Maharashtra Police Bharti 2019 – पोलीस भरतीची तारीख जाहीर..

Maharashtra Police Bharti 2019

महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्या अंतर्गत “महा-पोलीस भरती २०१९” करीता महाराष्ट्र पोलीस खात्याकडून पोलीस शिपाई भरती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सदर भरती परीक्षा हि ऑनलाईन होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत.

ऑनलाईन अर्ज – CLICK HERE

जाहिरात बघा – CLICK HERE

 

क्रमांक-सेप्रनि-९८१८/प्र.क्र.३१३/पोल-५अ, महारा” पोलीस अधिनियम (१९५९ चा महाराष्ट्र पोलीस  च्या कलम-५ब आणि त्यानुषंगाने प्रदान करण्यात आलेल्या इतर सर्व अधिकारांचा वापर करुन) महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्यातील गृह विभागाच्या अखत्यारीतील पोलीस दलातील “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मध्ये सुधारणा
करण्यासाठी खालीलप्रमाणे नियम करीत आहे :-
१. या नियमांना “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम, २०१९. असे
संबोधण्यात यावे.
२. “महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ मधील नियम ४ चे उपखंड

(१),(२) आणि (३) खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात येत आहेत :-

(१) लेखी परीक्षा (१०० गुण) :-

(अ) पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल. सदरहू
परीक्षा १०० गुणांची असेल.

(ब) लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-
(१) अंकगणित;
(२) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी ;
(३) बध्दीमत्ता चाचणी ;
(४) मराठी व्याकरण.

(क) लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल ब लेखी चाचणी मराठी भाषेत
घेण्यात येईल. सर्व प्रश्‍न बहुपर्यायी स्वरुपाची राहतील.

(२) शारीरिक चाचणी (५० गुण) :- जे उमेदवार लेखी चाचणीत किमान ३५% (मागास त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गीनहाय नमूद केलेल्या
पदसंख्येच्या १ : ५ या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना खालीलप्रमाणे शारिरीक चाचणीसाठी
पात्र ठरविण्यात येईल.

शारीरिक चाचणी पुढीलप्रमाणे एकूण ५० गुणांची असेल :-
(अ) पुरुष उमेदवार :

(अ) १६०० मीटर धावणे ३० गुण
(ब) १०० मीटर धावणे १० गुण
(क) गोळा फेक १० गुण
एकूण ५० गुण

(ब) महिला उमेदवार :

(अ) ८०० मीटर धावणे ३० गुण
(ब) १०० मीटर धावणे १० गुण
(क) गोळा फेक (५ र 90 १० गुण
एकूण ५० गुण

स्पष्टीकरण :- जे उमेदवार लेखी चाचणीत किमान ३५% (मागास प्रवर्गातील उमेदवाराबाबत ३३%) गुण मिळवून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिध्द केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १ : ५ या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येईल. उदाहरणार्थ,
जर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १० जागा व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ५ जागा असतील
तर अनुसूचित जाती प्रवर्गातील ५० (५६१०-५०) व अनुसूचित जमाती प्रवर्गातील २५ (५५-२५) उमेदवार शारिरीक चाचणीसाठी पात्र ठरतील. तथापि, अनुसूचित जाती
प्रवर्गातील गुणानुक्रमे ५० व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या
अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गांतर्गत शारिरीक चाचणीसाठी पात्र असतील. तसेच, अनुसूचित जमाती प्रवर्गातील
गुणानुक्रमे २५ व्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारास मिळालेले गुण जेवढ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना मिळालेले असतील ते सर्व उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत शारिरीक चाचणीसाठी पात्र असतील.

admin

Leave a Reply

Next Post

SSC CHSL Hall ticket released

Mon Jul 1 , 2019
SSC CHSL Admit Cards for Tier 1 have been made available on the regional website of Staff Selection Commission from June 19, 2019. Candidates can access the admit card by logging in with their Name, Date of Birth and Roll number/ Registration number. SSC CHSL Hall Ticket Download Download SSC […]
WhatsApp chat
%d bloggers like this: