Mahatma Gandhi

Mahatma Gandhi

महात्मा गांधी

मोहनदास करमचंद गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते

असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकर्‍यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणार्‍या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
भारताती तत्वज्ञान, जीवनपद्धती यांच्या वरील सखोल चिंतनाने त्यांचे जीवन भारावले गेले. आश्रम-जीवन, स्वावलंबन ,अन्न- वस्त्रे यांच्या गरजा कमी करणे, साधी राहणी, आत्मशुद्धी, मानवतावादी विचारसरणी अश्या अनेक बाबींवर ते विचार करीत राहिले. परावलंबनाने भारताची आर्थिक कुचंबना होत आहे, इंग्रज सरकार भारतीयांना विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडते आहे, या विषयी विचार केल्यावर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वत:सूतकताई, गरजे पुरती वस्त्रे , स्वालंबन, आश्रम-जीवन, यांचा स्वीकार करून ‘ बोले तैसा चाले ‘ हा आदर्श त्यांनी जनते समोर ठेवला. एक पंचा,एक उपरणे,साध्या चपला अशा त्यांच्या दर्शनामुळे जनतेला आदरणीय आदर्श नेता वाटू लागले राष्ट्राला स्वातंत्र्यासाठी कोणत्या मार्गाने जायला हवे या विषयात लक्ष घालून त्यांनी स्पृश्य -अस्पृश्य, हिंदू- मुसलमान, या सर्वावर भारतीय तत्वांची भावना निर्माण करून ऐक्य साधले पाहिजे असा प्रचार केला. त्यांच्या भाषणांतून लीखांनातून आणि प्रार्थनासभांतून हीच शिकवण ते देत राहिले. जनतेने त्यांना ‘महात्मा’ हि उपाधी दिली. तसेच त्यांना ‘ राष्ट्रपिता’ म्ह्नवूनही गौरविले. गांधीजींच्या कोनत्याहि आंदोलनात त्यामुळेच जनता त्यांच्या सोबत राहिली.

इंग्रजांनी केलेल्या जुलमी कायद्यांना विरोध करण्यात गांधीजी अह्र्भागी असत. १९१९ मद्ये रौलट कायद्या विरूद्धचे आंदोलन, चंपाअरण्यातील शेतकर्यावरील अन्याया विरुद्ध सत्याग्रह, अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी उपोषण, असहकारीतेची चळवळ,हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले २१ दिवसांचे उपोषन, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध, १९३० ची दांडीयात्रा इ. उदाहरणे त्यांच्या कृतीची कल्पना देणारी आहेत. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. इंग्रजांनी पुढे केलेल्या स्वार्थी योजनांना गांधीजींनी प्रखर विरोध केला.

आपली पूर्ण विचारांनी बनवलेली मते त्यांनी स्व:त आचरणात आणली पण ती ईतरांवर लादली नाहीत. हृद्य परिवर्तनाने जेवढे साधेल तेवढेच टिकाऊ ठरेल अशी त्यांची धारना होती. दारूबंदी, हिंदीचा प्रचार, स्वच्छता मोहीम, शिक्षणाची योजना, हरिजनांच्या उद्धाराचे प्रयत्न, ग्रामजीवनाच्या उन्नतीचे प्रयत्न,अश्या अनेक समाजहित साधणार्या कार्याचा ते सतत पाठपुरावा करीत राहिले. त्यांची प्रार्थनासभा म्हणजे समाजशिक्षणावरील प्रवचने असे. म्हात्मा गांधींचे कट्टर अनुयायी विनोबा भावे यांनी गांधीजींच्या उपदेश्याचे,सत्याग्रही- व्रताचे दिग्दर्शन या प्रमाणे केले आहे. — अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, स्वदेशी, भयवर्धन, सर्वधर्मी, समानत्व याप्रमाणे होय.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply