letter for requirement of bus for school tour

सहलीसाठी बसची मागणी पत्र

दि.१८ १२ २०१७

अंजली गोरे
सहलप्रमुख,
शिवाजी विद्यालय,
नांदेड – 431605

प्रति,
मा.आगारप्रमुख,
नांदेड .

विषय: सहलीसाठी बसची मागणी

माननीय अगारप्रमुख साहेब ,
स.न.वि.वि
मी वरील शाळेची सहलप्रमुख या नात्याने हे पत्र लिहित आहे. आमच्या शाळेतील ५०० विद्यार्थी व
१२ शिक्षक जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात औरंगाबाद येथील अजिठा वेरुळ या सहलीसाठी
जाण्याच्या बेतात आहेत.
आम्हाला या शैक्षणिकसहलीसाठी तीन बसेसची गरज आहे. तरी कृपया आम्हाला ही सबसेवा
उपलब्ध करुन दयावी. सहल साधारणतः चार दिवसांची असल्याकरणाने बसेस चारही दिवस आमच्याबरोबर
मुक्कामाला राहतील याची नोंद घ्यावी. तेव्हा आपण ही बससेवा आम्हाला हव्या असलेल्या तारखेस उपलब्ध
करुन देऊ शकता की नाही? हे कृपया कळवावे. तसेच सर्व व्यक्तींचा एकूण किती भाडेखर्च येईल व आगाऊ
रक्‍कम किती भरावी लागेल, तेही जरुर कळवावे, ही नम्र विनंती.
तसदीबद्दल क्षमस्व. कळावे.

आपली कृपाभिलाषी

अंजली गोरे

(सहल प्रमुख )

Check Also

new year wishing letter marathi

नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठविण्यासाठी पत्र

दिनांक १५.१२.२०१८ २०४, प्रिंस हाउस, मुंबई आदरणीय काका, सप्रेम नमस्कार, तुम्हाला नव वर्षाच्या खुप खुप …

Leave a Reply