल्यानजी आनंदजी यांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.

1958 साली म्युझिक डायरेक्टर सलील चौधरी यांच्या मधुमती चित्रपटात लता मंगेशकर यांनी ‘आजा रे परदेशी’ हे गाणे गायले. या गाण्यासाठी त्यांना बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर हा सर्वात पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.

लता मंगेशकर यांनी आजपर्यंत जवळपास 30,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. ही गाणे हिंदी सोबत अनेक भारतीय भाषांमध्ये आहेत.

Biography of lata mangeshkar in marathi

लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार

1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994: फिल्म फेअर अवार्ड.
1969: पद्म भूषण.
1974: जगातील सर्वात जास्त गाणे गाण्याचा गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड.
1989: दादासाहेब फाळके पुरस्कार.
1993: फिल्मफेअर लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार.
1996: स्क्रीन चा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार.
1997: राजीव गांधी पुरस्कार.
1999: एन टी आर पुरस्कार.
1999: पद्म विभूषण
2000: आई. आई. ए. एफ लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार.
2001: भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्न देण्यात आला.
2001: नुरजहान पुरस्कार.

तर मित्रांनो ही होती lata mangeshkar information in marathi आशा करतो की ही मराठी माहिती तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरली असेल. ह्या लता मंगेशकर यांची मराठी माहिती (biography of lata mangeshkar in marathi) ला आपल्या मित्रांसोबतही शेयर करा. धन्यवाद..

READ MORE:

रजनीकांत मराठी माहिती
झाशीची राणी मराठी माहिती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *