म्हणूनच माझा महाराष्ट्र महान

Maza maharashtra mahan

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

admin

Leave a Reply

Next Post

माझी आई

Wed May 15 , 2019
Mazi Aai Marathi Kavita आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते….. तिची हक़ म्हणजे मन हराव्नरी असते…… तिची प्रेमळ बोली मनाला जिंकणारी असते….. आई म्हणजे आई असते जगा वेगळी बाई असते….. घरातली तुलस तिच्या मायेने वाढत असते…. बगिच्यातला निशिगंधा…. तिच्या हसण्याने फुलत असते…. आई म्हणजे आई असते जगा वेगळी […]
WhatsApp chat
%d bloggers like this: