माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

Mazya Sobat Navya Pruthvivar yetay?

पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय
माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय
त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा
घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा
अप्पलपोटी जंगले आणि स्वर्थिपणाचि दलदल
निष्पाप असहाय माणसांची केविलवाणी कलकल
माणू सकि ला झालाय बरा न होणारा आजार
शहाणे झालेत भूमिगत भरलाय मुर्खांचाच बाजार
बदलून टाकुया सगळे थोडा विचार करू या भूतकाळ
विसरून भविष्यात जाउया उद्याच्या पिढीला
देवून जाऊ विचारांचा ठेवा त्यासाठी
स्वत: च्या कर्तुत्वा वर विश्वास हवा चला
तुम्हीही पावले उचलताय माझ्या
सोबत नव्या पृथ्वी वर येताय

admin

Leave a Reply

Next Post

मी मराठी

Thu May 16 , 2019
Mi Marathi Kavita लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म,पंत,जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी । आमुच्या मनामनात दंगते मराठी । आमुच्या रगारगात रंगते मराठी । आमुच्या उराउरात स्पंदते मराठी । आमुच्या नसानसात नाचते मराठी । आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी […]
WhatsApp chat
%d bloggers like this: