मतलबी रे मानसा

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठी
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठी
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !
__बहीणाबाई चौधरी

admin

Leave a Reply

Next Post

शेतकरी जगलाच पाहिजे

Wed May 15 , 2019
शेतकरी जगलाच पाहिजेबडबड करीत स्वताशी मी मंडईत शिरलो भाव एकुण भाज्यांचे भलताच चिडलो टम्याटो २० आणि कांदे ३०सांगा ना सामान्य माणसाने कसे जगायाचे ? भाजी पालाच इतका महाग मग काय खायचे ? रागाला स्वताच्या आवारात कसा बसा सावरतइकडे तिकडे फिरू लागलो . काही स्वस्त मिळते का शोधु लागलो इतक्यात एक […]
WhatsApp chat
%d bloggers like this: