Amazon Big Sell

Lavlavthi vikrala

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झळझूळां ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥जय देव० ॥ २ ॥

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥

तें त्वां असुरपणे प्राशन केलें।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी।
रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥
जय देव जय देव० ॥ ४ ॥

Asha Transcription

Leave a Reply