संत ज्ञानेश्वर समाधी आळंदी महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी नावाचे आणखे एक गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी […]

खंडोबा मंदिर जेजुरी खंडोबा मंदिर जेजुरी – हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम […]

महाबळेश्वर महाबळेश्वर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. हे एक थंड हवेचे ठेकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे पर्यटक वर्षभर भेट देतात. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वराला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. हे […]

कोयना अभयारण्य हे महाराष्ट्रातील अभयारण्य असून सातारा जिल्ह्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलांमध्ये कोयना अभयारण्याचा समावेश होतो. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या कडेकडेने पसरलेले आहे. इतिहासात हे जंगल जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध आहे. अभयारण्याचे याचे एकूण क्षेत्रफळ ४२६ चौ.किमी असून याला १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळाला.या अभयारण्याला […]

मांढरगड ची काळूबाई मांढरगड ची काळूबाई- मांढरदेवीचे मंदिर हे मंदार पर्वतावर आहे, तेथे मांढव्य ऋषीचे वास्तव्य होते.त्यामुळे मांढर या शब्दाची व्युत्पती मंदार आणि मांढव्य या शब्दावरून झाली आहे.पुरातन काळात दक्षिण भारतात दानवांनी उछंद मांडला होता .तेव्हा आदिमाता पार्वतीने महाकालीच्या रुपात त्या दानवांचा विनाश केला आणि मंदार पर्वतावर विश्रांतीसाठी आली आणि […]

वाईचा ढोल्या गणपती वाईचा ढोल्या गणपती – सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे तसेच इथल्या वैशिष्टयपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठी ही आहेत. कृष्णा नदीवरील घाट खूप प्रसिद्ध आहे. वाई मधील […]

शिखर शिंगणापूर शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील एक गाव आणि धार्मिक स्थान आहे. येथे, सातारा सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर ऐतिहासिक काळापासून हे शंभू महादेवाचे मंदिर अस्तित्वात आहे. स्थान सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यामध्ये दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. फलटणपासून […]

पंढरपूर पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी […]

गाणगापूरचे महात्म्य श्री गुरुचरित्रात पुढीलप्रमाणे वर्णन आढळते. श्री गुरुनृसिंह सरस्वती । अवतार असे त्रिमूर्ती गाणगाग्रामी असे ख्याती । जे जाती तया स्थाना तात्काळ होती मनोकामना । काही न करो हो अनुमाना प्रत्यक्ष देव तेथे असे || गाणगापूर ग्रामी श्रीदत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वत: […]

अक्कलकोट सोलापूर श्रीक्षेत्र गाणगापूर दत्त भक्तांची पंढरी अक्कलकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे प्रसिद्ध देवस्थान आहे. स्वामी समर्थ यांचे मंदिर येथे असून अक्कलकोट शहर कर्नाटक राज्याच्या सीमेलगत आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याचे हे शहर तालुक्याचे ठिकाण आहे. अक्कलकोटची २००१ सालची लोकसंख्या ३८,२१८ आहे. […]

WhatsApp chat