माझा आवडता ऋतू उन्हाळा

माझा आवडता ऋतू उन्हाळा

maza awadta rutu unhala

 

माझा आवडता ऋतू उन्हाळा

शाळेत असताना आपल्याला निबंध लिहायला द्यायचे माझा आवडता ऋतू . आपण कदाचित कधीच कुणी  लिहिले नसेल “उन्हाळा”. आणि खरे हि आहे  ना आपल्यापैकी बऱ्याच जणांना उन्हाळा अजिबात आवडत नाही.
आपल्या मुंबईत घामाने भिजवून टाकणारा, पुण्यात आणि नागपूर मध्ये अंग कारपवून टाकणारा हा उन्हाळा कुणाला आवडेल म्हणा. “शी!! किती उकडतेय” ” या घामाने तर कंटाळा आला, अंग सगळे चिकचिकीत झालेय” असे बरेसचे संवाद सगळीकडेच ऐकायला मिळतात. ट्रेन मध्ये,बस मध्ये जाताना तर अजून कंटाळा. आजू बाजूला येणारा तो दर्प, घामाने डबडबलेले चेहेरे सगळेच नकोसे वाटत या ऋतूत.
बरे आता ह्या उन्ह्याच्या त्रासाला कंटाळून दोनदा अंघोळ करावी म्हटली तरी पंचाईत. जवळजवळ सगळीकडेच हल्ली पाणी कपात असते. ” अरे मेल्या पाणी कमी उपस , पाणी कमी येतेय” “एक तर पाणी कमी त्यात यांचे कपडे ढीगभर धुवायला ” असे सवांद हि याच काळात ऐकायला मिळतात, पाणी वाचवायचा प्रयत्न मात्र कुणी करत नाही.
पण गम्मत अशी कि याच ऋतू मध्ये सगळ्यात जास्त लग्न कार्ये असतात.
“बाई ऐन उन्ह्याळात काय बरे लग्न करतात ?” म्हणणाऱ्या बऱ्याच जोडप्यांची याच उन्हाळ्यात लग्न झालेली असतात.

गर्मी चा महिना

बरे या ऋतूत खाण्यावरही बरीच बंधन येतात. हे खाऊ नको गरम आहे. ते खाऊ नको पोटात दुखेल , पाणी जरा जास्त पी अशा हजार सूचना ऐकायला मिळतात. मांसाहार करणार्यांना तर बऱ्याच मर्यादा येतात. बाहेर पडताना सामान कमी आणि पाण्याच्या बाटल्याचं जास्त अशी आपली अवस्था असते.कुठेतरी अडगळीत पडलेल्या छत्र्या, टोप्या , स्कार्फ बाहेर येतात. आणि पूर्वी दरोडेखोर बांधायचे ना तसे सगळ्याच ललना आपल्या चेहऱ्यावर तो स्कार्फ बांधायला लागतात.  प्रेमी युगुलांना मात्र याचा बराच फायदा होत असणार, जोडीदाराबरोबर असताना कुणी ओळखण्याची शक्यता जरा कमी.

उकाडा –

कितीही उकाडा असला, कितीही बंधन असली तरी मुलांनाच मात्र नक्कीच हा आवडता ऋतू आहे. याच काळात येते ती आपली लाडकी ‘मे’ महिन्याची सुट्टी.मुलांची धमाल करायची हक्काची सुट्टी. या सुट्टी साठी किती किती प्लॅन केले जातात. पत्ते , बॅडमिंटन, गोट्या, भवरे,बॅट बॉल असे बरेच खेळ पोतडीतून बाहेर पडतात. तुटलेल्या,मोडलेल्या सायकली दुरुस्त केल्या जातात. कुणी गावी जाते, तरी कुणीतरी लांब कुठेतरी फिरायला. मज्जा असते नुसती. पूर्वी मे महिना म्हटले कि प्रत्येकाकडे कुणी ना कुणी पाहुणे यायचे.

मराठी निबंध

कुणाची मामे भावंडे, कुणाचे चुलत तर कुणाची मावस आत्ये भावंडे सुट्टीत राहायला यायची. आणि मग सगळी मुलांची गॅंग खूप धमाल उडवून द्यायची. सकाळ , दुपार , संध्याकाळ  अगदी रात्री सुद्धा फक्त खेळ आणि खेळच. दिवसभर खेळ आणि रात्री गप्पांचा कट्टा. तहान भूक हरपून मुले नुसती धमाल करत असतात. खेळताना होणारी भांडण यातही एक वेगळीच गम्मत असते. ” ए तू रडीचा डाव खेळतोस ” हे वाक्य तर हमखास सगळीकडे ऐकायला मिळते.  शाळा , अभ्यास याचे बंधन नाही, फक्त एक टेन्शन असते ते निकालाचे. तो एक दिवस फक्त हि सगळी मंडळी जरा शांत असतात. पण एकदा का रिझल्ट हातात आला कि हि मंडळी परत दंगा करायाला सुटतात.

maza awadta rutu unhala

इथे मुलांची खेळण्याची धमाल तर तिथे आईची लोणची , पापड घालायची तयारी. वर्षभराचे मसाले , पावसाळ्याची बेगमी ची तयारी याच काळात. सगळ्या प्रकारची वाळवणे या दिवसात बघायला मिळतात. आणि सुकवलेल्या आंब्याच्या आमसुलाच्या फोडी अर्ध्या तर मुलांनी पळवूनच संपून जातात. आणि मग त्या मागे होणारी आरडा ओरड हि गमतीशीर असते.या ऋतूत येतो तो फळांचा राजा आंबा. नुसते नावानेच तोंडाला पाणी सुटते. कोकणात तर आंबा, फणस, काजू, करवंद अश्या कितीतरी फळांची नुसती रेलचेल असते. आंबा, फणसाची साट , कोकम सरबत किती किती प्रकार ते खाण्याचे. याच ऋतूत आपण हक्काने थंड पेय मागू शकतो.” किती गरम होतेय, प्लीज आई दे ना एक पेप्सी” अशी विनवणी प्रत्येक मूल आपल्या आईला करते. कुल्फी , आईस्क्रीम हे खाण्याची मज्जा हि याच काळात अनुभवता येते. हल्ली म्हणा सगळ्याच ऋतूत मिळते हे पण मे महिन्यात याची मजा काही औरच .

या ऋतूत सगळ्यात जास्त कमतरता जाणवते ती झाडांची. गाडी पार्क करताना खूप ऊन आहे सावलीत गाडी उभी कर हा असे प्रत्येक जण म्हणत. रस्त्यात चालताना”अरे !!!इथे एकही झाड नाही बाई ,थोडी सावली तर लागली असती” असे म्हणतो आपण. पण असे म्हणणारे आपण स्वतः किती झाडे लावतो? हा मोठा प्रश्नच आहे. त्या वेळी जाणवते कि खरंच किती गरज आहे झाडांची. मोठमोठ्या टॉवर च्या घरात एअरकंडिशन मध्ये बसायला मजा येते, मॉल मध्ये ए .सी मध्ये फिरायला मजा येते. पण त्यातून बाहेर पडलो कि आठवत कि किती गरजेची आहेत हि झाडे. या मे महिन्यात आपण सगळ्यांनीच एक निश्चय करूया कि पुढच्या मे पर्यंत आपण एक तरी झाड लावू आणि ते जगवू.

पण एक मात्र आहे प्रत्येक उन्हाळ्याचा शेवट हा गोड आठवणिनीचं होतो. आणि मग वेध लागतात ते शाळेचे , नवीन वर्गाचे , नवीन पुस्तक वह्यांचे. आणि सगळ्यात जास्त वेध लागतात ते उन्ह्याळ्यामुळे शुष्क झालेल्या प्रत्येक गोष्टीला भिजवून टाकणाऱ्या, गार आणि तृप्त करणाऱ्या पावसाचे. 

 

Short Essay

वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले की आम्हाला वेध लागायचे ते उन्हाळ्याच्या सुट्टीचे.एप्रिल-मे सुट्टीत आमच्या घरी सगळ्या भावंडांचा(चुलत-मामे-मावस) अड्डा असायचा. कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ दिवसभर चालू असायचे. कॅरम खेळताना एका डावात एक मार्क असे करत २९ मार्कांची गेम व्हायची. कुणी
चांगले खेळत नसले की मग त्याला/तिला विचारायचे काय गं/रे हात तापला नाही का अजून?

आम्ही जीपमधून कधी कधी प्रवासाला निघायचो आणि सोबत खान्यापनियाचे सामान घ्यायचो,त्यामध्ये कोको, बोर्नव्हीटा, कच्चे दाणे व गूळ असायचे. दुपारच्या कडक उन्हात एक वेगळाच खेळ खेळायचो. बाहेर दोघांनी अंगणात उभे राहायचे व दाराच्या फटीत.

 

उन्हाळ्यात आंच्याघरी पापड्या वाळवत असताना आम्हीच गुपचूप जाऊन ओल्याच पापड्या खायचो. कधी वेगवेगेळे खेळ खेळत असत ज्यामध्ये लिगोरची,लपंडाव इत्यादी.

अजून एक उन्हाळ्यातील सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे अंगणात सडे घालणे. सकाळ-दुपार-संध्याकाळ १५-२० बादल्या पाण्यांचे सडे. सडा घातल्यावर जो गारवा येइल ना त्याचे सुख काही निराळेच असायचे. आमरस खाताना वाटी न घेता मोठ्यात मोठा वाडगा घ्यायचो.

झाडे नसती तर Marathi Essay

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

Leave a Reply