Mazi shala marathi essay

Mazhi shala marathi essay

माझी शाळा मराठी निबंध

मला वाटतं पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आणि माझी शाळा इथेच थांबत नाही; ती शिक्षणाच्या विविध पद्धतींवर विश्वास करते. एज्युकेशन आणि लर्निंग मध्ये काय फरक आहे? मलाही तोच प्रश्न होता म्हणून मी आमच्या आदरणीय प्राचार्य महोदयांना विचारले, मी तुम्हाला हे सांगू शकेन, त्या फार चांगले समजावून सांगतात.

त्यांनी मला सांगितले, पाठ्यपुस्तकांतून मिळते ते एज्युकेशन आणि आयुष्या मध्ये जे कायमचे शिक्षण चालते ते लर्निंग, आणि म्हणूनच आमच्या शाळेत खेळ, इतर शैक्षणिक उपक्रम, मोठ्या विद्यापीठांच्या शिक्षण यात्रा, अतिथी व्याख्यान वगैरे होत राहतात. माझ्या शाळेने माजी विद्यार्थी नेटवर्कची स्थापना केली आहे, त्यासाठी माझी शाळा लिंक्डइन स्कूल टूल आणि अलुमणी नेटवर्क साधनांचा वापर करते.

Mazhi Shala

माझ्या शाळेचे बरेच माजी विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्सला, आयटी सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, आणि ते जगातल्या वेगवेगळ्या देशांत आहेत. माझी शाळा या माजी विद्यार्थ्याच्या अनुभवाचा आणि काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रगती साठी करत आहेत.

मला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आमच्या उपनगरातील कोणत्याही इतर शाळेत ही सोय नाही आणि यामध्ये पूर्णपणे आमच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम चे श्रेय आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, त्या एक समर्पित, टेक-प्रेमी आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल आहे.

मी आशा करतो प्रत्येक शाळेला असे लीडर्स मिळावेत, मग भारतीय शिक्षण प्रणालीचा कायापलट व्हायला वेळ लागणार नाही.

या मध्ये माझ्या शाळेचे शिक्षक ही मागे नाहीत, सर्व शिक्षक MSCIT झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे की भारत आयटी हब आहे, आमच्या शाळेने भविष्यातील या संधींचा लाभ घेण्यासाठी शाळेमध्ये आयटी एज्युकेशन चालू केले आहे. आमचे कॉम्पुटर चे शिक्षक बी.टेक कॉम्पुटर सायन्स झालेले आहेत, आणि ते आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थीं आहेत.

माझी शाळा निबंध

त्यांना कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडलं. आपल्या सगळ्यांना यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे. माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत, माझ्या शाळेची वेबसाईट सुद्धा आहे, आणि आमच्या शाळेची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे. आमच्या जवळ पासच्या भागात इतकी तंत्रज्ञान प्रेमी शाळा नाही, आणि यामुळे मला माझ्या शाळेबद्दल अभिमान वाटतो.

जरी माझ्या शाळेने अश्या मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत, तरीही ऍडमिशन फीस (प्रवेश शुल्क) नाममात्र आहे. अन्य प्रतिस्पर्धी शाळांमध्ये शुल्क जवळपास दुप्पट आहे आणि खूप लपविलेले शुल्क सुद्धा असतात. भारतीय पालक शिक्षणाबद्दल फारच गंभीर आहेत, ते आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्षमतेमध्ये जे काही करू शकतात ते करतात.

बऱ्याच खाजगी शाळा याचा फायदा घेतात आणि जास्त प्रमाणात देणगी आणि फी मिळविण्याचा प्रयत्न करतात. माझे पालक माझ्या शाळेचे आपल्या मित्रांच्या समोर अभिमानाने कौतुक करतात. त्यांचे काही मित्र आपल्या मुलांना माझ्या शाळेत स्थानांतरित करणार आहेत. पालकांचा आदर राखल्याबद्दल मी आमच्या शाळेचे आभार मानले पाहिजे.

मी माझ्या शाळेबद्दल खूप वेळ बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादेमुळे मला जास्त बोलता येणार नाही. आमची शाळा शहरातील उत्तम शाळांपैकी एक आहे, शिक्षणाची गुणवत्ता, भविष्यकालीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माझी शाळा इतरांपासून खूप वेगळी आहे, आणि मला याचा खूप अभिमान आहे.

मला आशा आहे की,माझी शाळा अशीच प्रगती करत राहो आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे. प्राचार्य महोदया, शाळेबद्दलचे माझे मत व्यक्त करण्यास मला अनुमती देण्यासाठी मी आपला आभारी आहे.

Check Also

डॉ भीमराव आंबेडकर

Dr Bhimrao Ambedkar डॉ भीमराव आंबेडकर (Bhimrao Ambedkar)भीमराव आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकर म्हणून प्रसिद्ध आहेत. …

10 comments

  1. Pingback: Top 10 Dentist in Columbia Maryland

  2. Pingback: tilecacuoc

  3. Pingback: mainqq

  4. Pingback: vinyl floor tile decals

  5. Pingback: dentist in houston

  6. Pingback: ignou synopsis

  7. Pingback: cbd oil

  8. Pingback: 메이저놀이터

  9. Pingback: acl cornhole boards

  10. Pingback: Singles clubs

Leave a Reply